पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बा ..बापू...

  बा ..बापू... धोतर लेवून, लेखणी, चष्मा घेऊन गोमुखासनात बसणारा अवलिया जगाला देतो अनमोल शांतीचे ऐश्वर्य़... भराभरा लिहित जातो आपल्या गिजमिज्या अक्षरांनी चळतीच्या चळती, तावच्या ताव... कशा कळतात मुद्रकाला कोण जाणे त्याच्या कागदाचे भाव ..... जगभर लोक वाचतात आतूर होऊन पुढे काय, पुढे काय... .. सांगतो आत्म्याला सुखावणारे,  असे काही तो बोलतो... किडमिड्या अक्षरातून भाव मात्र चोख, हृदयाला पोचतात.. जणू दिसते त्याला पुढचे सारे तो जपायला सांगतो एकमेकांना नी जपायला शिकवतो पाणी सृष्टी प्राणीमात्र... भूतदया श्रद्धा प्रेम शांती करूणा आणि अहिंसा ... तो शिकवतो सूत कातायला नी लज्जा राखायला तो सांगतो जमीन राखायला नी प्रेम फुलवायला तो शिकवतो हातात हात घालून नांदायला त्याचे हातच मोठे , आजाणूबाहूच तो रामकृष्णबुद्धा सारखा ख्रिस्तालाही जवळचा सर्वांचाच आपला असा ... त्यामुळेच जगाने त्याचा मानवतेचा एकमेव धर्म सर्वोपरी हे मानले. सर्व धर्मांचे मूळ नी सार एक, अखिल मानवजातीचे सुख... किती सरळ, साधे आहे त्याचे वागणे, बोलणे नी जीवन.. म्हणून आज त्याचे महत्व मुद्दाम समजून घ्याव...

वो....

 वो.... वो जो  बडे मर्द से लगते हैं  स्क्रीन पर वो जो  बडे मर्द से लगते हैं  स्क्रीन पर कहाँ से लाते हैं  इतना कमीनापन असल ज़िंदग़ी में ?  नपुंसकों का साथ देते देते ? या पैदाईशी दोगले होते हैं ... ? खैर ! फिर उनकी फ़िल्म ज़रूर  देखना एकाद बार  और समझना इस बात को  कि तभी तो ??????? वे फ़िल्मों मे मर्द बने फिरते हैं ..... ....... ©*अँब्रोस चेट्टियार*

एक व्हा !

 एक व्हा  ! माय हाका देत आहे  साद कानी येवुद्या  एक व्हा रे एक व्हा  एकतेची ज्योत अपुल्या  अंतरातुन जागवा  माय हाका देत आहे  साद कानी येवुद्या  एकतेचे गीत गाई  सार्थ मानवजन्म होई एकतेची एक तान विविध जन एक मन एक दृष्टी ब्रीद एक  पंथ अनेक ध्येय एक    उघडा डोळे कानहि उघडा  बुद्धी अपुली जागवा जीवजीवा ओळखूनी  प्रेमज्योती जागवा  सत्य समता बंधुत्वाचा मार्ग विश्वा दाखवा ... माय हाका देत आहे  साद कानी येवुद्या  एक व्हा रे एक व्हा  एकतेची ज्योत अपुल्या  अंतरातुन जागवा  माय हाका देत आहे  साद कानी येवुद्या    ..... *अँब्रोस चेट्टियार*

पुनर्भेट मानवसेवा

 पुनर्भेट तारुण्याला  पडते स्वप्न युवक होती  कार्यमग्न  एकामागुनी  एक एक तो  विचार स्फुरतो,  मूर्तची होतो . आवाहन   एकत्र यायचे   कथा सांगुनी   काव्य गायचे   अन्य छंद ही आणी कोणी उपभोगाया परमानंद आठवणींचे  रम्य रोपटे  कोनाड्यातुन  पुढेच येते  नवपालवी  पर्णपुष्पही  गुंजारवकर भ्रमरही येती  रम्य गोड नी  मधुर मनोरम पुष्प रसाचा  करिता साठा  थव्याथव्यांनी  शोधपथक ये  माक्षिकमधु त्या शोधित वाटा छंद कलांचा  रम्यरम्य तो  रसिकजनांसी  बळे ओढतो कलागुणांची  उत्तमपारख संस्कृतीशी नाळ जोडतो आवाहन परि नीट श्रवावे  अभ्युत्थाना सुसज्ज व्हावे स्वयंप्रकाशी  मार्गसमर्पित श्वास साधना नित्य करावे  युवकांमधले  उत्तम शोधा मानव सेवा  त्यात बिंबवा पश्चातापा कारण नाही बीज उत्तमा  आधी रुजवा बीज उत्तमा  आधी रुजवा      *अँब्रोस चेट्टियार*

बाप्पा रे

 बाप्पा रे बाप्पा  रे तुज आळवितो मी   मज वरी राहूदे कृपा तुझी  बाप्पा  रे तुज आळवितो मी  बालक मी रे बाप्पा तुझा  मजला सुख लाभे तुझिया चरणापाशी  बाप्पा  रे तुज आळवितो मी मज वरी राहूदे कृपा तुझी ... बाप्पा रे .... सेवेत तुझिया जीवन प्रसन्न २  मनी मानसी तुझी आठवण  बाप्पा  रे तुज आळवितो मी    मज वरी राहू दे कृपा तुझी ... बाप्पा रे .... कार्यात देवा सदा यश प्राप्ती -२  वरदहस्त नित्य राहे मस्तकी  -२  बाप्पा  रे तुज आळवितो मी   मज वरी राहूदे कृपा तुझी  .... बाप्पा रे .... बाप्पा  रे तुज आळवितो मी   मज वरी राहूदे कृपा तुझी  बाप्पा  रे तुज आळवितो मी .... ....... *अँब्रोस चेट्टियार*

प्रार्थना

प्रार्थना मनरंजन होवो  जनरंजन होवो  मनरंजन होवो  जनरंजन होवो  कलारंजनातून  सुखाचे  सर्जन होवो | विविध कलांचा  वारसा  व्यक्ती वल्ली,  वाहुन नेते अडसर संकट खडतर झेलत पाउल लीलया  पुढेच जाते  एकच ब्रीदsन एकच ध्येय सुखकारक क्षण गुंफित जावे समतेचा अन  बंधुत्वाचा  धडा गिरविती  शांतिसुखाचा हासुनी हसवित  खेळ रंगतो  कारुण्यातुनी  मन जपण्याचा हास्य फुलावे  बालकापरी सुख लाभावे  सर्वां अंतरी  ज्येष्ठांचे मिळो  अनुभव आशिष सर्वांची मिळो  साथ सर्वदा  मनरंजन होवो  जनरंजन होवो  मनरंजन होवो  जनरंजन होवो  कलारंजनातून  सुखाचे  सर्जन होवो | .....*अँब्रोस चेट्टियार*

रामले आक्का

 रामले आक्का        घेरी येऊन पडेल अशा भरदुपारच्या उन्हात  पाssटयाsssला  टाsssकी लावा  बायेssssss आवाज घुमला की ओसरीवर ,पडवीत  वामकुक्षी घेत पडलेले बापे ताडकन उठून शिव्या हासडत. नी आपल्या दारातून हुसकून घालवायच्या नादात तिच्या वर रेकत "ए चले नीsssघ इथून, ती तिथेच ढिम्म. "कळत नाय का भवाने ? जर्रा पडू देत नाय. जा पुढे चालती हो"        हिरव्यागार नऊवारीची गोलसाडी नेसलेली.  निऱ्यांचा भलामोट्ठा वरवंट्यासारखे केळे ओटीपोटाशी गच्च बांधलेले.  डोक्यावरून अंगभर पदर घेतलेली. उघड्या बाह्यावाली काळी कुळकुळीत रामले आक्का वडारिन तशी काय साधी वाटली की काय ? ती ढालगज बाई  साध्या गावकरी बाप्याला ऐकते काय?  दुप्पट मोठ्याने पाssटयाsssला  टाsssकी लावा  बायेssssss आरोळी ठोकत दारा समोर ठाणच मांडलं तिनं. पण एक वावगा शब्द पुरूष मडळीला बोलली नाही. कांबळं पांघरून गावात घुसलेल्या भिलांच्या टोळीने उंदिरघुशिंचा माग काढत एखाद्या पडक्या घराच्या बाहेऱून दिसणाऱ्या बिळात गवताची गंजी पेटवावी.  धूर करावा. नी  आजूबाजूच्य...

तृषार्त

तृषार्त मेघ गर्ज़त  येत वर्षत मेघ गर्ज़त भूवरी || ध्रू || गर्ज़ती घन वर्षते मन  गर्ज़ती घन वर्षते मन  गर्ज़ती घन जोवरी |             मेघ गर्ज़त  येत वर्षत मेघ गर्ज़त भूवरी || ध्रू || चातका तृण  का न कानन चातका तृण  का न कानन   2 रत्न संचय अँबरी |           मेघ गर्ज़त  येत वर्षत मेघ गर्ज़त भूवरी || ध्रू || हर्षती जन तोषते रण हर्षती रण तोषते रण हर्षती जन अंतरी |        मेघ गर्ज़त  येत वर्षत मेघ गर्ज़त भूवरी || ध्रू ||     लेखन निर्मिती : अँब्रोस चेट्टियार

रंग कहते हैं

     रंग कहते हैं  नमस्कार, मै रंगारंग रंग  हूँ ... आज सभी संस्कारवादियों के घरों गलियों में चल रहे सभ्यतापूर्ण ?  पोतापोती का खेल देखना हमसे संभव न हुआ  अपनी शर्म से हुई काली आँखे मूंद ली हमने  सुर्ख लाल चेहरा भी काला पड गया  काटो तो खून नही लाल रंगभरे हाथों से  काले कलूटे हो चुके कान भी बंद करने चाहे  कानों को विश्वास नही हुआ  रिश्तों की मर्यादा की मशाल लेकर स्त्री के  घूँघट संभालते हुए चलने पर गर्व जताने वाले  सभी मिल एक दुजे की मर्यादाएँ लांघ रहे थे   उन्हे किसी रिवाज़ का चोला पहना रहे थे  वहीं खडे बच्चे बच्चियाँ असमंजस मे  बडों का मूह ताकते रहे  शायद उनके अभी रिश्ते बने न थे  बनने पर उनपर भी लागू होता यही रिवाज़... खैर अभी तो बस वे देख रहे थे  कि किस रिश्ते का हक किस पर चलता है  इसी उधेडबुन में उनका खेलखराब होता रहा  बडों को इसकी भनक तक कहाँ थी  सालमें एक दिन मिली इस आज़ादी का  वे आँखेभर कर आनंद लेना चाह रहे थे   कल से फिर उसी घूँघट से धुँधले चेहेरे...