पोस्ट्स

एप्रिल, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रीचाज

 रीचाज दमून बसल्या मैतर दोघी जनी गं कामाचं दिसं सरता सरंना भनी गं  लेकरू भुकं रांधाया लागा मालक आला वाढाया लागा रयाच गेली केसाले नाही फनी गं मायेची कुशी आठवुन रडते मनी गं सनावाराले कितीही मरा  लहानथोराची सेवा करा तुला नी मला खायाची टोमनी गं  मायेची कुशी आठवुन रडते मनी गं अडीनडीले धावावं पुढं सुखाने कसं निजंल धड संसाराची गायाची गोड गोड गानी गं मायेची कुशी आठवुन रडते मनी गं स्वप्नांची सुखाची रांगोळी हाती पुढच्या पिढीची सजली शेती धिरानं जिकतिल मुलंही शिकली शानी गं  शेवट करतील गोडं ही आशा मनी गं दमून बसल्या मैतर दोघी जनी गं कामाचं दिसं सरता सरंना भनी गं  अशी रोजच्या गप्पांची दवा जगण्या देई हुरूप नवा मनमोकळ्या घटकाभर बोलुनी गं  सज्ज उद्याच्या सेवेला नवतरनी गं मनमोकळ्या घटकाभर बोलुनी गं  सज्ज उद्याच्या सेवेला नवतरनी गं ... © अँब्रोस चेट्टियार
  * महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर. * 👉चमत्कारामागील विज्ञान सप्रयोग व्याख्यान कार्यक्रम संपन्न. स्थळ :- येऊर हिल्स, ठाणे. समता विचार प्रसारक मंडळ ठाणे यांनी सालाबादप्रमाणे आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गातील मुलांचे चार दिवसांचे निवासी शिबिर घेतले. मंडळाने तळागाळातून येणाऱ्या, चिकाटीने शिक्षण घेणाऱ्या आणि माध्यमिक शालांत परीक्षेची पायरी ओलांडणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचे गुणगौरव करण्याचे कार्य अविरतपणे तीन दशकांहून अधिक काळ नेटाने सुरू ठेवले आहे. ठाण्यातील महापालिका शाळांतून शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांना विविध कलागुण जोपासता यावेत आणि विविध व्यवसायांची निवड आपल्या वकुबाप्रमाणे करता यावी याकरिता हे निवासी शिबिर आयोजित केले जाते. यात भाषण कौशल्य, नेतृत्व गुण विकास, हस्तकला , अभिनय केला आणि असेच ईतर अनेक कलांचे प्राथमिक मार्गदर्शन होईल अशी कार्यक्रमाची आखणी असते . दरवर्षी  काहीतरी नावीन्यपूर्ण अशा कार्यक्रमांची रेलचेल असल्याने विद्यार्थीही मोठ्या संख्येने शिबिरास हजेरी लावतात. राहणे खाणे निवास व्यायाम आणि मार्गदर्शन कार्यशाळा असे सर्व काही ...