अंधश्रद्धेचा नाश करा
अंधश्रद्धेचा नाश करा श्रद्धेचा अन अंधश्रद्धेचा घोळच करू नका उघडा डोळे अविचाराला बळीच पडू नका जीवन आपले बहुमोलाचे व्यर्थ करू नका प्रश्न विचारा अर्थ जागवा अनर्थ करू नका ......हो हो अनर्थ करू नका कुणिही यावे ज्ञान पाजळुन भुलवावे जनतेला कमकूवत मन अंधपणाने मूर्ख पंगू मग झाला गोरगरीब ही खितपत जनता भुलते चमत्कृतीला चमत्काराचे बिंग फोडण्या सज्ज व्हा शिकण्याला .......या या सज्ज होऊ शिकण्याला इंधन नसता दिवे पेटती भुताटकीचे भय माजे कधी तुम्हाला प्रश्न पडे का शोधू घडले असे कसे दूध वाघिणीचे असता मग अंधश्रद्धेचे विष का प्या-2 विज्ञानाची कास धरा अन अंधश्रद्धेचा नाश करा -2 .......© अँब्रोस चेट्टियार, अंनिस कार्यकर्ता ठाणे शहर.