पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विवेक विज्ञान

  विवेक विज्ञान जाणीव नेणीव भगवंती नाही  संतवचन स्पष्ट जाणतो कोण आजही बुडाला शोधीत तयाला अस्तित्वच ज्याचे भूतळी नाही माणूस जाणावा भूत तोषवावा प्रेमभाव जगी स्थापित तो व्हावा वृक्ष वल्लरींची प्राणीयांची साथ आणखी न कोणी जगी येतजात मनाचे सांगणे मनास कळावे कोणी ओळखावे माणसाने   एकमेका साथ द्यावी घ्यावी आस आणिक कोणाची जाय व्यर्थ ऐकताहे कोणी मनाचे गाऱ्हाणे आधी सोड मना फुकाचेहे खूळ विद्युत लहरी आणि चुंबकत्व ब्रम्हांडाचे कारण गुरुत्वाकर्षण माणसाचे मन एक रसायन शोधे सोपे मार्ग रंजनाचे आळस भीतीचे आवरण घट्ट फुकाचे चिंतन गूढ तत्वी विवेक विज्ञान चतुरस्त्र ज्ञान करी उन्नत मस्तक माणसाचे हाच एक मार्ग चालण्यास खरा बुध्दीप्रामाण्याची होय सुरुवात बुध्दीप्रामाण्याची होय सुरुवात      *©अँब्रोस चेट्टियार*

मऱ्हाटमोळं

मऱ्हाटमोळं नऊवारी लुगडं मऱ्हाटमोळं मायमाउली रूपडं भोळं उभ्या पिढ्या मी पोसुन प्रेमळ मुंबई ही गुलजार पाहिली नजरंला अलवार  घातली गॉगलही रंगदार डोईवरी टोपी बी भरदार घातली तुला सुखविण्या बाळ.... माझिया तुला सुखविण्या बाळ.... ..... ©अँब्रोस चेट्टियार लिहिलंय मनांन शेअर करता यीना झालंय... शेअर चं बटन न्हाई..

सोपी शिकवण

 सोपी शिकवण हाडाचा शिक्षक  कोणाला कळावा   कोणाला मिळावा  योग आहे  आठवा ती शाळा बालपण रम्य सोन्याचे ते दिन आज वाटे नको वाटायचे शाळेचे ते पाठ सवंगड्यांसाठी हवी शाळा खेळातून घट्ट समाजाची वीण भेद बाकी नाही  कोठे काही उपटे कोठुनी अचानक भेद खाणे नी राहणी वस्त्र आदी टिळा शिखा टोपी अंतर वाढवी भेदाची काच नी आच मनी आश्चर्य ते आज जाणोनी या खंत शिक्षकाची काही  साथ काहे म्हणोनी शिक्षक  होणे नाही सोपे वाट ती फुंकावी निरंतर  शिक्षकाचा धर्म ज्याला तो कळला त्यालाच मानव्य समजले नवीन जीवाचे  संगोपन कार्य देशाचे ते कार्य असताहे फुलाने फुलावे वाऱ्याने वहावे  शिकवणे व्हावे सृष्टीसम      *अँब्रोस चेट्टियार*

योग्य तेच करा

योग्य तेच करा वर वर चुकीचे वाटले दिसले असले तरी पुढचे मात्र बरोबरच करा योग्य तेच करा मताचे दान सत्पात्रीच करा कुणी धमक्या दिल्या कुणी आमिष दिले त्याला घाबरून दाबून जाऊ नका घाबरला जरी असाल तरी आमिषाला बळी पडला जरी असाल तरी मताचे दान योग्य ठिकाणीच करा कोणी कोणाला मताचे दान दिले हे कळत नसते कोणाला त्यामुळे निश्चिंत राहा आणि आपले कर्तव्य चोख पार पाडा    तुमच्या एकंदर भल्याचे तुम्हीच पाहा योग्य माणूस पारखून घ्यावा एकेक मताने पारडे फिरू शकते त्यामुळे   मताचा योग्य वापर जरूर करा योग्य करा निश्चित करा हवे त्यालाच मत द्या कानी कपाळी कोणी ओरडो कितीही सूज्ञ तुम्ही योग्य तोच निवडा .... मर्मभेदी समर्पक समयोचित ते कर्तव्यपूर्तीने शिर उंच होते... इति विचार संपूर्ण.. 🙏🏿

नाटक वाल्यांची ही नाटकं..

  नाटक वाल्यांची ही नाटकं.. हल्ली कलाकारांनाही प्रश्न पडायला लागलेत म्हणे गरिबाला पैसे द्यायला देणाराने आणायचे कुठून म्हणे  कमवत्याच्या करातूनच ते देणारेत ना म्हणे वगैरे गरीब त्यांचे नाटक मात्र पोटाला चिमटे घेऊन बघतो हे सोयीस्कररित्या विसरतात. त्यावरील टॅक्स गरिबांना दिला तर ह्यांच्या बापाचे काय जाते.…. उलट जास्त लोकांना द्या म्हणावे ना  म्हणजे जास्त टॅक्स गोळा होईल जास्त नाटके पहिली जाऊन... मुर्खांना समजत नाही आपला पोशिंदा मायबाप तो गरीब आहे.  अन्यथा बाकीचे लोक तर सर्रास फुकट passes var येतात म्हणावे ह्यांची नाटकं बघायला  आणि काहींना हेच बोलवतात फुकट नावासाठी प्रसिद्धी साठी ..पण पैसे देऊन तिकीट काढून कोण येते बघायला तर तो गरीबच ना ? वरील सर्व वाक्ये अख्खा सलग प्रश्न मना म्हणा.. ..वाचून दम लागलाच शरमेचा तर थोडा विचार करा म्हणा...

आताच करायला हवं !

आताच करायला हवं ! हीच वेळ आहे  आताच करायला हवं  बदलायला हवं पाऊल पुढं टाकायला हवं मन मोठं करायला हवं  नीतीला जगायला जागवायला हवं हातात हात घ्यायला हवा हातात हात द्यायला हवा होतं असं आयुष्यात कळेनासं... .....कधी कधी आपला हेका सोडून जरा  शाण्यासुरत्याकडं बघायला हवं कधी त्याच्या मागं चालायला हवं  वाट सुदरली की मग परतायला हवं  कोणाचं आधार घेणं वाईट नाही  त्यात चुकीचं असं काहीच नाही  पुढं कवा तरी त्यालाबी लागंलंच तवासाठी तयार व्हायला हवं आजची येळ वैऱ्यावर येऊ नये   जरी आपल्याच लोकांनी आणली असली तरी  तिचं ताईत करून हिंडायला नगं चुकीला चूक म्हणायला हवं कोण बरोबर हाय ते वळखायला हवं  उगाच झालेली की ठासून भरलेली  जळमटं मिरवण्यात कुठलं भलं कोणीतरी स्वार्थासाठी आपलं डोकं  बिघडवलंय हे कळायला हवं  अन आता तर सुद्रायला  हवं आपलं आपण जगायला हवं  जबाबदारीनं वागायला हवं  वाट कशी बसून सरंल  आपून हून चालायला हवं चालणाऱ्याचं पाय बनायला हवं आपली वाट कुणी मळली  आपली वाट कोण चालला  हे शोधायला हवं  समजाय...
नजर आने लगे हैं अब गाहे बगाहे बाजार मे जो पुकारने पर भी घरों से कभी निकलते न थे  अब जो निकले हैं तो ताज्जुब होता है              कहीं मुल्कमे चुनाव नजदीक तो नही           *अँब्रोस चेट्टियार*