🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 लक्ख आठवते चौथीचे हे संपूर्ण पुस्तक अगदी जिवंत चित्रण वाटत आले आहे.. शहाजी राजांचे, जिजाऊंचे , महाराजांचे आयुर्चित्रण जीवाला जीव देणाऱ्या सौंगड्यांचे, सर्व सर्व यथा योग्य चित्रण सार्थ जीवनपट संक्षिप्त तरी... तो शपथ विधी, तो तोरणा किल्ला सर करणे , ते सोन्याच्या नाण्यांचे हंडे सापडणे, ते किल्ले बांधणे, ते घोडदळ पायदळ आणि अख्खी फौज उभी करणे , स्वराज्याचे स्वप्न साकार करणे, जनतेला न्याय देणे, कित्येक प्रसंग सांगता येतील, ते वरातीतून वाजत गाजत जात गुपचूप लाल महालात पोहोचणे , खानाला सळो की पळो करून सोडणे, एक एक किल्ला मिळवणे , एक एक हिरा तयार करणे आणि हंsss एक एक हिरा, एक एक सिंह गमावणे, जिव्हारी लागणे ... ते नेताजी पालकर , ते मुरारबाजीचे शौर्य, ते तानाजीचे शौर्य, किती किती सांगावे आणि महाराजांचे शौर्य, अंगावर काटा आणणारे असे जीवावरचे पण खंबीर उत्कृष्ट योजनाबद्ध नियोजन किती किती सांगावे? किती किती ऐकावे ... असे महाराजांचे अवघे आयुर्चित्रणाचे हे स...