*डॉक्टर दाभोलकर स्मृतीदिनानिमित्त ठाण्यात विवेकी जागर फेरी* ठाणे ,दिनांक 20 ऑगस्ट 2023 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, ठाणे शहर आयोजित, समाजाला विज्ञान, निर्भयता, निती या त्रिसूत्रीचा संदेश देणाऱ्या, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेन्द्र दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येच्या घटनेस दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी १० वर्षे पूर्ण झाली. परंतू डॉक्टरांच्या मारेकऱ्यांना, सूत्रधारांना पकडण्यात पोलीस वा सरकारी यंत्रणांना अद्याप यश आलेले नाही. ह्या बाबतीतला जनतेचा रोष आणि आक्रोश संवैधानिक मार्गाने, सूज्ञ, विवेकी निदर्शनातून सरकारला आपले निवेदन व्यक्त करण्याच्या नेहमीच अवलंबिलेल्या मार्गाने अंनिसच्या कार्यकर्त्यांनी ठाणे नगर परिसरात विवेकी जागर फेरी काढली. या जागर फेरीत शासनाने मारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडावे असे आवाहन कार्यक्रत्यांनी केले. दाभोलकरांचे वैज्ञानिक दृष्टिकोनवादी विचार रुजवणाऱ्या घोषणा *जागर फेरी* मध्ये दिल्या गेल्या. अमर रहे, अमर रहे | डॉ दाभोलकर अमर रहे | फुले, शाहू, आंबेडकर | आम्ही सारे दाभोलकर | माणूस मा...
पोस्ट्स
ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
येता श्रावण श्रावण
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
येता श्रावण श्रावण येता श्रावण श्रावण दाटे मनात काहूर बालपण सवंगडी आठवाची भूणभूण मन उधाण उधाण मन भयाण भयाण घडी रंग बदलते हिऱ्या कोळशाची खाण येता श्रावण श्रावण.... दिस ढळता न ढळे रात तसूही न हाले घट्ट काळ्या काळजाचे रक्त डोळ्यात ओघळे येता श्रावण श्रावण.... ते ऐकिवाचे बाल्य सवंगडी कल्पनेचे कैक अभागी जिवांचे कोणी करावे चोचले येता श्रावण श्रावण.... राहो आठव तयाची जाता माहेराच्या वाटी कूस स्वप्नांची उजवा सखी पुरवा डोहाळे येता श्रावण श्रावण.... ©अँब्रोस चेट्टियार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा *वैज्ञानिक दृष्टीकोन प्रबोधन कार्यक्रम आणि ग्रह, तारे आणि अवकाश दर्शन* वृतांत : दिनांक : 18 ऑगस्ट 2023 *स्थळ : सोफिया कॉलेज, महालक्ष्मी, मुंबई.* एकूण विद्यार्थिनी 210 महिला प्राध्यापक संख्या 6 ते 7, पुरुष प्राध्यापक 2 *वैज्ञानिक दृष्टीकोन प्रबोधन कार्यक्रम आणि ग्रह तारे आणि अवकाश दर्शन कार्यक्रम म.अंनिसचे सन्माननिय सदस्य माई वंदना शिंदे आणि प्रकाश पारखे सर यांनी सर्वांना खिळवून ठेवत उत्तमरित्या सादर केला.* पाहुण्यांची ओळख इ. झाल्यानंतर विद्यार्थिनींनी 'अंधश्रद्धा निर्मूलन विषयाची निकड ' विषयावरील पथनाट्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. विविध आजारपणावर लोक अजून ही डॉक्टरकडे न जाता अंधश्रद्धेला बळी पडलेले असल्याचे त्यात दाखवले. उदा. देवी रोग समजून कांजिण्यांवर डॉक्टर कडे न जाता अघोरी बुवाबाबाचे उपाय करतात. प्रसंगी जीवावर बेतू शकते . वेळ नी पैसा वाया जातो ते वेगळेच. म्हणून समाज प्रबोधन व्हायला हवे असा सूर होता. उत्तम हावभाव योग्य संवाद, शब्दफेक, उत्तम लेखन दिग्दर्शन आणि सादरीकरण होऊन उत्तम व...
हरि हरी !
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*खिन्न करणारे असले तरी कानउघाडणी आवश्यक आहे....* कुणीतरी फेसबुकवर उसने अवसान (म्हणजे भिकमागे) आणून नॉन वेजीटेरियन म्हणजे प्राणिज हो असूनही पवित्र असलेल्या गोघृतात तळून निपजलेल्या आडनावाचे कुणी कुणी मनुष्य जातीचच प्राणी आपल्या पोष्टातून आपले डूकरी ज्ञान पाजळतो आहे की... "हरी ने आता त्यांना आता नरकातच बसवावे". काय? म्हणजे हल्ली स्वर्ग नरकाचा अधिपती हरी म्हणजे माकड म्हणजे वानर झाला की काय ? हं कोणी सांगावे .. मूर्ख पोस्टचे व्याकरण तपासायला अर्धबुद्धी विसरला बहुतेक.. ह्या वाक्यातील कर्ता शब्द हरी याचा अर्थ माकड वानर असा होतो हे त्याच हरि ने (विष्णूने ) नारदाला समजावून सांगितले असा दाखला पुराणातून कीर्तनातून व्याकरण समजावून घेत आलो आहोत . नाई का ? ...म्हणजे वानराने स्वतः 'त्यांना' नरक द्यावा ? असे म्हणायचे आहे का ? इथे त्यांना म्हणजे ज्यांनी आयुष्यभर ज्योतिबा सावित्री अशा शिक्षणमहर्षींद्वयी यांच्या कार्यावर काम केले. तद्वतच भाषेवरही काम केले. म्हणजे लेखनातून कार्य पोहचवले .. आणि स्वतःचे नाव हरि असेच आयुष्यभर लिहिले. या हरि म्हणजे विष्णूला चक्...
गाँधी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
.......गोडसे गाँधी जी पर कई कई हमले कई दशकों तक योजनाबद्ध तरीकों से करता रहा मगर विफल रहा, कभी पकडा भी गया मगर गाँधीजी ने उसे बारबार अहिंसा के प्रण में माफ कर दिया .. सारा देश और दुनिया गोडसे और उसके साथीयों और उनके मनसूबों के बारे में विस्तार से दशकों से जान रही थी जान चुकी थी | जिसने बार बार माफ किया उस ही दुनिया के महान संतको ही फिर भी मार देने वाले दुर्जन के खिलाफ जनआक्रोश थम न सका क्योंकि ऐसी भीड को बारबार सँभालने वाला जो दुनियाँ में शायद बुद्ध के बाद एक बार फिर पैदा हुआ था जिसकी ओर सारी दुनियाँ बडी आशा से देख रही थी उस संत को ही गोली दाग कर मार देने वाले को लोग किस तरह बख्शते भला, क्या पता , कौन कहे गाँधीजी के हत्या के बाद हुए दंगों को भडकाने मे भी उसी हत्यारेके साथियों का हाथ हो वरना अहिंसा के पुजारी शिष्य यूँही किसीपर हिंसक नही हो सकते.. सारी दुनियाँ चकित थी अँग्रेज चकित था और बहोत ही दुखद सुकून था उसे वो कहता कि हमारे रहते अगर गाँधी की हत्या होती तो हम कभी अपने आप को माफ नही कर सकते थे. मगर ये कैसी कौम है जो अपने ही नुमाइंदे को ऐसी बेरहम मौत दे जाती है ?...
खात्रीपूर्वक शंका येते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
खात्रीपूर्वक शंका येते. तुमच्या स्वार्थाला खिंडार पडताना पाहून तुम्ही बिथरत असाल नाही...? तुमच्या बुडाखाली कुणी सुरुंग लावताना पाहून तुम्ही बिथरत असाल नाही...? तुमच्याच काळ्याकुट्ट कर्तृत्वाला कुणी लाथाडताना पाहून तुम्ही बिथरत असाल नाही...? चारचौघात तुमचे कर्म उघडे पाडणाऱ्यास पाहून तुम्ही बिथरत असाल नाही...? तुमच्या काळ्याविंद्र्या क्रूर कारस्थानाने कुणाचा काटा काढताना पकडले गेल्यावर तुम्ही बिथरत असाल नाही...? तुमच्या कारस्थानाची इथ्यंभूत माहिती कुणी चव्हाट्यावर आणल्यावर तुम्ही बिथरत असाल नाही...? अशा कुणा एक वा अनेक सुधारकांचा काटा काढण्याच्या क्रूर योजनेच्या मनस्वी निर्लज्ज आंदोलनांनी चव्हाट्यावर तुम्हीच तुमचे बिंग फोडताना तुम्ही बिथरत असाल नाही...? जीवघेण्या जघन्य क्रूर विचारांचे वाहक होऊनही स्वताचे किंचित से नुकसान झाले तरी तुम्ही बिथरत असाल नाही...? असे एकामागून एक, मानवतेचे प्राण घेत सुटलेले, जगासमोर तुमचे अपराध पुराव्यानिशी बाहेर आले तर काय होईल? याचा विचार कर करून तुम्ही बिथरत असाल नाही...? कुण्या विरोधकास कोणत्या गोळीचा ग्रा...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 बैठक वृत्तान्त दिनांक : 06ऑगस्ट 2023 *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा* आपल्या ठाणे शहर शाखेची नियोजित पाक्षिक बैठक रविवार दिनांक *06ऑगस्ट रोजी* नेहमी प्रमाणे सायंकाळी ठीक 5 वाजता माईंच्या घरी पार पडली. उपस्थित मान्यवर सदस्य माई वंदना शिंदे अजित डफळे पुष्पाताई तापोळे अथर्व लिपारे कल्पना चेट्टियार अँब्रोस चेट्टियार बैठकी चर्चा झालेले विषय: ☑️20ऑगस्ट डॉ दाभोलकर दशम स्मृती दिवस निमित्त कार्यक्रम आखणी जसेच डॉ दाभोलकर घरोघरी उपक्रमातील 10 छोट्या पुस्तिकाचे प्रकाशन कार्यक्रम यांची प्राथमिक आखणी झाली.🙏🏾 ☑️ प्रा. एन.डी.पाटील वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन अभियान कार्यक्रमांचा आढावा व पुढील कार्यक्रमांचे नियोजन भागात येत्या 18 तारखेपासून या हंगामातील कार्यक्रमांना सुरुवात . ☑️पुस्तक वाचन- या सदरात येणाऱ्या पुस्तकांची चर्चा झाली सर्व सदस्यांनी आपली प्रत सुरक्षित करावी असे आवाहन करण्यात आले .. आपल्याला मिळालेल्या सवलतीच्या किमतीत उपलब्ध प्रती इच्छुक सदस्यांना उपलब्ध करून देण...