बापरे किती तरी .. माझे बालपणी आठवड्याचा बाजार करण्यासाठी मी ठाण्याला जात असे .. सर्व सामान घेऊन परतताना 50पैशाला मिळणारे पुस्तक शोधून तेवढी घ्याची असा बेत असे ..मग जादूचे कमळ आणि राक्षस , सोनेरी पिंजरा ... असे चमत्कारिक कथांचे कित्येक खरेदी केले ...मग त्यानंतर मासिक म्हणून चांदोबा हमखास मराठी संपले की हिंदी घ्यावे .. नंतर चित्रलेखा असा प्रवास खाऊच्या पैशातून .. 50 पैशांपासून सुरू होऊन हा प्रवास नंतर शंभर दोनशे पर्यंत आणि पुढे मराठी ग्रंथ संग्रहालय सभासदत्व वगैरे पर्यंत पोहोचला ..नी hmm पुढे हा प्रवास खुंटला ... विशेष जवळीक राहिली नाही ..कित्येक वर्षे . खूप हृदयद्रावक वर्षे गेली ती ..आता पुन्हा पुस्तकांच्या जवळ येत आहे .. आणि साक्षात बालभारती ची सोबत मिळाली आहे ..केवळ अवर्णनीय!!!!!
पोस्ट्स
एप्रिल, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अनेक महात्मे वा महान लोक ,क्षेत्र कोणतेही असो मग , घडले घडवले गेले. त्याबद्दल थोडा डोळस विचार करूयात .. त्या त्या , *देश काल परिस्थितीनुसार* असे म्हणायची पद्धत आहे. परंतु त्यात समाज आणि सहायक..इत्यादी असे जोडून पूर्ण करायला हवे ते असे देश, काल परिस्थिती, स्वयंप्रेरणा, समाज, आणि सहायकानुसार महात्मे होऊन गेलेले आहेत. आता ही काय भानगड आहे बरं? तर लक्षपूर्वक पाहिल्यास आपल्या लक्षात हे सत्य आणि त्यातील तथ्य आल्यावाचून राहणार नाही. स्वयम् प्रेरणेने घडलेले महात्मे सोडले तर बाकीचे महात्मे त्यांचे छान मार्केटिंग संबंधित लाभार्थी गट करत असतात असे आढळेल. हे काहीतरी खूप विचित्र आणि धाडसाचे वाटते आहे ना ? पण पहाच तुम्ही हे असेच असते. प्रकृती, भूतदया, समाज, जागृती , इत्यादी अनेक विषयावर काम करणारे अनेक आदरणीय महात्मे होऊन गेले आहेत , आहेत.. त्या सर्वानाच नमन.. हे जे काही वर चर्चिलेले आहे ते सविस्तर कळण्यास समजण्यास कोणतेही दोन महात्मे घ्या आणि त्यांचा जीवनपट जुळवून पहा त्यावर विचार करा.. कार्यकारण भाव आणि त्या त्या घडामोडीमागील प्रेरणा वा सहाय्यक शक्तींचा शोध घेतला तर बर...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शहर शाखा. वृत्तांत शनिवार, दिनांक :13 एप्रिल 2024 समता विचार प्रसारक मंडळ ठाणेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात म. अंनिसचा वैज्ञानिक दृष्टीकोन कार्यक्रम सादर. सालाबादप्रमाणे समता विचार प्रसारक मंडळाचे आजी माजी एकलव्य विद्यार्थी आणि कार्यकर्ते यांचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि निवासी शिबिर दिनांक 13एप्रिल 2024 ते 16 एप्रिल 2024दरम्यान आयोजित असून पार पडत आहे. विविध कार्यक्रमांच्या आयोजनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार हे आपले शैक्षणिक आणि संवैधानिक ध्येय , उद्दिष्ट आणि राष्ट्रीय कर्तव्य याची यथोचित जाणीव ठेवून संस्थेने *म.अंनिसचे चमत्कारातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचे सप्रयोग व्याख्यान आयोजित केले होते.. अंनिस ज्येष्ठ कार्यकर्त्या माई वंदना शिंदे यांनी कार्यकर्ते अजित डफळे यांचे समवेत कार्यक्रम सादर केला. सुमारे 35 विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे प्राचार्य शिक्षक शिक्षिका आणि स वि प्र मं चे कार्यकर्ते असा सर्वांनी कार्यक्रमात समरसून सहभाग घेतला. काही विद्यार्थ्यांनी माईंना आपल्या शाळेत कार्यक्रमास पाहिल्याची ग्वा...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
* महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा. * वृत्तांत : मंगळवार, दिनांक 09 एप्रिल 2024 रोजी, कुसापुर-चिंचवली, भिवंडी. * सामाजिक बहिष्कार, भेदभाव, अमानुष वागणूक इत्यादी प्रकाराविरुद्ध तक्रार . * अर्जदार रामचंद्र शेलार, राहणार पनवेल. शिक्षित, नोकरी व्यवसाय निमित्त पनवेल येथे वास्तव्य. त्यांचे पालक मातापिता कोयना धरण प्रकल्पग्रस्त विस्थापित म्हणून ईतर कुटुंबांसोबत शासन निर्दिष्ट वसाहत म्हणून भिवंडी येथील चिंचवली जवळील कुसापुर या ठिकाणी 1962 साली येऊन वसले. ही सर्व कुटुंबे शेलार आडनावाची आहेत.. आज घडीला साधारण 80 बऱ्यापैकी नीटनेटकी घरे या वस्तीत आहेत. गावात सर्वासाठी मंदिर सभामंडप , शाळा सर्व काही आहे. .... गावातील काही तीन चार कुटुंबे शेलार असून पाटील असे नाव लावतात. पूर्वापार पुढाकार घेऊन गावचा कारभार पाहत असावीत. परंतु गेली काही दशके सदर पाटील कुटुंबाची मक्तेदारी आणि वर्चस्व गावकऱ्यांना जाचक होऊ लागलेले दिसतात. गावात दब्या आवाजात याबाबत नाराजी आहे . शिकले सवरलेले लोक विरोध नोंदवतात तेव्हा दुरूत्तर...
Spring
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
It's painful to see somebody in pain And suffering Good humans Try to be with in empathy what else could be the offering Some share some wouldn't sometimes some avoid to relive suffering So let them take their time let them relax In hope and wish them to bloom in happiness and flow and spring 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तू
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
तू रमतोस तू फुलातुनी रमतोस तू खडकातही रमतोस तू जिवातुनी रमतोस निर्मितीतही जगणे तुझे स्मरावे मृदेतूनी फुलावे हा देह झिजविशी असा मृदेत प्राण ओतुनी तुझ्यात दंभ कोठला तुझ्यात मीपणा नसे वाताजळाशी एक हो वसतोस तू मनांतुनी शंकांचे घोर बाहुले मज मीच पारखीतसे निशंक तू हवास तू निर्व्याज प्रेम वाटुनी मी भेद शोधतो आहे मज सापडे न काही रे पूर्णात पूर्ण जाहला माझाच अंश होऊनी © अँब्रोस चेट्टियार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा* पाक्षिक बैठक वृत्तान्त *रविवर दिनांक 31मार्च 2024* रोजी सायंकाळी 5वाजता माई वंदना शिंदे यांचे निवासस्थानी झालेल्या मीटिंग मध्ये. 👉 गेल्या आठवड्यांतील ठळक घडामोडींविषयी चर्चा झाली. मुरबाड येथील हादरवून टाकणारी घटना त्याचा पाठपुरावा आणि पीडित कुटुंबास न्याय मिळवून देण्यास अंनिस च्या यशस्वी प्रयत्नांची माईंनी माहिती दिली.. 👉 *पुढील पाक्षिक बैठक दिनांक महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी म्हणजे 14एप्रिल रोजी घेण्याचे नियोजित आहे.* 👉 पुस्तक वाचन या सदरात संजय रेंदाळकर यांचे संकलित सत्यशोधक या पुस्तकाचे जोतिबांच्या विचारधन हे सदर वाचले. 👉 चळवळ गीत गायन सदरात डॉक्टर दाभोलकरांचे अभिवादन गीत गायिले गेले . 👉 संस्थेविषयी माहितीपूर्ण सदर संस्थेचे कार्य कायदा झाल्यानंतर ची उल्लेखनीय कामगिरी आता पर्यंत पकडलेल्या बाबा बुवा यांच्या पैकी जवळ जवळ 80% बाबा लोक हे गैर हिंदू आहेत .. यावर चर्चा झाली.. 👉 ऐनवेळी उपस्थित विषय संबंधी.. सोशल मीडिया प्रशिक्षण विभागाच्या शिबिराची माहिती आणि त्याकरिता सह...