मीटिंग रिपोर्ट : *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा* जय हिंद साथी, आपल्या ठाणे शहर शाखेची पाक्षिक बैठक संपन्न. *माई वंदना शिंदे , अध्यक्ष ठाणे शहर.. यांच्या अध्यक्षतेत, आदरणीय सदस्य माया जाधव , अजित डफळे, अँब्रोस चेट्टियार इ. सदस्यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक २३एप्रिल २०२३ रोजी संपन्न बैठकीत खालील विषयांवर चर्चा झाली 👉प्रा. एन.डी.पाटील वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन अभियान कार्यक्रमांचा आढावा घेवून माहिती दिली. येत्या शैक्षणिक वर्षात पुढील नियोजन करण्या साठी आपल्या जवळच्या शाळांना भेटीचे आवाहन केले. 👉पुस्तक वाचन- पुस्तक वाचनाचे महत्व सांगून लेखक सूरज एंगडे यांचे *cast matters* ya त्यांच्या पुस्तकाची ओळख करून दिली .. 👉सदस्यता नोंदणी अभियानास सुरुवात करण्याचे *आवश्यक प्राथमिक नियोजन केले गेले. त्याकरिता 30तारखेला सायंकाळी 5 ते 7दरम्यान भेटायचे आहे . ( अधिक माहिती करिता अध्यक्षांना संपर्क साधावात.) 👉 वार्तापत्र सदस्य तेचे महत्व पटवून देत वार्तापत्राचे वाचन व त्यावर चर्चा करण्यास थोडा वेळ द्यावा याचे नियोजन...
पोस्ट्स
एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

भाज्या तो सुच्या *ग्रीष्म ऋतूतील दिव्य ज्ञानप्राप्ती* माथ्यावर आलेल्या सूर्याच्या प्रभावाने आपल्या अनवधानाने वृक्षमुक्त क्रीडांगणावर स्थापित केलेल्या आपल्या द्वीचक्रीयानावर त्वरेने आरूढ होताच त्वरित मूलाधार चक्र जागृत होऊन कुंडलिनी शक्ती सर्व चक्रांचे तीव्रतेने भ्रमण पूर्ण करून थेट सहस्त्रार चक्राला क्षणात भेदते आणि सर्वत्र ज्ञानप्रकाशाचा संचार होतो.. सर्वांग रोमांचित होते, घर्मबिंदू सर्वांगावर उमटून प्रवाह धरतात आणि बुद्धी अतीद्रुत गतीने निर्णय घेवू लागते ज्ञानाची महिमा थोर.. परंतु सूर्य जसजसा पश्चिमे कडे कलू लागतो तसतसे त्या ज्ञानाची तीव्रता आणि प्राप्त झालेले बहुमोल धडे ही अनंतात विरून जातात .. असे हे दिव्यज्ञान मृत्यू लोकात ग्रीष्म ऋतूत प्रतिदिनी सुर्याचा निसर्ग कुंडलीत दशमात प्रवेश झाल्यावर नित्य प्रत्ययाला येते.. किती दिव्य ते ज्ञान ! काय तो चमत्कार ! .... 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रिपोर्ट : ठाणे-गोरेगाव दिनांक : १४, १५ आणि १६ एप्रिल२०२३ रोजी अभिमान मित्र परिवार संस्थेने अ. भी. गोरेगावकर हायस्कूल या मराठी शाळेच्या प्रांगणात आगळेवेगळे प्रदर्शन घेतले. 'आपल्या मराठी शाळा वाचवणे' असा उदात्त हेतू या प्रदर्शनामागे होता. माजी विद्यार्थी आणि पालक वर्ग या आयोजनात , उत्सवात हिरीरीने सहभागी झाले. विविध खाद्य पेय पदार्थ आणि ईतर बऱ्याच वस्तूंचे प्रदर्शन विक्री स्टॉल्स तेथे होते. सालाबादप्रमाणे *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे शहर आणि मुंबई शाखेचे संयुक्त* स्टॉल थाटले होते. अंनिस प्रकाशन आणि चळवळीची पुस्तके तसेच चमत्कारातून विज्ञान सादरीकरणातून लोकांशी संवाद अश्या स्वरूपाचे सेवा - कार्य स्टॉलवर होते. *स्टॉल वरील अतिमहत्त्वाच्या पुस्तक विभागाचे माहिती, सदस्यता आणि विक्रीचे महत्त्वपूर्ण कार्य ज्येष्ठ सदस्य लांजेकर सर , सुतार सर, आणि नितांत पेडणेकर सर यांनी चोख पार पाडले. *ज्येष्ठ अंनिस कार्यकर्ते माई वंदना शिंदे यांनी चमत्कारातून वैज्ञानिक दृष्टीकोन हा भाग आपल्या साथी सदस्य अजित डफळे, कल्पना चेट्टियार आणि अँब्रोस चेट्टियार यांच्या साथीने साद...
स्त्रीपुरुष
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
स्त्रीपुरुष भेदअभेद नर, मादीच्या आयुष्यात कायम शेवट म्हणूनच उगवत असतो निदान ज्ञात इतिहासात तरी तो तसाच दिसतो ... तिची तीच जीवनगाणे गाते तिची तीच पर्वतासम विशालकाय होते नी अडवते पुरुषालाच वाहून जाण्यापासून सुद्धा ... हो हो कायम फक्त नावाच्या पुरुष परंतु मुळातल्या अंता साठी, मुळातल्या मरणासाठी... त्याला ? ती भाळते, भाळते गुंतते पुरती त्याच्यात ती त्याचीच होते समर्पित होते त्याला.. आपली उंची त्याला देते.. आपले गांभीर्य त्याला देते आपली मोठेपण त्याला देते आपली ऐश्वर्य त्याला देते आपली खोली त्याला देते आपली भव्यता त्याला देते नी त्याला अमर्याद करते त्याला मोठे करते त्याला शहाणे करते , आणि फसते इथेच ती... तो तिला नाडतो, गंडवतो, गुंगवतो, फसवतो पुन्हा पुन्हा नी सतत हे सहज जमते त्याला तीही फसत जाते पुरती त्याला उपरती होत नाही तिला. अगदी थोडेसेच काही काहीच सूर्यही असतात धगधगते आपल्या, तिच्या चंद्राच्या प्रकाशाचे ही सोनचांदणे करून थक्क करतात विरळे तिलाही सूर्य करून एकत्र तळपत राहतात विरळे जग...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रिपोर्ट : दिनांक :३० मार्च २०२३ स्थळ : किल्ले शिवनेरी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या आगळ्यावेगळ्या भेटी गाठी विशेष सदरात मोडणारा आजचा अहवाल हा पूर्णतः भावनिक आणि त्याच वेळी सामाजिक जाणीव रुंदावणारा ठरेल याची खात्री आहे. म.अंनिस ठाणे शहर अध्यक्ष , ज्येष्ठ सदस्य माई वंदना शिंदे यांनी म.अंनिस ज्येष्ठ सदस्य श्री अरुण रणदिवे आणि श्रीमती कौसल्याताई रणदिवे यांची भेट घेवून पुढे म.अंनिस ज्येष्ठ सदस्य प्रख्यात चळवळ गीतकार कवी श्री एस. एस. शिंदे आणि श्रीमती सुमनताई शिंदे यांना भेट दिली.. हीच एक पर्वणी होती .. कार्यकर्त्यांची खूप दिवसांची ही भेट खूप जिवाभावाचे संबंध चौकशी विचारपूस आणि खूप गप्पा हा मुख्य कार्यक्रम होता शिंदे सरांनी पुढचा कार्यक्रम आखला होता शिवनेरी किल्ला भ्रमण आणि शिवनेरी डोंगरातील रम्य लेणी दर्शन असा भरगच्च कार्यक्रम .. परंतु अंनिस कार्यकर्ते आणि सामाजिक विषय अस्पर्शित ? हे होणे नाही... जवळच्याच दुर्बल घटकातील मुलींसाठी निवासी शासकीय आश्रमशाळा हीच एक अभिनव संकल्पना आहे . ती राबवणाऱ्या आश्रमशाळेतील शिक्षक शिक्षिका आणि गृहपाल मॅडम यांच्या सहकार्याने आणि...