पोस्ट्स

मार्च, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
 पहाटे मनात अचानक असे काही उमटते .. त्याचा कार्यकारण भाव काही केल्या उमगत नाही.. तसाच आजचाही प्रसंग... मनात एक नाव उमटले..  पहाटेची लगबग त्यात ही रुंजी.. धन्या...  धनंजय कुलकर्णी हे ते नाव..  कॉलेजात अकरावीच्या वर्षात हे नाव खूप चर्चेत होते अर्थात मुलींमध्ये ...  आमच्याच वर्गात होता तो पण वर्गातील एक विद्यार्थी यापलीकडे आपल्या डोक्यात दुसरे काय असणार अकरावीची तरुण मुले आम्ही तर आम्ही  .... तर वाड०मय मंडळाचे सदस्य आम्ही आपल्या कामात तसे गर्क असू..  त्याच वेळी ही चर्चा कानावर पडे..  काय दिसतो ..   घारे डोळे कुरळे केस.. गोरापान वगैरे..  पाहीले तर विशेष असे वाटायचे नाही. पण वरील गुण होते मात्र उंची साधारण तर अधिक लक्षात राहण्याचे कारण माझ्या गावात, पातलीपाड्यात  एक मोठी जागा भिंतींनी अडवलेली अशी होती.. तिथे दोन भाग होते एक पारसी बंगला आणि एक बानू नरी बाग ..पारसी बंगल्यात आयुक्तांचे निवास स्थान असे तर शेजारी तर त्या बागेत एक कंपनी होती ..जेथे काही paper printing paper folding वगैरे कामे चालत ती कंपनी तेथे कदाचित लीझ वर चालत असेल किं...
 उत्सवप्रियतेसारखे मोठे धन नाही..  आनंदी राहावे, सुख वाटावे यात गैर ते काय?  परंतु उत्सवाच्या नावाखाली माजलेले प्रकार हे खरे मानवतेला काळीमा फासणारे आहेत त्याबद्दल जागृती होत राहणे आणि त्यावर पालकांचे, मोठ्यांचे, विचारवंतांचे, जाणकारांचे,  कायद्याचे, शासनाचे, समाजाचे सयुक्तिक, मानवतावादी प्रयत्न होणे , नियंत्रण राहणे आवश्यक आहे. बाकी राजकारण्यांनी त्याचे काय करवून घेतले आहे ते वेगळे सांगायला नको आणि समाजाने त्यांच्यामागे लागून आपली काय अवस्था करून घेतली आहे आणि एकूणच देश किती अधोगतीला नेला आहे हे काही वेगळे सांगायला नकोच...