पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दक्षिणा

 गुरू स्वताच एकाशिष्याला जेव्हा दक्षिणा मागतो तेव्हा त्याच्या कडे दुसऱ्याला देण्याशिकवण्यासारखे काहीच उरलेले नसते किंवा तेवढे नाविन्यपूर्ण वा नवनिर्मितीक्षम सामर्थ्य उरलेले नसते. आणि त्याने मिळवलेले ही सहज आपलेच म्हणून लाटायची ही आणखी एक सुलभ योजना तसेच आपले एकूणच ज्ञान डावे ठरू नये म्हणून केलेली ती चाणाक्ष योजना असावी..  कफल्लक भासणारा तो शिष्य मुळात आपल्याच अधिकारांची जाणीव नसलेला असा एव्हाना बनवण्यात यश आलेले असते व आपल्या कमकुवत पण क्षणिक लाभदायक दुसऱ्या शिष्यास स्थापित करायचे असते. त्याकरिता आपल्याला मिळालेले आकर्षक लाभ सोडायचे नसतात. म्हणून दक्षिणा मागून मुळात अनभिज्ञ शिष्यास आणखी कमकुवत करण्याची पद्धतशीर योजना असते.. त्याकरिता मानसिक, भावनिक गुंता निर्माण करण्याचे कार्य मात्र पूर्वापार अव्याहत चालत  आलेले असते.. हं... मात्र ते ही , तोच मुळात येथील मूळ वारसदार असतो  हे चांगलेच जाणून असून  त्यालाच कळू न देता सुरू असते,  अव्याहत !!!  पण एवढा विचार करतो कोण ....

अप्पाची शिकवण

अप्पाची शिकवण  खूप कमी लाभले आम्हाला आप्पा.  एकदा रडत रडत मी गाऱ्हाणे घेऊन गेलेलो.  कोणीतरी मला काहीतरी चिडवत होते. "आहेस का तू  ? मग रडतोस का ? मान्य कर , नाही तर बदल . आणि नसलास तू तर चिडायचे,  रडायचे कशाला ?  ते आपल्यासाठी नव्हतेच म्हणून सोडून दे. चला सगळे येऊन बसा.  कानात तेल घालायचे आहे ना ? "  आठवड्याचा कार्यक्रम पार पाडत आप्पा बोलत होते.      *अँब्रोस चेट्टियार* 

अंधमंद रसिक

अंधमंद रसिक हल्लीच एका अंधमंद रसिकाने आपल्या धुंदीत रस्त्याने जाताना कडेच्या शेतातील कामात मग्न बाईला जबरदस्तीने धरून ओठावर चुंबन दिले.  ती स्त्री क्षणभर हडबडून  गेली.  सावध होताच तिने त्याला उत्तरादाखल हलकेच जवळ ओढले. त्याच्या अनाहुत चुंबनाचा परतावा म्हणून त्याला चुंबन देऊ केले. तो विळख्यात येताच त्याचा खालचा ओठ कडकडून चावून वेगळाच केला. तो कळवळला तडफडला पण तिने निकराने आठवण म्हणून त्याच्या हातात त्याचाच ओठ ठेवला. हतबुद्ध झालेला तो अंधमंद रसिक अचानक राक्षस पाहिल्यागत फाटक्या तोंडाने किंचाळत वाट फुटेल तिकडे पळत सुटला. त्याचा पुरता इलाज करून ती आपल्या हातातील विळ्याने तण स्वच्छ करण्याच्या कार्यात रममाण झाली.      *अँब्रोस चेट्टियार*

Evm

 अर्थात evm हा मोठा च प्रश्न आहेच .... परंतु  ईव्हीएम असताना सुद्धा कर्नाटकने कसे राज्य राखले ? ती निर्भयता , ती इच्छाशक्ती आपल्या कडे निर्माण व्हावी . ती जबाबदारी आपल्यात निर्माण व्हावी ?  नाहीतर आपण काय संदेश देणार आहोत ?  आम्हाला समोर उभा असलेला अक्राळ विक्राळ दानव दिसत नाही का ? आम्ही त्याला बगल देवून दुसऱ्याच प्रश्नाला महत्व देणार का ? ठाम पणे सरळ सरळ शत्रूला तोंड देणे योग्य की  सोयीचे सोपे मार्ग शोधणे ?  सावधान !  कदाचित तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल ...तेव्हा सावध व्हा .. असे अनेक प्रश्नही आहेत आपण ते मार्गी लावूच पुढे . आज मात्र दैत्य उच्चाटन आवश्यक आहे ... तेव्हा संपूर्ण जोर तेथे लावायला हवा... असे माझे प्रांजळ मत आहे.. 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

पांढरपेशा तमाशा

 पांढरपेशा तमाशा  तवा तू बोललास रागं रागं  ते आता तू बोलशिन का  आन राया' माझ्या डोळ्यामंदी  आता तू डोळं घालशिन का |........     ©अँब्रोस चेट्टियार

महामार्ग

🙏🏾 या विषयावर खूप लोक खूप काही बोलत आहेत .. अनेक दिव्य ज्ञान सांगत आहेत ... फक्त विचार करा कोण बांधते आहे का बांधते आहे त्यातून जनतेला काय विशेष मिळणार आहे आणि सांगोपांग विचार करून झाल्यावर . एक प्रश्न स्वतःला विचारा की येन केन प्रकारेण जनतेला सतत मूर्ख दोषी ठरवणे कितपत योग्य ??  आपल्या वर जो पर्यंत ओढवत नाही तो पर्यंत ठीक ? मग आपणही त्याच मूर्ख दोषी पदवी प्राप्त झाल्यावर डोळे उघडणार का ?  त्वरित बाजू बदला आणि सामान्य  नागरिकाच्या बाजूने विचार करायला शिका..    ...हे महामार्ग म्हणजे महाद्वार, ते नेमके कोणाला कुठे नेतायत याचा विचार व्हावा ... हे का सापळे बनत चाललेत ??? ...याची आपल्याला खरंच गरज आहे का ? विदेशात कुठे कुठे म्हणे रस्त्या कडेला नुसते पाऊल टाकले की रहदारी थांबते व पादचाऱ्यास प्रथम जाऊ दिले जाते .. मग तो कोणताही रस्ता का असेना . पायी चालणाऱ्या जिवाचा हक्क पहिला आणि मगच वाहने..तेच सयुक्तिक ही आहे ...माणसासाठी हे रस्ते आहेत..  तशी व्यवस्था तशी तांत्रिक प्रशिक्षण योजना कठोरपणे आपल्या कडे रस्ते प्राधिकरण करून घेणार का ? विषय सोडा ...  ....टेंडर ...

दैन्य

  दैन्य कवी राज रोस आता पिडू लागला जनास फेका चिडून तांबाटे त्याच्या मनी मोठी आस जनी रोष खदखदे काय द्यावे या उत्तर दाणागोटा ही संपला कवी छळण्या सादर दोघांचेही दु:ख मोठे याची दोघानाही जाण नको रडवू रे बाबा काय द्यावे तुज दान नाही मनाचे रंजन काव्य हसवून मारी हासे पोटाची खळगी भूक रडवून भारी नाही कोणाचे कोणाला येथे सुखदु:ख काही ज्याचे त्याला पुरे झाले सारे ओंडके प्रवाही   © अँब्रोस चेट्टियार

बाप्पा

बाप्पा बाप्पा मोदकाची आस सांगून भक्ताच्या भेटिला येता आला सण जवळी बाप्पा भेटीला लागा तयारीला आता ...2 पहा तयारी करावी चोख नको उराया कुठेच मेख पानाफुलास नकोच ठेस मनोभावे हो दर्शन खास राखा निसर्ग फुलवा आसमंत आनंदाचे गीत गाता आला सण जवळी बाप्पा भेटीला लागा तयारीला आता काय करू नी नकोसे झाले मन स्वागतास सज्ज झाले रोमरोमात बाप्पाच भरले घर आनंदाने सारे भरले पंचपक्वाने मनोभावाने घराघरात सुखाचा राबता आला सण जवळी बाप्पा भेटीला लागा तयारीला आता थोरामोठ्याला बाप्पाचे वेड दहा दिवसांचे स्वप्न हे गोड गीत भजन टाळचिपळ्यानी घरभरून आरती गाथा नित्य नेमाने भेट शेजारी प्रेमाला भरती आता आला सण जवळी बाप्पा भेटीला लागा तयारीला आता पाणीपाऊस मोठाले थेंब मन हिरव्या शेतात चिंब गाव शहर चंदन गंध आगमनाचा विचार धुंद ऊन पावसाची झाली पखरण फुलली धरणी माता आला सण जवळी बाप्पा भेटीला लागा तयारीला आता    ©अँब्रोस चेट्टियार