पोस्ट्स

जुलै, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
असे आयुष्य असते  ते जगावेही लागते  कित्येक जण असे जगत असतात.. आपण पहावे लागते ..तेव्हा ते दिसतात ते असतात, ते जगतात..  असे आयुष्य असते ..  तुम्ही पाहिले म्हणून जाणले..  आपली माणसे आपली माती  आपल्या माणसांची माती  आपल्या मातीतली माणसे .. सर्व सर्व असते डोळ्यादेखत असते  पण कळत नाही  वळत नाही  मुद्दाम समजून उमजून पहिल्या शिवाय  ते दिसत नसते  पण असे आयुष्य असते आणि ते जगणारी माणसेही असतात..  ते असेच विरघळून जातात आपल्या मातीत .. एक दिवस .. मातीतून जन्म घेऊन पुन्हा मातीत मिसळतात.. कोणालाही काहीही न सांगता सवरता. ... .....   

माय मराठी

  माय मराठी थोर मायेचे गा बोल  राखे मानवाचे शील अशा उत्तुंग भाषेला  लाभे संत जण मेळा भले थोर आले गेले त्यांच्या निशाण्या सांडल्या त्यांच्या बखरीत गुण  गाती इथल्या चांगल्या इतिहास साक्षी झाला  गोड मराठ्यांचा मेळा जगदूर कीर्ती झाली  माझा राजा वाखाणला माझी संताई मुक्ताई विश्व जाणतो ज्ञानाला नाही भेद सान थोर ज्ञान बुद्धीचा भुकेला परी का हे विपरीत  घडे अज्ञानाचे कोडे  बुद्धी निर्मिक निर्मीत तरी भुताचे वावडे   कुणी दीन हून आला कुणी कला दावायाला दिली ओसरी परक्याला ताटातला घास दिला येई जाई त्याचे गुण गाते मराठी आपली  कोण सख्याचे सोयरे  जाण नाही मनी केली काय परतावा दिला भल्या यजमाना टोला भलाईचा काळ गेला कोण पुसे याचकाला कोणी आतून पोखरे  कोण पाठीशी दे घाला कोणी शब्द लाथाडोनी देतो डागण्या पोटाला उलटला अतिथी का  चूक कोण काय बोला माझी मराठी भाबडी  कशी फसते खोट्याला         © अंब्रोस चेट्टियार