28 November it completes Forty Years of your departure. But Still you are around us. here in our hearts, thoughts, in our deeds, in our day and in our nights. The great wait of mine has no end it seems. I couldnt see you back. you never returned. But I had few questions to ask you appa even if i know it is impossible for you to return but my mind is still mad for you oh father. wanted to see you back and talk to and fight with you and wants to feel your love for us all and also I have to give an account of my life lessons to you ... since I tried much much harder, softly and harshly but it seems worked very less .. i wanted to surrednder the deed of life to your feet and ask for your justice. you know that As you left we were children but you left without a second thought. You left your younger children without thinking of their hearts. Their needs, their difficulties, their challenges, you left them with.. and A...
पोस्ट्स
नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पाक्षिक बैठक वृत्तांत : दिनांक : 19 नोहेंबेर 2023 *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा* आज रविवार दिनांक 19 नोहेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता पुष्पाताई तापोळे यांचे घरी, सुरंगी , Voltas कामगार कॉलनी वसंत विहार, येथे झालेल्या पाक्षिक बैठकीस उपस्थित सदस्य 1) माई वंदना शिंदे 2) ज्योती कांबळी 3) कल्पना चेट्टियार 4) तापोळे सर 5) पुष्पाताई तापोळे 6) अथर्व लिपारे 7) माया ताई 8) सीमा ताई 9) मेघना कानडे 10) अजित डफळे 11) नितीन भवर 12) प्रो. बी बी मेश्राम 13) अँब्रोस चेट्टियार ☑️ थोड्या अवांतर आणि सद्य परिस्थितीवरील स्वाभाविक चर्चा झाल्यावर अंनिसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या माईं वंदना शिंदे यांनी आज इंदिरा गांधी जयंती अभिवादन करून पुढील दिवशीच्या प्रबोधनकार ठाकरे यांचे स्मृतीप्रीत्यर्थ *देवळांचा धर्म ..* ह्या त्यांच्या पुस्तकातील आजच्या घडीला, विचार करायला लावणारा समर्पक उतारा वाचून दाखवला. ☑️ चळवळ गीत सदरात १) साधं विज्ञान विसरला , २) बाप्पा मोरयाला गणरायाला निरोप, ३) श...
इश्क़
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
इश्क़ मैं तुम्हारी निगाहों को पढ़ता रहा सुबह से शाम कैसे हुई क्या पता जब दिखाई पडी इक शमा नज़्र में तब कहीं जाके ये इश्क़ *रौशन हुआ और झुकी आँख से तुमसे लेते विदा नम थीं चश्में हमारी कहें तुमसे क्या बस यही हाल होता है जब हों यहाँ और वहाँ वत्न की बस हिफ़ाज़त जहाँ... ....... यूँही परवान चढ़ता है इश्क़ मेरा खिल रहा अम्ने वतनों का गुलशन भरा अब से यादों ख़यालों में तौरों मे भी फर्ज़ों तरजीहे शामिल हों आगे सदा अब ना ग़ाफिल तू रहना ओ मनवा मेरे वत्नो अम्नीश्क़ का परचम फहरा रहे *अँब्रोस चेट्टियार*
सतपथ
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊 चल सतपथ सतपथ सतपथ तज अग्निपथ अग्निपथ अग्निपथ विकार को तू त्याग दे धरा के साथ आ ज़रा के फूल पर्ण तितलियाँ खिलखिलाके गा तो लें अभी न हो कोई हिचक अभी न हो कोई थकन के मुस्कराहटों की राह दीप कुछ जगा तो लें तेरा नहीं जला जो दीप क्या हुआ प्रयत्न कर किसी के यत्न ही से तो यहाँ तलक तू आ सका तुझे यहाँ मिला जो कुछ किसी की बीती जिंदगी के आँधियों के बीच भी कोई दिया जला गया तू शुक्र कर अभी तलक के सांस ले रहा है तू किसी ने फुल पालकर किसी ने पेड बो दिए मगर अरे जरा पलट तू देख क्या है कर रहा के जल हवा ध्वनी सभी बिगाडता ही जा रहा अभी संभल अभी तू मुड के वक्त है नहीं बचा तू आग बोते जायेगा क्या शीतलता पाएगा तू खेलकूद मे मगन हो रंजन कर पा भी ले मगर धरा की सोचके जरूर फूल बो भी ले हिंसा की राह तज भूतदया जान ले मारकर न हीन बन बचा के जीव बन बडा संभल गया जो जीव है किसिके काम आ गया किसी की राह प्रेम का जो दीप हो जला गया जो दीप से है रोशनी समझ गया जगा गया नही समझ सका कोई तो नास ही मचा गया त्रिदोष जल, ध्वनी, हवा के पार भी तो नास ये पहुंच के मुख पसार के...
उक्किरडा
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
(केर टाकायला गेलो असताना तिथूनच वेचून खाणाऱ्या वेडसर भुकेल्या व्यक्तीला पाहून दुसऱ्या वेचणारणीनेच त्याला चहा आणून पाजला नी सोबत पाव खायला घेवून दिला.. हे पाहताना किती तरी भाव भावना येवून जात होत्या. भयंकर परिस्थितीत फुललेली माणुसकी ) उक्किरडा त्या त्या उक्किरड्याचं बाबा तुम्हा काय सांगू देनं निजानीज झाल्यावर मी हुडकाय जाते सोनं | त्या त्या उक्किरड्याचं बाबा ... तुम्हा कळंलका माझं येडं जीवन साधंभोळं रात्रदिवस मी जीव काढते पोट भरंना यकवेळं | त्या त्या उक्किरड्याचं बाबा ... दिसभर मोडून मरून मी जगते दिस ढळला की घरास वळते हसते रडते दिवस काढते कचरा वेचावयास जाते लाज तुम्हा आणते | त्या त्या उक्किरड्याचं बाबा ... कधी सापडे वस्तू तुटकी कापड चिंधी मडकी फुटकी कधी भरे मग हात घाणिने किळस शिसारी येते .. त्या त्या उक्किरड्याचं बाबा ... पहाट होता कामगार ये हाकलुन मजला दूरवरी दे त्यास मी सांगू काय जीवाचे मनात रागे भरते त्या त्या उक्किरड्याचं बाबा ... जे जे मजला सापडते ते भंगाराचे पैसे करते...
शेवटचा अंक कोणता ?
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शेवटचा अंक कोणता ? सोपं सोपं हे कोडं सोडवा हो लांब कशा आता जाता सांगा शेवटचा, अंक कोणता तो सांगू नका कोऱ्या बाता | सांगा पृथ्वीच्या एकूण चकरा नको फुकाचा कसला नखरा द्याहो अज्ञानाशी नीट टकरा चाळा विज्ञानाच्या नीट बखरा ज्ञान विज्ञान घ्यावं समजून खुळ्या समजुतीच्या सोडा थापा सांगा शेवटचा अंक कोणता तो सांगू नका कोऱ्या बाता | खोला डोक्याची सारी कवाडे दूर राहून अज्ञान वाढे एकमेकास सोबत घ्यारे ज्ञान सद्गुण सर्वास द्यारे आल्या गेल्याशी साथ जोडून एकमेका सहायक होता सांगा शेवटचा अंक कोणता तो सांगू नका कोऱ्या बाता | पाठ्यपुस्तका मित्र करावे ज्ञान मिळेल तिथून घ्यावे स्वये स्वत:स उत्तम करावे शिकणाराचे कौतुक करावे वेळ नाही हो अपुल्या हातात वाट उद्याची कशा पाहता सांगा शेवटचा अंक कोणता तो सांगू नका कोऱ्या बाता | कोडे सुटले का तुम्हा कळले का सांगा कळले तुम्हा का आता उत्तर सोपे हो याचे उत्तर हो संख्यारेषा ही आहे अनंता | *अँब्रो...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
प्रौढ आणि वयस्क व्यक्तींनी खास करून महिलांनी नाचून गाऊन reels बनवले तर लोक काहीबाही बोलतात.. हे चूक आहे ..आपले संस्कार आणि अमानवीय असंस्कृत विचारच दर्शवते ते ... असो विषयंच वेगळा आहे हा... दिसते आहे त्या मागे खूप काही वेगळेच दडले असू शकते ... ...दोघे वयस्क पती पत्नी आपल्या भयंकर व्यस्त आयुष्यात मुलांकरिता सर्वस्व वेचून दमले तारुण्य संपले .स्वतः करिता जगायचेच राहून गेले .. ...आता सुदैवाने दोघेही साधारण चालते फिरते , आरोग्य पूर्ण आयुष्य जगत आहेत . तेव्हा आपले गाण्याचे वगैरे सारखे छंद पूरवताहेत .. आणि योगायोगाने मोबाईल्स आणि सोशल मीडियाचा जमाना ही आहे .. ..तेव्हा सुरुवातीला कुणीतरी सोशल मीडिया वर त्यांची पोस्ट केली आणि viral झाले हे जोडपे.. .. दोघांना एक नवीन विरंगुळा मिळाला .. .. पण विषय न समजून घेता आपण प्रत्येक गोष्टीत आपल्या पूर्वग्रह दूषित दृष्टीने पाहून व्यक्त होतो तसे करू नये .. तर विषय वर सांगितला तसा आहे.. .... हे जोडपे स्वतः जगण्यातला आनंद शोधत आहेत आणि इतरांनाही जगण्याची प्रेरणा देत आहेत . ही चांगली गोष्ट आहे मात्र आपल्या कडे कळायला अजून...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पाक्षिक बैठक वृतांत : दिनांक : 5 नोहेंबेर 2023 *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा* आज रविवार दिनांक 5 नोहेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता अजित डफळे यांचे घरी, 'तृणपुष्प सोसायटी येथे झालेल्या पाक्षिक बैठकीस उपस्थित सदस्य 1) माई वंदना शिंदे 2) ज्योती कांबळी 3) जय कांबळी 4) राजेंद्र चव्हाण 5) पुष्पा तापोळे 6) अथर्व लिपारे 7) अजित डफळे 8) कल्पना चेट्टियार 9) अँब्रोस चेट्टियार ☑️ डफळे कुटुंबीयांकरिता सर्वांची ओळख करून घेण्यात आली .. ☑️ चळवळ गीत सदरात १) साधं विज्ञान विसरला , २) बाप्पा मोरयाला गणरायाला निरोप(लहान मुलांकरिता आकर्षक चालीवर ) ३) मैं अच्छी हू घाबराउ नको ... ही गीते माईसोबत सर्वांनी गाईली ☑️ *सप्रयोग चमत्कार सादरीकरणातून विज्ञान* कार्यक्रम पैकी काही कार्यक्रम मागील आठवड्यात झाले त्यांचे अहवाल लवकरच सादर होतील.. येत्या आठवड्यात काही कार्यक्रम होणार आहेत त्यांची ही माहिती लवकरच आपल्याला मिळेल. ☑️अंनिसच्या कार्याची ओळख अजित दादांच्या पत्...
सीताफळाच्या रोपाने घेतला CPR .. |
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सीताफळाच्या रोपाने घेतला CPR .. | आजची पहाट विशेष आहे माझ्या आयुष्यातील !! अगदी पहाटे पासून इतका आनंद देणारा असा दिवस विरळाच, नाहीका ? मध्ये काही दिवस खंड पडला आणि आज परत पहाटे रोपांना पाणी देण्याची संधी पाणी विभागाने दिली .. म्हणजे आम्ही धुण्याचे पाणी एक दिवस आणि पिण्याचे पाणी एक दिवस असे काटकसरीने जपून जपून पाणी भरतो आणि उरलेले सुरलेले घरातील पाणी घालून रोपे राखायची असा कार्यक्रम. असो.. ..गेल्या काही महिन्यांपासून पासून आमच्या श्रीमती रोपांना पाणी घालायच्या म्हणजे त्यावेळी पाणी साधारण नवाच्या नंतर येत असे.. तर तेव्हा ही जबाबदारी तिने घेतलेली होती.. अधून मधून पाणी आले नाही तर मात्र रोपे उपाशी राहत नी मलूल पडत. ..परंतु काही महिन्यांपूर्वीपासून पाण्याने दगा द्यायला सुरुवात केली आणि सर्व चित्र बिघडले. झाले असे की पाण्याचा काही नेम राहिला नाही. काही दिवस आधी थेंब थेंब पाणी येई आणि लगेच जाई. कधी रात्री बाराला कधी रात्री दोनला कधी पहाटे पाच का असे सुरू झाले. त...
स्मृती
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
स्मृती स्मृती पितरांच्या येता मन हळवे होई ते कैक कोपरे मनाचे मग ओथंबून भरते | एक एक धागा येई दुज्या सोबतच आणी सरता आठव दुजाची त्याची तिजा साथ देई | अशी लांबण लागोनी मना भरतीच येते हुंदक्यांच्या मागे सय एकएकाची स्मरते | सान-थोर सारे मग्न तदी मनाच्या खेळात असा दिन कारे येई माणसाच्या आयुष्यात | मायबाप बांधवांचे उरे आठवाचे धागे मागे फिरुनी पहाता बेवारशीपण दिसे | उभे आकांडतांडव स्तब्ध एकजात आज एरी घर डोक्यावर आज कसे निपचित त्या अबोलशा मुर्ती आज हासतिच का ना कारे भासे मजलागी पाणी त्यांच्याही डोळ्यांना | कैक आठवाच्या घडी कैक पिंजून काढाव्या तरी होईनात स्वच्छ अश्रूधारांच्या गोधड्या | त्यांची जाणवते ऊब जणू बोलती त्या मला नको रडू माझ्या बाळा बोलताना ओला गळा | हाच नेम सारा दिस अन आठव जन्माचा घेतो वर्षाचे वर्षाला सर्वां भेटुनी अबोला | मणामणाचे ते ओझे पुन्हा हलके होतसे सर्वां गळा भेट होई नवे ...
ट्रंक
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ट्रंक घर कोणाचे कोणाचे मायबाप की लेकाचे पोर उजविली मागे तिने सांगावे कोणाचे | येता माहेरास पोर तिला परकेच वाटे नाही एकही कोपरा जपे बालपण तिचे | बालपण जपणारी नाही कोणतीही खूण नाही आठवण तिची नाही खेळणी चुकून | घरभर हा पसारा नव्या संसाराचा सारा नव्या मालकिणी साठी नव्या नवतीचा वारा | एक म्हातारा म्हातारी थोडी अडगळ त्यांची त्यांच्या गोधड्या वाकळी लेक रमे त्या ठिगळी | एक बाज तुटकिशी त्याच्या खालती ती ट्रंक त्यात बाळ चिंध्या साऱ्या झोपे बाहुली निशंक | त्यात गावले जन्माचे हवे नको ते ते सारे बालपण सख्या खेळ सुख जन्माचे साजरे | जप इतकेच भाऊ माझी मातरे पितरे आणि देई मज दादा त्यांच्या मागे ट्रंक ती रे | मले दुसरे नको रे आनी तुज्याकून काही जप जिवाले बाबा रे तूच बापमाय माही | *अँब्रोस चेट्टियार*
सय
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सय आली आली गं सय आली आली गं सई मन बालपणी जाई तुरू तुरू खारूताई | सारे खेळ सवंगडी घरादारात जमूनी माजे दांडगट दंगा शमे फटके खाऊनी | गोड खाऊची मांडोली आई बाबाची तयार साऱ्या चिल्यापिल्यां- -साठी घरघरचि माहेर | अशा उदंड बाल्याला द्वाड सवंगडी साथ कसे हसत खेळत जात होते दिनरात | मायबापाच्या संसारी कष्टकरी हातभार लावे पोरटे सोरटे नाही वाटलाच भार | हात हाताले जोडून मायबाप भावंडांच्या आणि सवंगडी सारे गावगाडा हाकायाचा | झाले मोठे नी परके रीतभात जातपात तुझे माझे ह्याचे त्याचे काल खाल्ले रं एकात | आज उठे गदारोळ अन कालवे मनात काय होते बालपणी काय झाले तारुण्यात | *अँब्रोस चेट्टियार*
अंगाई
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अंगाई सोपी कशी गं चाल तू बांधतेस आई -२ तुज कोण शिकवितो गं अशी गोssड अंगाई येता तुझ्या कुशीत मज सापडे गं सारे -२ तुजवीण मज ना गमते फुल बाग रम्य वारे तू मित्र माझा होशी माझी सखी तू आई -२ तुज कोण शिकवितो गं अशी गोssड अंगाई ऐकून रम्य गोष्टी गीतातूनी तुझ्या गं -२ जगण्यास बळ मिळाले सामोरे आले जग प्रार्थिन मी जगाला लाभो तुजसम आई तुझ कोण शिकवितो गं अशी गोssड अंगाई... *अँब्रोस चेट्टियार*