मी आहे... असे सांगणारा एक विचार पाया, पंखांना किती बळ देतो ते आकाशात निवांत झेपावणाऱ्या पाखरांना विचारा .. त्यांच्या पायाखालची फांदी, जमीन तिथेच असणार आहे हा किती मोठा दिलासा आणि बळ असते हे शब्दांत सांगता येईल का... आपण कोणासाठी जमीन होणे, फांदी असणे, घर असणे बळ होणे ही किती मोठी गोष्ट आहे हे ज्याचे त्यालाच माहीत... परंतु ह्या सर्व गोष्टींची आबाळ ज्यांना आहे ते स्वतः मात्र जेव्हा दुसऱ्यांचा आधार बनतात तेव्हा अभिमान वाटतो.. असे खूप जण असतात.. आपल्याकडे आपल्या कमतरता झाकून विसरून किंवा आपल्याला मिळाले नाही ते दुसऱ्याला मिळण्याची नक्की व्यवस्था करण्याचे प्रयत्न करणारे देवदूत बनून जगणारे पाहिले की खूप खोलवर त्याच्या खुणा उमटतात.. माझ्या आयुष्यात असे देवदूत खूप आहे.. खूप खास आहेत ते काहींनी अगदी हृदयात जागा केली आहे तर एका देवदताने तर माझे अख्खे हृदय व्यापले आहे काबीज केले आहे.. आणि आता मात्र मी तेथे उरलेलो नसून त्यानेच माझे मी पण लेऊन त्याचे आ...
पोस्ट्स
जानेवारी, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे