पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

डोळे उघडा, भारत जोडा....|

  डोळे उघडा, भारत जोडा....| ज्या गांधीने उपोषणाचे शस्त्र आपल्या हाती दिले त्या गांधीचे गंगेकिनारी असलेले जगप्रसिद्ध, रेल्वे कडून रीतसर विकत घेतलेले सेवा धाम स्मारक नष्ट होत असताना जग हळहळत होते, गांधीवादी जन समुदाय वैयक्तिक आणि साखळी उपोषण करून माणुसकीची मशाल पुन्हा जागवत होते. हे कार्य स्थानिक पातळीवर युवकांकडून झिरपत समाजात जाऊ लागले ही होते..परंतु पुन्हा तसली एकी जनतेत झाली तर राजकारण्यांच्या उरावर बसेल हे ओळखून खाडकन जागे झालेल्या बुळग्या नेत्यांना ,  पद्धतशीरपणे आपले बस्तान टिकवण्याकरिता त्याच उपोषणाचे तंत्र वापरणे बरोब्बर जमते... नी जनभावनांना वेळोवेळी हायजॅक करून देशातील महत्वाचे पेटते प्रश्न कसे गार करायचे हेही चांगले जमते . जमत नाही ते काय तर खर्रीखुर्री समाजसेवा.. हंम.. याच खेळीतील काही घटनांचे साक्षीदार आज आपण सर्व होत आहोत. पण , पण अशाच वेळी तर आपली सदसदविवेक बुद्धी जागृत राहावयास हवी ना. आपण आज नेमके काय वाहतोय ते योग्य की अयोग्य ? .....हे आपापल्यापुरते तरी स्पष्ट व्हायला हवे. म्हणजे येणारा काळ आपल्याला योग्य न्याय देऊ शकेल.. बसइतकेच .. डोळे उघडा, भारत जोडा.....

परतफेड

परतफेड त्या ज्वाळांच्या मुखावर बसलेल्या एकएकाला  परावृत्त करण्याच्या नादात  आपले पाय पोळत असतानाही  केव्हा ज्वाळामुखावर पोहोचलो कळलेच नाही  आणि ते छद्मी , ते छद्मी पलिकडे पायउतार होऊन  त्याच ज्वाळा भडकविण्यासाठी  प्रचंड जोमाने आसुरी आनंदात  इंधन सारताना दृष्ट होत आहेत.  वाह वाह काय ही परतफेड !    *अँब्रोस चेट्टियार*

नको रे मना

  नको रे मना नको रे मना,  आज वाटे  ऊंच तुझी भरारी आज वागताहे  स्वतःच स्वयेचि  सोडून पायरी आज नको वाटे  स्वप्नांची उड्डाणे  आज मन वाहे  शोधित उभारी |   ...नको रे मना,  आज वाटे ऊंच तुझी भरारी दृष्ट नाही आज  मानव्य जगात  मायेस मुकली  पाखरे रणात  बोडके नभाचे डोईवरी छत पाउले रुतली  राखेच्या ढिगारी | ...नको रे मना,  आज वाटे ऊंच तुझी भरारी धास्तावले श्वास  नाही दिसे थारा कोवळ्या फुलांच्या ऊर फोडी कळा नजरे भकास शोधिती पालका त्यांस तात माता आता न भेटती  ..नको रे मना,  आज वाटे ऊंच तुझी भरारी मोडले घरटे  विस्कटले रान छत्र कुटुंबाचे  हरपले त्याहून का मोठे  अभय कुणाचे  बाप माय मोठे साम्राज्याहुनी ..नको रे मना,  आज वाटे ऊंच तुझी भरारी केवळ विसावा  शोधित जाई  मिळेना उसंत  क्षणभरी एक तू करावे  व्हावे निर्विकार वा बा छळू नये  कोणासही  वा बा छळू नये  कोणासही  वा बा छळू नये  कोणासही  ..नको रे मना,  आज वाटे ऊंच तुझी भरारी   *अँब्...

अहवाल अंनिस कुर्ला गाडगेबाबा शाळा

  *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा.* *वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन कार्यक्रम अहवाल* *स्थळ : संत गाडगेबाबा विद्यालय, कुर्ला-पश्चिम, मुंबई.* दिनांक : 20 ऑक्टोबर 2023 वेळ : सायंकाळी 4 वाजता.   👉 पार्श्वभूमी : या बहुप्रतिक्षित कार्यक्रमाची उत्सुकता आम्हा सर्वांना होती. याचे कारण असे, .....मागे काही कार्यक्रमानिमित्त माई वंदना शिंदे, कुर्ला विभागात गेल्या असताना तिकडे न्यू मिल रोड कुर्ला पश्चिम येथे एक शाळा आढळली. नाव पाहिले तर संत गाडगेबाबा विद्यालय, म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. जाऊन भेट दिली तर समजले की तेथे वसतिगृहही असून महाराष्ट्र भरातून गरजू विद्यार्थी येथे येऊन, राहून शिक्षण घेतात.. अगदी पहिली पासून ते 10 वी पर्यंत शाळा आहे. शासकीय सहाय्यातून चालणारी मराठी शाळा आणि वरच्या मजल्यावर विनाअनुदानित इंग्रजी माध्यम शाळा. ऐसपैस परिसर भर मुंबईत अशी शाळा नी आवार तसे दुर्मिळच म्हणाना. पण, इथे, अगदी कुर्ल्यात, अशी शाळा  आहे खरी.   संत गाडगेबाबांच्या नावाला शोभेल अशी, स्वच्छ, नीटनेटकी शाळा.. सर्व काही जागच्या जागी नी व्यवस्थित. देखणे वर्ग,  योग्य...

14/10/2023

  वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन कार्यक्रम अहवाल. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा. स्थळ : भारतीय विद्या भवनचे भवन्स कॉलेज, अंधेरी मुंबई. दिनांक: 14 ऑक्टोबर 2023.    अंनिसच्या कार्यकर्त्या आणि भवन्स कॉलेज येथील प्राध्यापिका ज्योती मालंडकर आणि त्यांचे सहकारी यांनी आपल्या कॉलेजच्या मराठी वाङमय मंडळ आणि विवेक वाहिनी तर्फे कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थांकरिता विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सर्वपित्री अमावस्यादिनी आणि घटस्थापनेच्या पूर्व संध्येला विशेष विवेक जागृती कार्यक्रम घ्यावा असे स्वरूप होते. जवळजवळ दिडशे विद्यार्थी आणि चार पाच प्राध्यापक अशी कार्यक्रमास शेवटपर्यंत उपस्थिती होती.    व्याख्यात्या माई वंदना शिंदे यांच्याकरिता नवतरुणांसाठी कार्यक्रम घेणे हा नेहमी उत्साहाचा विषय असतो. कारण तेथून पोषक बदल हा निश्चितीची ग्वाही देणारा असतो. माईंनी सर्वप्रथम विद्यार्थांशी संवाद साधला. आणि पित्र, तर्पण विधी, श्राद्ध कर्मे आणि नवरात्रोत्सव, त्यातील पूजा, उपवास विधी त्यामागील विचार यावर चर्चा केली. 👉कोणी म्हणाले उपवासाने बरे वाटते , शुद्धी होते...

उंदीर

 Ohhh my my .... या वरून माझं गेल्या काही वर्षातील निरीक्षण मी नोंदवित आहे ... गेल्या दशकात खास करून इकडे उंदिर मामाचा त्रास खूप वाढला आहे. तेव्हा काय करावे अशा विचाराने विविध उपाय करत करत जेव्हा बिस्कीट किंवा क्रीम tube वा औषध घालून खाण्याचे पदार्थ ठेवले असता.. थोडी खुडबुड झाल्या नंतर लहानग्यांच्या सुळसुळाट पूर्ण बंद होत असे.. आणि मोठे उंदिर वा चिचुंद्री फिरताना आढळत.. आणि ठेवलेले त्यांचे जीवघेणे खाऊ गायब होत वा त्यांच्या जागा बदललेल्या दिसत. आपण मग घेत राहायचा काही उंदिर मरतात का etc पाहायचे .. औषधाच्या तीव्रतेनुसार एक दोन दिवसात तसे पडलेले दिसायचे.. पण आश्चर्य...एकही लहानगे पिल्लू ते औषध खाऊन मेलेले सापडले नाही अजून तरी फक्त मोठे उंदिर वा चिचुंद्रीच फक्त सापडत..  एक दोन वेळा लक्षातच आले नाही ..नंतर मात्र आश्चर्य वाटले आणि सुन्न व्हायला झाले ..घरात त्या विषयावर emotional चर्चाही झाली..  पिलांच्या तोंडी पडायला नको म्हणून विषाची चाहूल लागताच .. मोठे ते सर्व तुकडे जमा करत आणि दरम्यान त्याची विषबाधा होऊन त्यांचे प्राण गमावत असतात हे प्रकर्षाने जाणवले आणि हा पॅटर्न आजतागायत ...

15ऑक्टोबर अंनिस बैठक वृत्त

 पाक्षिक बैठक वृतांत : *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा*  आज रविवार दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता कांचनपुष्प सोसायटी येथे अंनिस सदस्य ज्योती कांबळी यांचे निवास स्थानी झालेल्या पाक्षिक बैठकीत  उपस्थित सदस्य  माई वंदना शिंदे  ज्योती कांबळी पुष्पाताई तापोळे अथर्व लिपारे अजित डफळे कल्पना चेट्टियार अँब्रोस चेट्टियार ☑️पुस्तक वाचन या सदरात सुक्षितांच्या अंधश्रद्धा ह्या पुस्तिकेतील काही पृष्ठे वाचण्यात आली..  ☑️ चळवळ गीत सदरात  आरती  *बोला आज मिळून सारे..*  आणि *शूर गडी तू विर गडी तू*  ही गीते सर्वांनी गाईली.. ☑️हाती घेतलेले कार्यक्रम शाळा आणि सोसायटी तून चमत्कार सादरीकरणातून विज्ञान कार्यक्रम घेणे.. ☑️अंनिस ओळख या सदरात अंनिस कार्याची चतूसुत्री माईंनी सांगितली. या सोबत डॉक्टर दाभोलकर यांचे कार्य कायदा बनवून घेण्यासाठी शिस्तबद्ध मेहनत पाठपुरावा या बाबतीत माईंनी विस्तृत माहिती दिली. डॉक्टरांचा त्याग कार्याप्रती चे समर्पण विशद केले.. माईंचे डॉक्टरांच्या बाबतीत एका शिष्याने गुरू बद्दल जिव्हाळ्याने आदराने सांगणे म...

घडव घडव रे घटना |||

घडव घडव रे घटना ||| जे जे काही घडते  घडविले वा जाते  मोठे होते प्यादे  त्यातुनी | कोण प्यादा  कोण करविता झडकरी ओळखावा  बुद्धिमत्या | जिवावरची घटना  पडताळून पाहावी  आवेग पाहावा रोखण्याचा  की घडण्यास साक्षी | केसालाही धक्का  लागो नये डील  पेरलेला पैसा  वाया जाईल | सर्वतो राजकारण  एकमेव धंदा  सामान्यास वाली  कोणी नाही |      *अँब्रोस चेट्टियार*

प्रेम

हे पहा ना  डोळे उघडुन  आपले ओळखीचे प्राणी पक्षी  आपल्याला पाहताच धावत येतात.. त्यांचे प्रेम कसे उचंबळून येते .. आता तरी डोळे उघडा ना  जगाला हवे आहे प्रेम  आणि तुम्ही बनवतात शस्त्रे ?  प्राणी, पक्षी सर्व जीव प्रेमाची भुकेली  पण तुमच्या कडे फक्त भेद बुद्धी का ?  तुमचा तेवढा स्वार्थ तुम्हाला कळतो?  प्रेमाची साद कळत नाही ? माणुसकीची हाक कळत नाही ?  अजबच आहे तुमचे...  मात्र जाता तिथे शांतीचे पोवाडे बिनचूक गाता  आणि इथे  मृत्यूचा थयथयाट करायला मागे पुढे पाहत नाहीत..  किती हा क्रूरपणा ?  कुठून आणलात ?  कोणी शिकवले तुम्हाला ?  आमच्या पालकांनी, शाळेने, समाजाने असे काही शिकवल्याचे आम्हाला आठवत नाही.. मग हे सर्व तुम्ही शिकलात कुठे ??  आमच्या सारखे सर्वजनसुखाय सर्वजनहिताय गीत तुम्ही बालपणी गाइले नाही काय ?  साने गुरुजींच्या गोष्टी तुम्ही ऐकल्या वाचल्या नाहीत काय?  कुठून आणलात हा क्रूर अघोरी अमानुषपणा ? आज माणसाला प्रेम हवे आहे  आणि प्रेम देणाऱ्यांना तुम्ही गोळ्या देता ?  असे किती दिवस चालणा...

मांजर पोसते उंदिर

 Ohhh my my .... या वरून माझं गेल्या काही वर्षातील निरीक्षण मी नोंदवित आहे ... गेल्या दशकात खास करून इकडे उंदिर मामाचा त्रास खूप वाढला आहे. तेव्हा काय करावे अशा विचाराने विविध उपाय करत करत जेव्हा बिस्कीट किंवा क्रीम tube वा औषध घालून खाण्याचे पदार्थ ठेवले असता.. थोडी खुडबुड झाल्या नंतर लहानग्यांच्या सुळसुळाट पूर्ण बंद होत असे.. आणि मोठे उंदिर वा चिचुंद्री फिरताना आढळत.. आणि ठेवलेले त्यांचे जीवघेणे खाऊ गायब होत वा त्यांच्या जागा बदललेल्या दिसत. आपण मग घेत राहायचा काही उंदिर मरतात का etc पाहायचे .. औषधाच्या तीव्रतेनुसार एक दोन दिवसात तसे पडलेले दिसायचे.. पण आश्चर्य...एकही लहानगे पिल्लू ते औषध खाऊन मेलेले सापडले नाही अजून तरी फक्त मोठे उंदिर वा चिचुंद्रीच फक्त सापडत..  एक दोन वेळा लक्षातच आले नाही ..नंतर मात्र आश्चर्य वाटले आणि सुन्न व्हायला झाले ..घरात त्या विषयावर emotional चर्चाही झाली..  पिलांच्या तोंडी पडायला नको म्हणून विषाची चाहूल लागताच .. मोठे ते सर्व तुकडे जमा करत आणि दरम्यान त्याची विषबाधा होऊन त्यांचे प्राण गमावत असतात हे प्रकर्षाने जाणवले आणि हा पॅटर्न आजतागायत ...

उंदीर मामा

 या वरून माझं गेल्या काही वर्षातील निरीक्षण मी नोंदवित आहे ... गेल्या दशकात खास करून इकडे उंदिर मामाचा त्रास खूप वाढला आहे. तेव्हा काय करावे अशा विचाराने विविध उपाय करत करत जेव्हा बिस्कीट किंवा क्रीम tube वा औषध घालून खाण्याचे पदार्थ ठेवले असता.. थोडी खुडबुड झाल्या नंतर लहानग्यांच्या सुळसुळाट पूर्ण बंद होत असे.. आणि मोठे उंदिर वा चिचुंद्री फिरताना आढळत.. आणि ठेवलेले त्यांचे जीवघेणे खाऊ गायब होत वा त्यांच्या जागा बदललेल्या दिसत. आपण मग घेत राहायचा काही उंदिर मरतात का etc पाहायचे .. औषधाच्या तीव्रतेनुसार एक दोन दिवसात तसे पडलेले दिसायचे.. पण आश्चर्य...एकही लहानगे पिल्लू ते औषध खाऊन मेलेले सापडले नाही अजून तरी फक्त मोठे उंदिर वा चिचुंद्रीच फक्त सापडत..  एक दोन वेळा लक्षातच आले नाही ..नंतर मात्र आश्चर्य वाटले आणि सुन्न व्हायला झाले ..घरात त्या विषयावर emotional चर्चाही झाली..  पिलांच्या तोंडी पडायला नको म्हणून विषाची चाहूल लागताच .. मोठे ते सर्व तुकडे जमा करत आणि दरम्यान त्याची विषबाधा होऊन त्यांचे प्राण गमावत असतात हे प्रकर्षाने जाणवले आणि हा पॅटर्न आजतागायत बदललेला नाही... ...

माझी शाळा

  मला ओळख दिली  मला भाषा दिली  मला व्यक्त होण्यासाठी  खुले अस्मान दिले          -2 मी धन्य धन्य आहे मला ती लाभली प्रिय माझी  माझी शाळा... ll  - 2 दबकत बिचकत  येता मजला  गोडी लावत  कवेत घेई  माझी शाळा  माझी शाळा  पहिली यत्ता  पुस्तक कसले  पाटी नाही  पेन्सिल कुठले काव्य पाठ तो  गाती गुरुजी  रमुनी गावे उठ मुला... मुमुक्षित त्या नजरा असतील  पाठवाचना पुस्तक शोधित.. गृहकार्यास्तव काय करावे  पाटी पेन्सिल नसता झुरावे.. पुढच्या दिवशी पुढचे सारे  धडे शिकवले पाठ करावे.. घडा घडा मी घोकत जावे  मात पित्याने की ऐकावे... त्यांची त्यांना विवंचना ती  पोटासाठी काय करावे असे निपटले दिन बाल्याचे एकाहून एक सुरस कथेचे.. तरी बोच ना मनात काही .. आठवुनी ही सुख ते व्हावे.. सापेक्षता ही सुख दुःखाची  बक्कळ माया बालपणाची इथे थांबुनी पुन्हा भे टु या  अनुभव सारे पुन आठवुया                 

मनोगत वजा अहवाल

  मागे वळून पाहताना राज्यकार्यकारिणीस येताना अनुभव, मनोगत वजा अहवाल लिहून आणलेला होता तो आता इथे सादर करतो... आदरणीय डॉक्टर दाभोलकर यांच्या परम आदरणीय विचारांनी प्रेरित, उपस्थित आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू भगिनिंनों म्हणजेच आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते हो सर्वांना सविनय सादर नमस्कार🙏🏾 मी अँब्रोस चेट्टियार, महाराष्ट्र अंनिस ठाणे शहर शाखेचा एक नवीन आणि सामान्य कार्यकर्ता. माझ्या अंनिस प्रवासाची सुरुवात त्रिशला शहा ताईंच्या कार्याच्या प्रेरणेमुळे झाली तो एक इतिहास आहे त्याबद्दल मी नंतर कधीतरी सविस्तर सांगेन. त्यांनी मला आपल्या ठाण्याच्या स्थानिक शाखेशी संपर्काचा सल्ला दिला. आणि माईंशी माझी भेट होऊ शकली. ती ही सहज झालेली नाही, तो ही किस्सा पुन्हा केव्हा तरी नक्की.       तर, गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासून जी पाक्षिक बैठकीस मी येण्यास सुरुवात झाली तिथूनच माझी अंनिसच्या चमत्कारांशी ओळख व्हायला सुरुवात झाली. त्यातूनच पुढे काही *भानामती सदृश* ,  *झपाटलेले* वगैरे प्रसंगातून पीडितांना सोडवताना आणि  *चमत्कारातून वैज्ञानिक दृष्टिकोन* दा...

कृतज्ञता, प्रेरणा पुरस्कार

 कृतज्ञता 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता म्हणून उणेपुरे एक दीड वर्षच काय ते झाले असेल.. परंतु माई वंदना शिंदे यांच्या दैदिप्यमान, दीपस्तंभरूप व्यक्तिमत्त्व आणि कार्याने प्रेरित होऊन त्यांच्या सोबत त्यांनी सांगितलेल्या कार्यक्रमास सवडीनुसार हजर होत गेलो.. त्यांच्या तरुणाला ही लाजवेल अशा जोशात सप्रयोग व्याख्यान ऐकताना भान हरपून पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षकांची गत व्हायची तशीच माझीही व्हायची .. खूप काही शिकायला मिळाले आणि खूप काही अजून शिकायचे आहे. मला विद्यार्थी म्हणून राहणे नेहमी पसंत आहे.. कार्यक्रम स्थळी जुजबी गोष्टी सांभाळताना माईंनी केलेले कौतुक मला सर्वोपरी आहे. सुरुवात केली तेव्हा पासून पाक्षिक बैठक न चुकवता ज्ञान प्राप्तीचा माझा प्रयत्न असाच अबाधित राहावा अशी आशा करतो..  ....दरम्यान मी केलेल्या छोट्या मोठ्या योगदानाचे इतके काही मोठे बक्षीस आणि तेही लगेच मिळेल असे स्वप्नातही वाटणे शक्य नव्हते .. हे सर्व कसे घडले याचा मला उलगडा झाला नाही... परंतु यंदाच्या शाखा कार्यकारिणी निवडी पासून ते राज्यकार्यकारिणी जाहीर होई पर्यंत मल...