पोस्ट्स

मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
 *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शहर शाखा.* दिनांक 26मे 2024रोजी झालेल्या पाक्षिक बैठकीत  *झालेले विषय* 👉*चळवळ गीत माईंनी निपाणीकरांचे गीत सादर केले. 👉*राज्यकार्यकारिणीस उपस्थित राहणाऱ्या सदस्यांची चर्चा   👉*नुकत्याच घडलेल्या  जात पंचायत संबंधी महत्वाची गाव स्तरावर पोलीस चौकीत बैठक आणि गावकऱ्यांनी यापुढे कायदा पाळण्याचे दिलेले लिखित आश्वासन. 👉*पुढील योजना- शाळांमधून चमत्काराचे कार्यक्रम घेणे करिता तयारी. 👉*प्रेमप्रकरणात गुंतून अवास्तव अपेक्षांनी आपले मानसिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या तरुणाचे councelling..  👉*पुढील मीटिंग दिनांक 16 जून ला नियोजित. 👇पत्ता  701, गणराज heights,  आदर्श नगर कोलबाड,  विकास कॉम्प्लेक्स , कॅसल मिल circle जवळ , ठाणे पश्चिम.. 👉संपर्क  माई वंदना शिंदे 9869151679 *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शहर शाखा.*
  निबंध .. उत्साह प्रचंड अवर्णनीय होता. बाबांची नवीकोरी गाडी आज हाती सापडली होती. इग्नीशन ऑन होता. स्टिअरिंग वर हाथ होता. नजर समोर रोखलेली होती. एक पाय क्लच वर आणि दुसरा ब्रेकवर होता. वेळ झाली होती. कोणत्याही क्षणी एक्सीलरेटर वर पाय पडायला आणि  प्रवासाला सुरुवात होणार होती.          इतक्यात वीज कोसळावी तशी निबंधाची वही अपूर्ण असल्याची आठवण झाली. तत्क्षणी इग्निशन ऑफ करून बोच्याला पाय लावून त्याने अभ्यासिके कडे धूम ठोकली.. © अँब्रोस चेट्टियार
फलसफा वो तो अपने आपको छोटी मोटी परेशानियोँ  में उलझाकर रखता है, रहने दो ना वरना फुरसत पाते ही वो गहरी यादोँ मे डूबने लग जाता है, खो जाता है परेशानियाँ, वो यादेँ जिनसे वो अपने आपको कभी अलग कर नही पाया जो उसके दिलो दिमाग में, रगों मे बहते लहू की तरह बहती रहतीं  हैँ ये कोई नई बात तो नही हर किसी शख्स की यही कहानी सी है मगर कोई अपनी तो भूल पाता नही चाहता है दूजा बस नाचता रहे हमारे साथ मौज करे, कुछ याद ना करे जिस मिट्टी के बने हैं लोग यहाँ कोई उसको झुटलाना भी चाहे तो कैसे करे ? कोई क्योंकर अपनी बातोँ को भूले, बीती को भूले ? और जीते जी मर जाए, बस हँसता ही रहे ये तो मुमकिन ही नहीं ऐ ज़माने तेरी हो लाख सजा वो तो हँसता भी रहेगा या मरेगा और करेगा अपनी यादोँ को ताजा हैं हजारों ही सही ख़ामियाँ है हममें, सबमें ऐसे दुनियाँ में कोई शख्स पाक़ साफ़ ना होगा आपसे उम्मीद होगी मगर फिर भी लौ तो जलती है कई बार बुझबुझ के ऐ हवा जब तलक राख में खुद को तब्दील ना कर ले उसके जीने का फलसफा उसका अपना ही होगा क्या कोई जी सका है औरों का जीवन सर उठाकर वो तो अपने आपको छोटी मोटी परेशान...
 अर्ज किया है                           बंद चूल्हे ने पतीले के नीचे से निकलकर  औलिया से पूछ ही लिया  आंच तो है नही, मगर गर्मी और बू कहांसे?  जवाब ना मिला तो दर्द समझा मंच ना माईक बोला नही जाता,  किसे पकाया जाये?  बकवास बंद है गैस बनती जा रही है.. सो बंद चूल्हे पर भी पकाया जा रहा है...
 महाबळेश्वर पुराण पुढे सुरू  तर पहिला दिवस  रात्रभर प्रवास करून अनेकदा सीटवरून शिटा घसरून सावरत, झोप ती कशी मला बाहेर येणे अशक्यच म्हणा,तो आणि वेगळाच रोग आहे,सवय आहे. असे पोहोचलो." लास्ट स्टॉप महाबळेश्वर " तर सांगितलेले ड्रीमलँड हॉटेल काही दिसेना. "उधर नई जाताय. इधरही उतरो, जल्दी करो". तिकडून चिडक्या स्वरात ऑर्डरवजा सूचना आली. 'अमके तमके हाटेलवाले इकडेच उतरा नी फलाने फलाने हाटेलवाले गाडी में बैठो' अशी खरमरीत विनंतीवजा सूचना उतरता उतरता ऐकली. अणि पोरगं आपलं मराठीच होतं. उतारू मात्र काही मराठी काही परभाषिक असतील. वाद घालण्यात इथे तरी काहीच अर्थ नव्हता खाली उतरून पाहू म्हटले नी उतरलो. मला गेले वर्षभर पायांना त्रास होता आता थोडे बरे होते पण अजून पूर्ण बरे वाटत नव्हते तरी मनोमन मुद्दाम हे आव्हान स्वीकारून प्रवासाला तयार झालो होतो.      ठरवताना अगदी पहिल्यांदाच येत असल्याने सहसा गड किल्ले आणि मंदिरे देवस्थाने वगळून प्रवास करू असे ठरले होते. जेणे करून जास्त पायऱ्या उतर चढ करणे टाळता येईल असे ठरवून प्रवास निश्चित केलेला होता. पण.. असो.    तर बस मधून उतरता...
 साहित्य जे वाचले जाते तेच संस्कार करते. अनेक साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, त्रैमासिके, षण्मासिके (अर्धवार्षिके), वार्षिके आणि पुढे ही कोणत्यातरी विचाराला वाहिलेली. कसला विचार? काही शाश्वत विचार? तर आता हे म्हणजे संशोधनाचाच विषय ठरावे.   थोडासा अभ्यास केलातर लक्षात येते की साहित्य माथे फिरवते आणि साहित्य एखाद्या विचारामागे ही धावायला लावते. साहित्य कुतूहल जागवते , साहित्य प्रेरणा देते.. साहित्य मने घडवते, साहित्य मस्तिष्क सशक्त करते. म्हणून मोठमोठे साहित्यातील संशोधक म्हणावे, संत म्हणावे असे, महात्मे म्हणावे असे महान लोक आपापल्या परीने आपले जीवन एखाद्या विचाराला समर्पित करून तो विचार साहित्यातून रुजवित गेले. फुलवीत गेले.        ह्याचा इतिहास मोठा आहे . अभ्यास केल्यास थक्क व्हावे असा हा इतिहास असेल. त्याची काही उदाहरणे आपण डोळसपणे पाहायला हवीत अभ्यासायला हवीत. आज उपलब्ध असलेले साहित्य एकदा पाहावे आणि उहापोह करावा.         याच विचाराने मोठमोठी नियतकालिके ज्यांचे  नाव ऐकून असतो आपण. वाटले एखादे सुरू करावे आणि आपणही त्या महान ...
 जागो भाई! जागो जन मन के रखवालो जागो मेरे प्रिय भारतवालो अब समय नहीं है रुकने का अब समय नहीं है झुकने का आओ दुष्टों को दल डालो मुठ्ठी मे कस के मल डालो जागो जन मन के रखवालो जागो मेरे प्रिय भारतवालो एक ऐसा दौर जो है आया मेरे देश पर है काला साया अब कौन इसे हरायेगा और कौन हमे बचायेगा खुद हिम्मत करके उठना है खुद ढाढस बंधवा जुटना है इक इक उंगली को साथ करे और हाथ ही जीवन सार्थ करे ये सबका अजमाया नुस्खा पुरखों का जांचा परखा है तुम एक अकेले काफी हो बढ चलो के झुंड के आगे हो हर कदम तुम्हारा आगे है देखो के दुष्ट अब भागे है अब तेज चलो बस रुको नही पालोगे जो कुछ पाना है इस एक कदम से राह बदल तुम पहुंचोगे जहाँ जाना है अब सच्चाई और अच्छाई जांचो परखो फिर साथ करो.. झुठे वादों के बाराती अब दफा करो जी साफ करो के सच्चाई का साथ कभी ना छूटे ऐसी गांठ करो मन वचन कर्म और वाणी से बस नित्य सत्य का साथ करो.. अब समय नहीं है रुकने का अब समय नहीं है झुकने का आओ दुष्टों को दल डालो मुठ्ठी मे कस के मल डालो जागो जन मन के रखवालो जागो मेरे प्रिय भारतवालो जागो जन मन के रखवालो जागो ...
अगतिक धरा  शेवटी वैतागून पृथ्वी म्हणाली चला निघा बाबांनो इथून   आता तुमचं तुम्हीच पहा, पुढे व्हा  राहू नका. इथे तुम्ही राहू शकणार नाही  या पुढचे येणारे दिवस काही तुम्ही  सुखाने पाहू शकणार नाही तुम्ही साहू शकणार नाही ... मलाच माहीत ते काय असते  धुराचे लोट, अग्नीचा जाच, आणि वायूंची घुसमट,  थपथपीत भूमी आणि रटरटते अंतरंग घोंगावते वेडे वारे,  माझ्या त्वचेवरील रसरशीत फोड  नी ठसठसणाऱ्या जिवंत जखमांच्या खपल्या तरी, सगळे सगळे साहून  सूर्याने ओकलेल्या  ह्या ह्या काळया पांढऱ्या राखेतून तुमच्यासाठी,  हो हो तुमच्यासाठीच ही हिरवाई निर्माण केली होती  आणि तुम्हीच त्याचा फक्त विध्वंस चालवलात ? ...  शी ss वीट आलाय मला आता ..  आता माझे तरी कितीसे आयुष्य राहिले आहे ? माझे असे जे काही होते नव्हते ते  सर्वस्व पणाला लावून मी तुम्हाला जगवले आहे ...  पण, पण मनमोहक मृदेच्या सुगंधाने दरवळणाऱ्या माझ्या अंगाखांद्यावरील माझी हिरवाई नष्ट करून  पुन्हा सूर्याने दिलेल्या काळया पांढऱ्या राखेत मला परिवर्तित करू इच्छिताय दुष्टांन...
राजा  (मूळ रचनाकार आदरणीय कविश्रेष्ठ मंगेश पाडगावकर, बोलगाणी, १९९०) राजा भरी सभा में बोलता राजा बरबस ही रो पडता था प्रजाजन की चिंता में पलक झपकते डूबता था राजा बडा अभिनेता था, राजा था शिकारी,  इतना वैभव होते हुए भी राजा था भिखारी ! कई मूर्ख बंदरोंकी टोपियाँ उसने ली थीं  और जिनको पहनानी थीं टोपियाँ पहनादी थीं ! जहाँ रखता हाथ वहीं जी भरके पकवान डकार जाता चाहे जैसा राजा वही पत्रकार भी छपवा देता ! भिखारी क्यों था ? राजा को ही पता था ! (वैसे उसका मन कहते हैं भीतर से बहोत भावुक था !)   राजा रोज मुकुट पहनकर आईना निहारता जाता,  स्वयंपर प्रेम करता अपनी तरफ देखता जाता !  प्रजा सारी मुठ्ठी में थी, जयजयकार करती खोखले वादे खाते खाते अपना पेट भरती सभी गुंडों दबंगोंपर भीतरसे जमाए ताबा थे उसका भविष्य बताने हेतु एक बडे बाबा थे बडे बाबा के बाद उसकी खुदपर भक्ती थी खुदपर प्रेम करना यही उसकी शक्ती थी राजाका यशगान स्तुती के छंद सारे याद थे  राजाकी सेवामे तत्पर ऐसे ऐसे भाट थे         (भाषांतर धारिष्ट्य अँब्रोस चेट्टियार) राजा  (मंगेश पाडगावकर, बोलगाण...
 चीनवा क चीनीया क भर भर बोरिया हो उतरल हमरी दुवरवा क ओरिया तूँ पढ लिख भईला सयान मोरे बिटवा  ई छाप देसी बोरियापे कईसे बिदेसिया 
एक एक रोप  चल रोप रोपुया गड्या  बरगड्या शाबूत हाईत जोवर रान मोकळे उजाड जंगल  देई सरण मग कुठवर ?                 चल रोप रोपुया गड्या भ्रांत उद्याची नाही राजा  देह अपुला मिळता भूता  का न करावे अर्पण नश्वर  देह सृष्टिशी आपण सत्वर                    चल रोप रोपुया गड्या आपण राखू आपण चाखू  सन्मानाने आदर देखू रोप रोपुनी वृक्षराजीचा  फुलवू हिरवा डोगर                   चल रोप रोपुया गड्या झाड राखुनी जीवन जगवू  पीढी उद्याची आजच राखू व्यर्थ न व्हावे सुखस्वप्न हे  घाम गाळुनि कष्टू भरभर                    चल रोप रोपुया गड्या वेळ मोडता अनर्थ घडतो  गाफील होता दुर्जन चढतो  डोळस तत्पर कार्यमग्न हो   निसर्गरक्षण ध्येय आयुभर                    चल रोप रोपुया गड्या      *अँब्रोस चेट्टियार...
....नुकतेच महाबळेश्वरला जाणे झाले आणि आश्चर्याचा भयंकर धक्का बसला .. जातानाचा प्रवास रात्रीचा झाला असला तरी पण पहाटे पासून घाट आणि आसपासचा प्रदेश,    वाटेवरील डोंगर रांगा यांचे दर्शन झाले आणि धस्स झाले. उघडे बोडके रखरखीत डोंगर दिसले..खूप दुःख झाले..फक्त उंची मुळे जो काय थंडावा मिळेल तो मिळेल त्यात विशेष काय ती तफावत असणार ? वातावरण शुष्क आणि किंचित अगदी किंचित कमी गरम ठाण्या मुंबईच्या तुलनेत म्हणा .. थंड असे म्हणताच येणार नाही इतके असे  .. अर्थात भर उन्हाळ्यात असेच असणार ना ? पण आपल्याकडील सुप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणांत महाबळेश्र्वरचा क्रमांक तसा वरचा लागत असतो. अशा ह्या ठिकाणी लोक उन्हाळ्यातच सहसा जातात ना ? मग? एवढे नामांकित स्थान पण नेहमीपेक्षा वेगळा असा फक्त प्रवास आणि थोडेसे आल्हाददायक असे व्यावसायिक भटकंतीचे वा व्यावसायिक प्रेक्षणीय स्थळ इतकेच उरलेले आहे की काय ?..बाकी बजबजाट आणि बजबजपुरी म्हणाल तर मात्र व्यवस्थित माजलेली दिसते.  ....निसर्गरम्य अशा ठिकाणी स्थानिक म्हणून सामान्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांची, ज्येष्ठ विचारवंत, नेते व तत्सम सर्वच लोकांची काह...
 म्हशी गं म्हशी  म्हशी गं म्हशी कैशे  भानगड में फशी अगं बाई!  म्हशी गं म्हशी कैशे  भानगड में फशी पायात गळेमेकी  दोरी अडकी sss म्हशी मैं म्हशी ऐशे  भानगड में फशी सिधे सरळ वाटानी वाकडंच चालती हुं sssss सिधे सरळ वाटानी वाकडंच चालती हुं पायामधी पाय फसके पडी तोंडघशी अगं बाई !  म्हशी गं म्हशी कैशे  भानगड में फशी पायात गळेमेकी  दोरी अडकी sss म्हशी मैं म्हशी ऐशे  भानगड में फशी चांगल्या मधी चांगलं मैने  देखा कभी नही sss चांगल्या मधी चांगलं मैने  देखा कभी नही घान चिवडून चिखलामधी  लोळणे में खुशी अगं बाई!  म्हशी गं म्हशी कैशे  भानगड में फशी पायात गळेमेकी  दोरी अडकी sss म्हशी मैं म्हशी ऐशे  भानगड में फशी      *अँब्रोस चेट्टियार*  
अर्रे मतचोरांनो चोर तुम्ही करणार तुम्हाला  फक्त येतसे चोरी  देणे घेणे अन् लाटालाटी एकच तुमची नीती चोर तुम्ही करणार तुम्हाला  फक्त येतसे चोरी  थुंकावे वा चाटावे हा खेळ तुम्हाला प्यारा  आदेशाचे पालन जीवन  हीच तुमची थेरी चोर तुम्ही करणार तुम्हाला  फक्त येतसे चोरी  देणे घेणे अन् लाटालाटी एकच तुमची नीती चोर तुम्ही करणार तुम्हाला  फक्त येतसे चोरी  मगरीला ही लाजविणारे उलटे काळिज तुमचे  दुग्धामृतही पाजुनी झाले विष फुटले नंबरी चोर तुम्ही करणार तुम्हाला  फक्त येतसे चोरी  देणे घेणे अन् लाटालाटी एकच तुमची नीती चोर तुम्ही करणार तुम्हाला  फक्त येतसे चोरी  जनतेचे हित मानवताहित तुमच्या गावी कसला  गरीब लुटावे स्वार्थ साधनी एकच जप अंतरी चोर तुम्ही करणार तुम्हाला  फक्त येतसे चोरी  देणे घेणे अन् लाटालाटी एकच तुमची नीती चोर तुम्ही करणार तुम्हाला  फक्त येतसे चोरी     *आपलाच मतदार*      *अँब्रोस चेट्टियार*
  देणे सृष्टीचे उमलून फुल ते फुलले बहरले सुख वाटुनी लयास गेले चक्र प्रकृतीचे चलायमान रथ अविरत फिरत राहिलेले रंग गंध नी चित्र मनोहर मोहून घेई पुष्प पर्ण तर नजर रोखुनी पाहू निर्झर वाहे घन नीर मोकळाले केवळ स्मरण मात्र चित्र ते आठवणीतून मागे नेते रम्य काळ तो आता नुरला मुठीतुनी वाळू गळलेले पुन्हा हिरवी ही सृष्टी होईल पान फूल रस गंध नी दरवळ नव्या पिढीला मोहून टाकील कळून मर्म मग तेच राखतील मागील पिढ्यांचे जे चुकलेले मागील पिढ्यांचे जे चुकलेले     ©अँब्रोस चेट्टियार