पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
  *वृत्तान्त विशेष* म.अंनिस मुंबई आणि ठाणे शाखा पुस्तक विक्री स्टॉल आणि चमत्कार सादरीकरण कार्यक्रम | स्थळ: गोरेगाव पश्चिम, मुम्बई. दिनांक : 24 डिसेंबर 2023 वेळ : 3 ते 8:30     अ. भी. गोरेगावकर, इंग्लिश स्कूल, गोरेगाव, मुंबई, शाळेच्या पालक संघटना  'अभिमान मित्र परिवारच्या अत्यंत प्रेरक आणि स्तुत्य अशा  *मराठी शाळा बचाव*  मोहीमेतर्फे आयोजित खाद्य पदार्थ विक्री आणि वस्तू विक्री तसेच विविध कला, कौशल्य प्रदर्शन आणि जाहिरात. अशा त्रीदिवसीय जत्रेत सालाबाद प्रमाणे अंनिस मुंबई शाखेच्या पुस्तक विक्री स्टॉल सोबत अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शहर शाखेने चमत्कार सादरीकरण प्रबोधन कार्यक्रम विशेष उत्साहाने सादर केला. स्टॉल आणि चमत्कार प्रात्यक्षिक सहकारी अंनिस कार्यकर्ते, आणि गायन चमू. लांजेकर सर माई वंदना शिंदे शुभदा निखारगे ताई नितीन सुतार अजित डफळे पुष्पाताई तापोळे प्रा.पारखे सर (आकाश दर्शन) कल्पना आणि अँब्रोस चेट्टियार चळवळ गीत समूहातील young minds दीपा, मीनाक्षी, यश, निखिल , तनिष्का, श्रुतिका, पलक, नियती , हर्षल, अरमान-(अधांतरी बाबा)  ...
लक्ष्य ! तुमचे लक्ष्य काय आहे ? तुमचे ध्येय काय आहे ? तुमचा मार्ग कोणता ?  स्वतालाच हे प्रश्न विचारा  उत्तर जाणा काय आहे ? होताच चुळबुळ कुणाची  का तुम्ही अधीर होता ? होताच खुडबुड कोठे  का तुम्ही बधीर होता ? लक्ष्य तुमचे विसरून जाता  त्यांचे दुःख मोजीत बसता  ध्येय तुमचे दूर जाते  वाट पुन्हा शोधीत बसता हा प्रस्थापितांच्या बनाव आहे  माना वा प्रकृतीचा खेळ आहे  तुमच्या प्रगतीस खीळ बसविण्याची सारी ही तडजोड आहे हळहळून विसरावयास लावतात दुःख आपले  पुन्हा नवेच पिल्लू आणून सोडती कसायापुढे खेळ त्यांचा अनवरत चालतो नी जातो पुढे  ध्येय तुमचे थबकलेले ते पहा मागे कुठे  एक त्यांचे ध्येय तुम्हा थांबवावे गंजवावे पण तुम्ही ध्यानात नाही घेत याचे बारकावे काहीही घडो अगर वा पडो कशाची आहुती थांबवाया जाणे जरुरी असा सदैव सामोरे पुढती एकदा का तुम्ही पोचला त्या तिथे ध्येया कडे  मग तुम्हाला हेच येतील घालतील जी साकडे पण तुम्ही व्हा ठाम पुन्हा म्हणा बधणार नाही  गमावले ते सारेच आता मिळवायचे आहे काही         *अँब्रोस चेट्टियार*...
उपलब्ध साधन साहित्याच्या आधारे आपल्याला सहज कळते की मुळात        आपण उद्यमी, उद्योगशील होतो. उद्योगातून आपला नफा करून घेणे हे काही चूक नाही.. आपले कार्य कुशलतेने करणे हा आपला जीवनाचा भाग होता. आपण लोकशाही वृत्तीचेच होतो. सर्वांना मोकळीक होती.. कोणाला आडकाठी करणे वगैरे रक्तात नव्हते. खूप सरळ सोट असे जीवन आपण विकसित केलेल्या अनेक गोष्टी आणि ज्ञानाचे बळावर आपण आपल्या भरत खंडावर जगत असू .. ...पण ... बळकावयाचे आणि लाज ही वाटून घ्यायची नाही ही आपल्यात नसलेली वृत्ती असलेली मंडळी आपल्या कडे भीक मागत, आश्रयाला आली, येत गेली आणि हळू हळू घर पोखरू लागली त्यांना हवे असलेले पेरू लागली आणि आपले ज्ञान चोरू लागली. आपली भाषा आपले परंपरागत वर्तन हीन ठरवू लागली आणि भोळे पणाने आश्रीताला डोक्यावर घेऊन आपल्याच घराची मेढे आपण कापू लागलो. आपल्याच व्यवसायात नको तेवढा अमानुष गैरव्यवहार करून घेऊ लागलो . हे सर्व अनैतिक कार्य शिकवणारेच बेमालूम आपली रीतसर बदनामी करून करवून आपल्याला हव्या त्या जाळ्यात गुंतवू लागले .. तेच बारा गावचे पाणी पिवून आलेले लोक जातील तेथे आपली बदनामी करण्यास कु...
वृत्तांत :  वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन कार्यक्रम,  NSS विभाग ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे.. स्थळ : वाजे गाव, नेरे , पनवेल .  दिनांक : 14 डिसेंबर 2023 वेळ : 12 ते 2  ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे NSS विभाग प्रमुख बाबासाहेब कांबळे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वैज्ञानिक जाणिवा प्रबोधनाचा सप्रयोग कार्यक्रम सादर करण्यासाठी अंनिसच्या  ज्येष्ठ कार्यकर्त्या माई वंदना शिंदे यांना वाजे गाव पनवेल येथील शिबिर स्थळी, जिल्हापरिषद शाळा वाजे येथे आमंत्रित केले होते.           साधारण दीड ते पावणे दोन तासांचा  प्रवास करत माई आपले सहकारी कार्यकर्ते अजित डफळे आणि अँब्रोस चेट्टियार यांचे सोबत कार्यक्रम स्थळी पोहोचल्या आणि आगत स्वागत झाल्यानंतर लगेच कार्यक्रम सुरू केला गेला..  कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनएसएस प्रमुख कांबळे सर यांनी केले आणि स्थानिक शाळा मुख्याध्यापक नीलकंठ भुरे सर यांनी अंनिस कार्यकर्ते  माई वंदना शिंदे , अजित डफळे आणि अँब्रोस चेट्टियार यांचे विद्यार्थांनी बनवलेल्या हस्तकला साहित्याने स्वागत केले.   अँब्रोस यां...
    आजच्या तरुणाईतील सच्च्या शिक्षकास ! तुझियात पाहतो मी मज मीच हे सख्या रे  तो डौल तो निवारा स्वच्छंद जागणारा  हरखून सौख्य पावे पाहून तुज समक्ष  तुझियात पाहतो मी मन मीत जोडणारा नावारूपास आले जे कार्य सुप्त होते  पाहावयास कोणी तेव्हा न जाणणारा तू आज घेशी कष्ट पेरावयास जे जे  मज आठवे तो काळ होता किती तो धृष्ट नेटास को विचारी स्वार्थांध भूक मारी  कार्यास तो कठीण होता उधाणवारा तो काळ वेगळाला आज काळ वेगळाहे  कार्यात ना कसूर ना कमतरताही होती यंत्राची साथ नव्हती तंत्राची साथ नव्हती  पायी प्रवास सारा कैकैक कोंडमारा तरी आजचे तुझे हे मानेन मोठे कार्य  कार्यात तू स्वच्छंद आनंद जगवणारा अगदी तुझ्यासम होतो कार्यात डुंबणारा मज वेड ते नव्याचे प्रकृतीस जागणारा तुजलागी गुण तो पाही रमतोस तू मुलांत आधार प्रकृतीचे फोफावती हास्यात  सर्वांस नाही जमणे रमणे बिंजांकुरात  संस्कार भूतदयेचा फुलवीत प्रकृतीस  आहे अताशी एकच मज सांगणे श्रृणावे हिंसेस त्यापुरोनी अहिंसेस जागवावे, अहिंसेस जागवावे |       *अँब्रोस चेट्टियार*
 *पाक्षिक बैठक वृत्तांत :* दिनांक : 10 डिसेंबर 2023 *म. अंनिस, ठाणे शहर शाखा*         🙏आज रविवार दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता डोंगरीपाडा येथे झालेल्या पाक्षिक बैठकीस उपस्थित सदस्य  1) माई वंदना शिंदे 2) ज्योती कांबळी  3) अजित डफळे 4) स्नेहल भोसले 5) पुष्पाताई तापोळे 6) अथर्व  लिपारे  7) कल्पना चेट्टियार  8) नितीन भवर 9) गीता वायाळ 10) महेश वायाळ 11) अमृता वायाळ 12 ) अँब्रोस चेट्टियार  आणि  मुख्य आकर्षण ठरलेला गायक वादक चमू संच   वादक समूह 1) भावेश जगताप  2) यश खरे   गायक समूह 3) निखिल गायकवाड  4) नियती बोढारे 5) तनिष्का गायकर 6) दीपा विश्वकर्मा 7) हर्षल गायकवाड  8) मीनाक्षी जैसवार  9) अरमान हुसैन 👉 चळवळ गीत सदरात चमूने  १) अभिवादन गीत    २) कसं काय सखुबाई  ३) पिंडदानाचा कावळा  ४) चाललं या देशात काय रं ५) धूम धडाधड मारबुड्या तू ६) कशाला करू मी वडाची पूजा ही गीते सर्वांना खिळवून ठेवत जोशात गाईली  👉सर्व सदस्यांनी गायक वादक चमुचे विशेष कौतुक के...
 हे सूत्र लक्षात घ्या ... पुरोगामी आणि डावे म्हणून नावारुपाला असलेल्या 99 टक्के प्रसिद्ध लोक हे पेरलेले उजवे नसतील कशावरून ?  का बरे ?. ईतर पुरोगामी आणि डावे मात्र उजव्यांच्या मांडीला मांडीला लावून बसलेले दिसतात ... हे निसर्गतः कसे शक्य आहे ? सगळेच कसे उजव्या पथावर मार्गस्थ ? एखादाच डावा सहन होण्यापलीकडे जातो आणि संपवला जातो ?  कारण बाकीचे ठराविक ओझे वाहतात आणि हा मार्ग बदलतो किंवा ओझेच बदलतो .. विचार करा... 
  *महत्वाचे* 👇 🙏 *सभासदांनी कृपया वृत्तान्त अहवाल वाचून पुढील बैठकीस उपस्थिती बद्दलची माहिती म्हणून शेवटी खालील यादीत आपले नाव नोंदवावे , धन्यवाद 🙏* पाक्षिक बैठक वृत्तांत : दिनांक : 10 डिसेंबर 2023 *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा* आज रविवार दिनांक 10 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता डोंगरीपाडा येथे झालेल्या पाक्षिक बैठकीस उपस्थित सदस्य 1) माई वंदना शिंदे 2) ज्योती कांबळी 3) अजित डफळे 4) स्नेहल भोसले 5) पुष्पाताई तापोळे 6) अथर्व  लिपारे 7) कल्पना चेट्टियार 8) नितीन भवर 9) गीता वायाळ 10) महेश वायाळ 11) अमृता वायाळ 12 ) अँब्रोस चेट्टियार आणि मुख्य आकर्षण ठरलेला गायक वादक चमू संच वादक समूह 1) भावेश जगताप 2) यश खरे  गायक समूह 3) निखिल गायकवाड 4) नियती बोढारे 5) तनिष्का गायकर 6) दीपा विश्वकर्मा 7) हर्षल गायकवाड 8) मीनाक्षी जैसवार 9) अरमान हुसैन 👉 चळवळ गीत सदरात चमूने १) अभिवादन गीत   २) कसं काय सखुबाई ३) पिंडदानाचा कावळा ४) चाललं या देशात काय रं ५) धूम धडाधड मारबुड्या तू ६) कशाला करू मी वडाची पूजा ही ग...
 उम्मीद की मुलाकात  आ गए मेरी मौत का तमाशा बनाने  पुकारते रह गए हम डूबती साँसों को थामे कोई आहट भी न तब मिली हमारे दर पर  हमारी पुकारों ने क्या झकझोरा नही वहाँ पहुँचकर  फिर अब कैसे आना किया मेहेरबान बताएँ  हम तो अरसा पहले ही निकल लिये हैं आशियाना बदलकर अब आ ही गए हो तो कुछ बातें हो जाएँ  हमारी ही सही यादों को कुछ टटोला जाए  उनमें से भी उभरकर आएँगी बहोत सी हस्तियाँ  जिनसे तुम्हारा आज यहाँ मेरी मैयत पर हुआ है सामना  जो खास थे तुम्हारे लिये भी कभी उनसे आज  बाजू मे बैठकर कुछ गुफ्तगू हो सके तो लडालो अभी  फिर ना जाने ये मौक़ा कभी हाथ लगे ना लगे  ऐसी ही किसी मुलाकात में तब्दील ना हो जाए कहीं  अगली मुलाकात का झूटा वादा करके आज गर टाल दिया  तो ये भी मौका और अनगिनत यादें कहीं नासूर बनकर तुम्हे भीतरसे कुरेदना ना शुरू करदे  बस यही दिली तमन्ना थी यही बताना था  कुछ पल सुकून भरे यादों को ताजा करने वाले साथ गुजारने थे साथ  मगर खैर !  अब मेरी नैया काफी आगे निकल ली है  शुक्र है फिर से मुझे वो अँधियारी इंतज...
  का नेहरू गांधीची बदनामी लोक करतात ?         नेहरू गांधी इंदिरा आणि काँग्रेस यांची कमाल बदनामी करणे हाच कार्यक्रम काही चोरांच्या आयुष्याचे इतीकर्तव्य असावे असे तेच सिद्ध करत असतात.   काश्मीर प्रश्न नेहरूंमुळे ?  मात्र सत्य हे आहे की काश्मीर भारतात आहे तोच मुळात केवळ नेहरूंमुळेच हेच लोकांना माहीत नसते आणि हे सत्य  कागदो पत्री पुराव्यांसहित अभ्यासाकरिता जागतिक पटलावर उपलब्ध आहे..  पण ते सर्वश्रुत होत नाही.. लोकांना याच्या उलट माहिती असते.  असे का बरे ??   याचे कारण काही लोकांना सर्वसामान्य जनतेला  खरे ज्ञान होऊच द्यायचे नसते ... असल्या लोकांचे पालक जे मागची पीढी असल्याने  जनतेत गैरसमज पसरवण्यास सहजच उपलब्ध साधन बनतात,  जे मुळात खरे ज्ञान घेण्यास विशेष उत्सुकही नाहीत आणि ज्यांना काहीच संशोधन, चौकशी, अभ्यास करायचा नसतो. असे आळशी म्हणा, असे बळी पडणारे लोक, जे सहज हे अमानवीय असामाजिक कार्य कळतनकळत करण्यास सहज तयार वा उपलब्ध होतात.  त्यांच्याच कडे असले नेहरू गांधी विरुद्ध गैरसमज निर्माण करणारे प्रसंग आणि...
भरकटलेपण !  किती भरकटलोयत आपण  कुठेही भेलकांडत उडत चाललेल्या, कटलेल्या पतंगासारखे.... वारा वाहायची खोटी, फडफड सुरू.. दिशाहीन फडफड, गंतव्यहीन उड्डाण... स्वाभिमानहीन झेप, क्रूर अमानुष चरणात.. विसरलोयत आपले सामर्थ्य, उखडून टाकण्याचे  क्रुरतेसह त्या चरणांना.. आणि झालोत अगतिक नको त्या पायांशी.. आपल्या सामर्थ्याला नकळत वेसण घालण्यात आली आहे  ध्यानात येऊ नयेत इतके बेमालूम कोश विणलेत,  ते ही स्वहस्ते आपले आपणच.. इतके अमानवी यांत्रिक प्रशिक्षण अगदी गळी उतरवले.... आणि मेंदूत भिनवलेयत आणि तेही विना संघर्ष, नाही का ? काय ते कौशल्य ! आहात कुठे ?  खूपच भरकटलोयत आपण... उठा जागे व्हा, आता तरी.. आपली जबाबदारी ओळखा आता तरी..    *अँब्रोस चेट्टियार*
  भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मृतींना वंदन 🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹 भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात आपले अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसेच स्वातंत्र्य संग्रामातील गांधी नेहरू यांनी विचारपूर्वक पकडलेले अंगिकारलेले भगवान बुद्धांचे सूत्र, महात्मा ज्योतीबांचे चौफेर मार्गदर्शक क्रांतिकारी तत्व, आधुनिक विचारांची लखलखीत जागतिक बैठक आणि बाबासाहेबांच्या, दलीत समाजाला एकत्रित ठेवण्याच्या प्रयत्नांच्या प्रक्रियेतील साम्यवादी विचारांच्या एकत्र वाटचालीमुळे तात्कालिक क्रांतिकारी बदल दिसून आले.. पण साम्यवादी लोक विभूती पूजेस नाकारून विकासाच्या शक्यत्या सर्व वाटा चोखाळण्याचे कसून प्रयत्न करतात. अर्थात तसे व्हावे हे अपेक्षित . पण तिथेच नंतरच्या काळात अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.. आणि त्याचा फायदा अर्थात नेहमीप्रमाणे टपून बसलेले न चुकता घेतात आणि ते आज समाज कुठे घेऊन चालले आहेत याचे डोळसपणे अवलोकन केले तर असे दिले की .... बहुसंख्य समाजाने काहीच विचार करण्याची तसदी न घेता आपले दावे त्यांच्या हाती देऊन अविचारी निश्चिंत पत्करली आहे .. आज आपल्या स्मृती दिनी बाबा मी हे आपल्या समोर मांडतो आहे आणि विचारत...
  किती भयंकर वळण घेत आहे देश माझा किती भयंकर वळण घेत आहे देश माझा सहिष्णू, करुणामयी, आतिथ्यशील देश माझा  क्रूर, हिंसक, विचार कधी त्यागणारा देश माझा  आज संकोच पावून सीमाबद्ध असीम तो जाती-पाती, प्रांतभेद त्यागणारा देश माझा  आप निसर्गची होतो पृथ्वी चालनास सज्ज  धरा सुजल सुफल सस्य शामलाचा राजा पाही हवे नको जगा देई जगण्यास उर्जा  होतो विश्वंभर सार्थ सदा आहे देश माझा
एक प्रश्न        एकच  प्रश्न पडतो की ... ह्यांचे अंतिम ध्येय काय असेल बरे ?  ज्या आपल्याच भूमीत (जर हे खरे असेल) तर युगपुरुष साक्षात भगवान श्रीकृष्ण सुद्धा लयाला जातो. त्याची वंश पालक द्वारका होत्याची नव्हती होते.  तिथे सामान्यांची काय कथा.. जिथे प्रत्यक्ष थोरल्या महाराजांनी आपल्या ह्या बांधवांना डोळ्यात अंजन घालण्याच्या मिशाने तीन तीन वेळा अद्दल घडवावी लागते तरी आज ही शेपूट वाकडे का ? ..  की त्याचा बदला म्हणून आज मुंबई महाराष्ट्राचे वैभव पळवून आपले घर भरत आहेत ?? .. मग तो परदेशी गझनीच्या महमूद काय वेगळा होता ? की त्याचेच वंशज हे.. चुकून सोडून गेलाय तो....hmm ????             युगानुयुगे गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या या भूमीवर आपल्या  भारताच्या नागरिकांना एक नाही तर एक बाह्य शक्ती पोटात शिरून आतून पोखरून त्रस्त का करत असेल बरे ? आपलेच लोक , लोकांच्या विचारांना कसे व का बळी पडत असतील बरे ? आणि अंती आपल्याच बांधवांना आपण कसे काय इतके नाडू शकतो?  हे असले कसले खूळ आहे जे आपसातच श्रेष्ठत्व सिद्ध करायची खुमखुमी न...