पा बैठक वृत्त रवि दि : 29 10 24
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा* पाक्षिक बैठक वृत्तान्त रविवार, दिनांक : 29 सप्टेंबर 2024 विषय चर्चा :- 👉 एक ठरलेल्या विषयांपेक्षा आठवड्याभरातील अनेक घडामोडी यांची चर्चा आणि त्यावरील पुढील तातडीचे पाऊल हा विषय जास्त वेळ चर्चेला असल्याने ठरलेले विषय वगळण्यात आले. पैकी मुंबईच्या एका सुखवस्तू व्यावसायिक कुटुंबाने आपल्या मूळ गावी असलेल्या कोट्यावधींची चलअचल संपत्तीची प्राप्ती व्हावी या लालसेने त्यांच्या समाजात विख्यात अशा एका भोंदूच्या नादी लागून विविध प्रकारचे उपाय करण्यात जवळ जवळ अडीच कोटी रुपये उडवले. आणि आता ती संपत्ती तर मिळत नाहीच तर ते पैसे मिळावे अशी त्यांची अशा आहे पण ते समोर येत नाहीत. मात्र पोलिसांनी व ईतर सामाजिक संस्थांनी त्यांना ते मिळवून द्यावे अशी त्यांची इच्छा आहे. गडगंज पैसा असलेले हे लोक स्वतः चुका करतात आणि ईतर सर्वांना वेठीस धरतात. आपल्याला त्यांच्या कडून तशी लेखी तक्रार येईपर्यंत आपण त्यात लक्ष घालणे सयुक्तिक ठरणार नाही.. परंतु प्राथमिक स्तरावर हे प्रकरण आपल्याकडे आले होते .. परंतु माईंनी त्यांना संपर्क करून माहिती घेण्या...