पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विवेकी मशाल की लुटीचा टेंभा

विवेकी मशाल की लुटीचा टेंभा मातीचा रोष ओढवून घेणे म्हणजे काय असते हे ज्याला  चांगलेच कळते त्याच्या डावपेचाचा हा भाग आहे...  भले तरी देऊ कासेची लंगोटी  मात्र  नाठाळाचे माथी हाणू काठी  असा बाणा ह्या मातीचा  हे मात्र पक्के जाणलेला चतुर तो काय करणार नाही ?  तापलेल्या वातावरणात आणखी वरून वाढीव इंधन सोडणे योग्य नव्हे,   सर्व स्वाहा होऊ शकते तेव्हा अग्नी थोडा सौम्य व्हावा  या करिता जळण बाहेर ओढायचे व पाण्याचा सपकारा द्यायचा म्हणजे अग्नी शांत व्हायला मदत होते.....  असो  जळणाने ठरवायचे आहे की विवेकी वाटाड्याची मशाल व्हायचे की लुटारुच्या लुटीचा टेंभा...         ©अँब्रोस चेट्टियार

तुम्हीही व्यक्त व्हा

  तुम्हीही व्यक्त व्हा नाही नाही अजिबात गैरसमज करून घेऊ नका मला प्रसिद्ध सुप्रसिद्ध वगैरे काही व्हायचं नाहीये मला माझ्या जवळच्यांच्यात ओळख निर्माण करायची आहे त्यांना कदाचित माझ्या अव्यक्त परिचयामुळे माझ्याबद्दल काही ग्रह झालाय की काय हे पाहायचे आहे असल्यास माझ्यातील काही गुणबिण असलेच तर दाखवायचे आहेत आणि त्याहून महत्वाचं पुढच्या पीढीतील गुण जाणून घ्यायचे आहेत ववत्यांचे ही कौतुक करायचे आहे सांगायचे आहे की कलाकार हा कलेचा चाहता असतो व कौतुकाचा भुकेला असतो ही संस्कृती जपण्याची आपली परंपरा आहे कलाकाराला वय नसते तो प्रकृतीचा बालक असतो त्याला लिंगही नसते कालाच्या पलीकडे पाहण्याची वा कालाच्याही मर्माला भेदण्याची कला त्याच्याकडे असते त्याला मी मुद्दाम शक्ती असे संबोधत नाही कारण बरेच लोक ह्या शक्तीरूपात कलेला सादर करून खऱ्या सच्च्या कलेची वा इतिहासाची नासधूसच करताना दिसतात नावाने मोठे झालेले हे तथाकथित साहेब लोक आपल्या क्षूद्रत्वाचेच दर्शन चोख घडवतात... हंम्म... माझा श्रवण वाचनाचा चिंतनाचा प्रवास माझ्या दैनंदिन रगाड्यातून गेलेला असल्याने माझे बोलणे बहुधा गल्लीबोळातून ,म...

विचित्र चित्र

         विचित्र  चित्र एकीकडे लेखक, कवी, चित्रकार, शिल्पकार,  वा कोणीही कलाकार, दुसरीकडे आई. सगळ्यांचे सारखेच असते न्हाऊ माखू घालून, सजवून, नटवून बाळाला अगदी तयार केले तरी कुठे नाकच पूस कुठे बटच नीट कर कुठे कॉलर कुठे मोजे कुठे बाह्या नीट कर नुसता वैताग आणतात कलाकृतीला..... गरीब बिच्चाऱ्या न बोलता येणाऱ्या कलाकृतिंचे काय ? आणि बालिश आयांच्या अत्याचाराचा तर विचार न केलेलाच बरा म्हणूनच तर भरकटतात कलाकृती समाजातील सुजनांनी शांतीचा रंग भरूनही दंगलीतच त्यांना गंमत येते जिथे उत्तम पालनपोषण असतानाची निर्मिती शंकेच्या कुंपणात फसते.. तिथे अपक्व पोषणाचे काय ?  या पालकांचे, कलाकारांचे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखून शिकणे म्हंजे काय असते यावर प्रबोधन होणे, नित्य होणे, सतत होणे, अवश्य होणे नितांत गरजेचे आहे ... अन्यथा सर्व प्रकारच्या चित्रांतून एकच भडक अर्थ भडकवण्याचाा, रंगांची दुकाने थाटून बसलेल्यांच्या स्वार्थी विचारांचा वाहक बनून प्रवाहित करत राहतील येणाऱ्या पिढ्याही ....   ©अँब्रोस चेट्टियार

बाप नावाला बट्टे

  बाप नावाला बट्टे      असतात असेही जिवास घोर   बनून थोर मिरवतात चोर बाप नावाला बट्टे      मला माहित आहे लेकरांनो तुमच्या मनाला हा प्रश्न पडलाय ना.. सगळेच बाप नसतात बाप .. खरय ते . काही तर असतात हिरण्यकश्यपासारखे , त्यांना मी मी च्या पुढे काहीच कळत नसते. मुलांचे सुखदु:ख , मुलांचे दुखणे,  खुपणे त्यांना हवे,  नको ते पाहणे, ह्याउप्पर असते स्वताचेच सर्व, नी जबाबदाऱ्या शून्य . विचारू नका,  कुठे आहेत, अगदी जवळ आहेत . असले नराधम,  पाहू शकतो केव्हाही आपण . फक्त आपले माणुसकीचे डोळे उघडे ठेवले तर.            काही काही घरात तर आयाही नसतात बरंका सर्वच , यशोदे तुझ्यासारख्या . कैकेयीच जास्त नी हिरण्यकश्यप अगणित.            तसे नसते तर का येतात लहानग्या कोवळ्या मुलाच्या डोळ्यात आसवे नी का मुलांच्या हृदयात जागत नाहीतभाव मातृपितृप्रेमाचे .. उत्सव वा दिवस साजरा झाला की सर्व आलबेल नसते ...

संधीसाधू दरोडेखोर

  संधीसाधू दरोडेखोर अशी संधी दरोडेखोरांना कधी मिळाली नव्हती. आंधळ्या म्हातारीने गोडबोल्यांना भुलून खजिन्याची किल्लीच दिली होती. गोड गोळ्यांच्या मुलाम्यातून विद्वेषाचे जहर इतके बेमालूम लपवले होते की शोधून सापडू नये नी शंका येण्याचे कारणच नव्हते. ते स्पष्टवक्ते की काय असल्याचे पटवत माझ्याशी बोलताना हलकेच सोलून काढत माझ्या विरोधकांना मला सांत्वनेचे ग्रंथ ऐकवत विरोधकांचा सामना झालाच तर त्यांनाही एखादा बोल अलगद लावूुन प्रेमाने चुचकारत नी पुढच्या क्षणी उडवित तोफ माझ्यावरच अचानक झालेला हल्ला स्तिमित करी मला मी हडबडून जात असे पण सांधणे असे त्यांनी कधी केले नाही तोडण्याचेच काम त्यांचे ... ...जोडतील तर नपुंसक ठरतील त्यांच्या स्वमते... प्रत्येक काम , ज्यात शांती प्रस्थापित होते... समता नी बंधुभाव अंतिम ध्येय असते.. असली सर्व कामे ह्यांना निषिद्ध ... पण ते स्वता करणार नाहीत आपल्या कडून भेद पेटवतील फूट वाढवतील वैमनस्याच्या पीकाची कापणी करतील .. समविचारी नतद्रष्ट अमानवी क्रूर लोकांना ह्या घटनांची प्रेरणा घेण्यास लावतील .. नी पुन्हा सुरू राहील ह्यांचा खेळ सत्यानाशी.. मात्र.......

काव्यसंग्रह मोतियाची फुले

 मित्रहो       आपण पुस्तक जरूर वाचा. मला खात्री आहे आपल्याला आवडेल आणि त्यातून एखादे सूत्र ही नक्की सापडेल .... तेवढेच सूत्र आपल्या आप्त, स्वकीय , स्नेही मित्रांपर्यत पोहोचवा अशी प्रेमाची आणि कळकळीची विनंती..  धन्यवाद ! आपलाच  अँब्रोस चेट्टियार  काव्यसंग्रह मोतियाची फुले   ©*अँब्रोस चेट्टियार* नक्की मागवा वाचा नी अभिप्राय द्या .... https://blueroseone.com/store/product/motiyaachee-phule https://www.amazon.in/dp/9356284466?ref=myi_title_dp https://www.flipkart.com/motiyaachee-phule/p/itm963ccf2a25821?pid=9789356284463 काव्यसंग्रह मोतियाची फुले,   *©अँब्रोस चेट्टियार*  एकूण 75 रचना. *Blue Rose Publication* https://wa.me/917208679943 *पुस्तक वाचून अभिप्राय नक्की द्या*

सच्चा माणूस

  सच्चा माणूस दाद द्यावी कौतुक करावे हा खरा सच्च्या माणसाचा गुण ऐकले होते .. तो गुण कमी झालाय  की सच्ची माणसे दुर्मिळ झालीयेत हा प्रश्नन पडला आहे मला        ....©अँब्रोस चेट्टियार

सुधर जाओ

 सुधर जाओ.. जब घिर जाओ अपनी ही मूर्ख करतूतों से  ऐ जाहिलों तब ही जागोगे ?  सारी दुनिया गांधी नही  जो कीचड उछालने पर भी तुमसे सौम्य रहे..  कुछ ज्यादा ही  फायदा नहीं उठा लिया  तुमने गांधी नेहरू का ?  और अपने पर आते ही तुम्हारी सिट्टपिट्टी गुम ,  घिग्गी बंध जाती हैं ?      कुछ ज़ुबान पर ही लगाम कसो  कुछ करनी को भी सुधारो तुम  हमेशा तुम्हे बचाने गांधी नेहरू से फरिश्ते नही आ सकते  शैतानों को अपना नुमाइंदा चुन लेने बाद भी यह उम्मीद क्या लाज़मी है ? अब भी समय है सुधर जाओ,   जनता के दुःखों को दूर करो  जिस जनता के बल पर राज करो  उसका भी कभी सम्मान कर लिया करो...          ...... © अँब्रोस चेट्टियार

मी सगळं सगळं सांगितलंय आईला ....

  मी सगळं सगळं सांगितलंय आईला .... आई मला पाटी आई मला पेन्सिल आई मला दप्तर अंगणवाडी बालवाडी मला आवडते माझे मित्र येतिल चल वेळ झाली भरभर आई मला पाटी आई मला रंग आई मला खडू गाणी झाली खाऊ झाला गप्पा झाल्या अजून कशी आली नाहीस मला येते रडू लबाड कुठली लपली होतीस ना भिंती मागे तू दिसला मला तुझा पदर उडता भुरूभुरू आज किनई खूप आली मज्जा आम्हाला आकडे रंग पाने फुले सर्व अभ्यास झाला हात धरून खबरदार लिहून घेऊ नकोस माझा मीच करणार आता कवर पण पुस्तकाला दप्तर भरून ठेवत जाईन अभ्यास झाल्यावर उचक पाचक केलीस तर चालणार नाही मला सोड हात मी बघ कसा नीट चालतोय आता तुला काही लागले तर सांगत जा मला पैसे मोजायला सुद्धा शिकलोय मी आता कालचे बुक्सचे टू टेन म्हणून तू राँग पैसे दिलेस आज मी लक्षात ठेवून मोजून ते पाहिले... सांगू टेन चे टू नोटस दयायला पाहिजे होतेस .. कशी माझी ग आई तू .. आणि हसू नकोस अशी.. अभ्यास खूप आहे मला चल भरभर  घरी  लेफ्ट राईट, वन टू, वन टू, वन टू ....        ...  ©अँब्रोस चेट्टियार

साने गुरुजी

 ज्येष्ठ गुरुजी श्रेष्ठ गुरुजी  साने गुरुजी  स्मृती प्रित्यर्थ विचार मंथन...     लोकांचा असा गैरसमज असतो की आम्ही अमुक महान व्यक्तीचे विचार मानतो पण आम्हाला गांधी मान्य नाही ... तर मित्रांनो समजून घ्यावे ह्यात लोकांची  चूक तर आहेच कारण ते सत्याचा शोध घेत नाहीत. खरं इतिहास तपासून न पाहता जो कोणी वरवर गोड बोलेल त्याचेच ऐकून त्याच्या मागे जातात..... पण हे गौडबंगाल असते ...त्यांच्यावर नकळत तसले संस्कार केले जातात.  त्यांच्या नकळत तसले विचार त्यांच्या मेंदूत घट्ट बसवले जातात.          परंतु खरे सत्य मोजक्या शब्दात असे आहे की गांधींना विरोध म्हणजे जीवनाला विरोध,  माणुसकीला विरोध,  सत्याला विरोध ...जगातील सर्व सच्च्या महान विचारवंतांना विरोध.. कारण सर्वांचे मार्ग वेगळे भासले, वाटले तरी त्या सर्वाचे ध्येय एकच असते नी आहे ..तेव्हा ..गांधींना तुमचा विरोध असेल तर आताच तपासून घ्या .. आणि तुम्हाला असे सापडेल की कोणीतरी त्यांच्या विचारांचा वाहक तुम्हाला बनवलेला आहे व त्यांचे  खरे शत्रू गांधी आणि नेहरू व त्यांची समानतेची अहिंसे...

अंधश्रद्धेचा नाश करा

 अंधश्रद्धेचा नाश करा  श्रद्धेचा अन अंद्धश्रद्धेचा घोळच करू नका  उघडा डोळे अविचाराला बळीच पडू नका  जीवन आपले बहुमोलाचे व्यर्थ करू नका  प्रश्न विचारा अर्थ जागवा अनर्थ करू नका            हो हो अनर्थ करू नका ...                कुणिही यावे *ज्ञान पाजळुन भुलवावे जनतेला  कमकूवत मन अंधपणाने मूर्ख पंगू मग झाला  गोरगरीब ही खितपत जनता भुलते चमत्कृतीला  चमत्काराचे बिंग फोडण्या सज्ज व्हा शिकण्याला                  या या सज्ज व्हा शिकण्याला                   इंधन नसता दिवे पेटती भुताटकीचे भय माजे  कधी तुम्हाला प्रश्न पडे का शोधू घडले असे कसे  दूध वाघिणीचे असता मग अंधश्रद्धेचे विष का प्या विज्ञानाची कास धरा अन अंधश्रद्धेचा नाश करा.. विज्ञानाची कास धरा अन अंधश्रद्धेचा नाश करा..             .... ©अँब्रोस चेट्टियार , ठाणे 6/6/22 . अंनिस ठाणे,  अंधश्रद्धा निर...

कृष्णकुमार कुन्नथ

कृष्णकुमार कुन्नथ मैं हमेशा सोचता रहता कि वो ऐसा होगा वैसा होगा मगर कभी टटोल कर देखने की फ़ुरसत ना हुई क्या है कैसा है सुहाते थे लफ़्ज तुम्हारे और सुर भी घर बसाते थे मनमें गहराई तक मगर ऐसी बेचैनी और तडप कभी पैदा नही हुई कि पता करूँ कि कौन गुनगुना रहा है ये गीत मेरे ही मनका इतना क़रीब हो गए थे तुम तुम्हारी साधना गज़ब रही होगी लोग मजबूर कर देते हैं पलट कर देखने के लिए कि कौन गा रहा है ज़रा देखें तो सही मगर क़सम से तुम्हारे बारे मे मुझे ऐसा कभी नही लगा लगता मानो मेरा  दिल ही तो गा रहा है बाहर क्या ढूँढना मै ही तो हूँ इतना भी कोई तिलिस्म चलाता होगा इसका आज अहसास हुआ आज टूटा वो जादू का घेरा न जाने क्यों  रात भर नींद ही नही आई भोर के पहले पहले पता चला कि हाय ईक तारा टूटा है अंतिम पल तक जो खनकता रहा लगातार बार बार और मैने ढूँढा तुम्हारा अक्स पागलों की तरह और पाया बेबस अपने आप को कि हाय इस फरिश्ते से अनजान रहा मेै ? कभी भी मैने पहल नही की जानने की जिसके बारें मे आज वो भी इतना तडपा सकता है ?  क्यों नही ? आखिर इस जहाँ की जरूरत के ही बारे मे तो हमें वो चेताता रहा...