तो आलाय
#BharatJodoYatra #नफरतछोडोसंविधानबचाओ तो आलाय तो आलाय तुझ्या दारात तुझ्या गावात पंचक्रोशीत दुमदुमतंय नी तो, पुकारतोय तुला ठोठावतोय तुझ्या मनाची कवाडं जागं करतोय तुला नी तू झोपलायस् झापड घेऊन ऐकतोयस् सावधपणे तुझ्या मनात भरलीयेत किल्मिशं दाटलीयेत जळमटं कित्येक दशके ऐकून ऐकून विषाक्त झालेत तुझे कान. तुझ्या मनात फुलतोय अंगार, तुझ्या जिभेवर काटे फुलतायत त्याच्यासाठी आणि तो निशस्त्र होऊन आलाय. त्याच्याकडे आहे शस्त्र प्रेमाचं, करुणेचं, नी अदबीचं. तो तुझी वाट पाहतोय, त्याच्या नजरा शोधतायत तुला. तो बघतो मान उंचावून, असशील तू समोर म्हणून तो वळून बघतोय डावीकडे, नी उजवीकडेही.. वाहत्या दुतर्फा भावनांच्या कल्लोळाकडे पाहतोय तो समाधानाने आणि कृतज्ञतेने ही. तो कवेत घेत चाललाय, दोन्ही हात उंचावून उघडून सर्वाना हक्काचा खांदा देत, सर्वांना हक्काची छाती देत. कोणी डोके ठेवतेय त्याच्या छातीवर, दंडावर, बाहूवर कोणी हात धरतेय त्याचे, कोणी त्याला पोटाशी धरते आहे. तो पुसतो आहे त्यांचे क्षेम कुशल. कोणी ...