पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

यह भारत है

  यह भारत है किसी समय किसी विचार ने भारत को कम्प्यूटर नही दिया उसका जवाब भारत ने सूपर कम्प्यूटर बनाकर दुनिया को दे दिया ऐसा क्या कुछ नही है जो भारत ने नही कमाया हो... आज भी कोई दुविधा हो भारत और भी निखरता ही जायेगा .. गलतफहमी ना पालें .. ..यह भारत है नवनीत नित नया.. हमेशा से हमेशा के लिए .....      ©अँब्रोस चेट्टियार

कोण कुणाचा

  कोण कुणाचा ते ते तिथले पीक पाणी त्यांच्या मालाचे ते ते वाणी गुणाचा नी वाणाचा त्यांच्यावर फरक काय पडणार शेवटी परीसर हाच जास्त परिणामकारक ठरणार त्यावरच त्याचा प्रतिसाद ठरणार.... लागे बांधे सख्य सोयरिक जमीन हवा पाणी तसे निपजणार त्याची बांधिलकी तिथल्यांशी एरव्ही आपण आपल्या उत्तम वागण्याने जग आपलेसे करायचे असते. नाही का... अन्यथा कोण कुणाचा या जगी हे सर्व जग जाणून आहे... पण आपल्या वागणुकीने आपण त्याला आपलेसे करू शकतो आपल्याला हल्ली सर्व आपले असे सांगावे लागते उलट त्यांनी सांगावे मी तुमचा.... त्याला हवेहवेसे वाटावे असे आपल्यात काय आहे असले नसले ते वाढवावे की उगाचच हपापलेल्या अधाशापरि तोंड वेंगाडून सतत त्यापुढे याचक व्हावे... बांधव येत होते आपल्याकडे आताशा येत नाहीत. का बरे.. याचा विचार कोणी करावा.. ह्या प्रश्नाच्या उत्तरातच सर्व प्रश्नाची उत्तरे आहेत.. हे विश्वचि माझे घर म्हटल्यावर आपण नवीन काय सांगतो आहोत आपले तसे वर्तन आहे का तर नाही आज नुसते अवमान कारक नर्तन सुरू आहे चौफेर, चहूकडे.. हम्म !...       ©अँब्रोस चेट्टियार

दीपावली ||

  दीपावली  || रांगोळ्या काढा तुम्ही दारे सजवा फराळाचे गोड करा सण साजरा || सुखाच्या क्षणाच्या आनंदलहरी भरजरी माया होई प्रेम जरतारी || खेळती हासती थोर अन  लहान मायबापास मोठा खजिना महान || दारोदारी प्रफुल्लित सोज्वळ प्रकाश दीप रोषणाई गोड पक्वान्न सुग्रास || सर्वां सुख लाभे आसमंत उजळे फराळात मोद रमती कुटुंबकबिले ||      ©अँब्रोस चेट्टियार

नीतीमत्ता

नीतीमत्ता बोलावे मोठे बोल पिटावे ढोल खोलावी पोल मग अलगद आपुलीच | उभे राहावे पाठीशी पुसावे डोळे नी खेचावी सतरंजी शोकसभेतच सांत्वनाच्या | घ्यावी हृद्य गळाभेट ओसंडुन हस्तीदंती पाठीशी सोडचिट्ठी तयारीची असो द्यावी | कधी इथे तर कधी तिथे लाचारीचे जिणे कृतघ्न नराधमांचे राजकारण पर्वा नसे त्यांस समाजाची | नवसमीकरणाची उत्तरे तयार तयांची सत्वरे जनतेस मात्र ज्ञाती-पक्ष पथ्यापथ्य भेद काय त्यांना नाही | नीतीमत्ता असता खरी कीर्तीप्राप्ती व्हावयास ते मानवतेची मशाल घेऊन ज्योत जागृती सातत्याने जनता धरती उरी | सामान्याची डोळी ओली मित्र अमित्र पायी साखळी त्यांची ऊठबस मात्र सोवळी अमित्र पक्ष वा कृतघ्नासही हसून देती भेट गळा | असे वागणे दोटप्याचे राजनीतीला क्रूरनीतीचे काळिम कारण नाव धराया हर्षे रचती धडा | आयुष्याची माती केलीस ज्ञानाचीही शकले केलीस गोळाबेरीज आयुष्याची जमून आल्या दुधात विरजण वा मिठाचा खडा | एकच निघतो नरपुंगव तो युगायुगातुनी गाते गाथा आजही सृष्ट्ये सिद्धची केले जनजलधिचा घेउनी तांडा चालताहे एकटा |     ©अँब्रोस चेट्टियार

भारत जोडो |||

भारत जोडो ||| मनामनातून कणाकणातुन  स्वर उमटला अंतरातुन मैत्र भावना घडो भारत जोडो ||| पदस्पर्शाने पुलकित धरती माती स्पर्शुन लोक हरखती हिरवाई अन काळी आई भेट मनुजा घडो भारत जोडो ||| सृष्टीचा अन मानवतेचा पिंड एक तो भूतदयेचा क्रूर दुष्ट धडपडो भारत जोडो ||| सर्वजनांचा निसर्ग राजा पृथ्वीमाता सर्वजनांची भेदाचे तट झडो भारत जोडो ||| ज्ञान तुझे हे थोर लेकरा जाणून घेशी जनसागरा जननायक मन घडो भारत जोडो ||| विपरित समयी तू अवतरला मानवतेचा ध्वज मिरविला दुष्टक्रूर मती झडो भारत जोडो |||       ©अँब्रोस चेट्टियार

सक्काळची सोबा

  सक्काळची सोबा असंल ईस बावीस वर्सामागली गोष्ट.  सक्काळी सक्काळी चाळीशेजारच्या वरांड्याच्या शेवटी लायनीत, गटाराला साताठ बारक्याली बिनचड्डीची, बच्चे कंपनी कुनी फराक, कुनी शर्ट, कुनी उगा गुडघं कवंत घिउन आपली बसल्याली. तीन पाच चिमुरडी, गटारात पडूने म्हून जर्रा लांब बशिवल्याली. जरा डोंगर मोटा केला की फुडं सरून जागा बदलून बसायची. यकदोन सोल्ली तर बाकी समदी गप्पा हानत, मोकळी होत व्हती.  इकत्यात तिथं तेंच्या चाळीतच वस्तीला असनारा कुत्रा काळ्या आला.  त्यानं यक नवीन कुत्री, मैत्रीन जनू आनली व्हती. आपलं साम्राज्य दाकवाय आनल्यागत जोडीनं चक्कर टाकून दाकवित व्हता. तेवडं म्हत्वाचं काम झाल्यावर दोगंबी बारकाल्यांच्या डोंगराकडं वळली. दोगानी यक यक निवल्लं. त्यांचा धसका घिऊन यक बारकं,  पावनं असंल ते हिकडं, ते घाबरून "यायोsss " म्हनून भॉकाड पसरत पळालं   त्याला समदी हासली पन कारीकरम चालूच व्हता. काही  नवीन येत व्हती, काही उरकून जात व्हती. पन लांब पल्याची, बाकीची,  सराईत कारबाऱ्या वानी आपली गप्पा हानित व्हती, मनसोक्त हागत व्हती.    ©अँब्रोस चेट्टियार

उपकार

उपकार कितीही स्मरावे करोनी प्रयत्ने तरीही न सुचले ते कार्य काय व्हावे हारोनी मग हो किंकर्तव्यविमूढ स्मार्टफोन घेऊनी सर्च करावे कित्येक खर्चोनी तास फुकाचे आठवास पाझर फुटायचे राहावे विस्मरणात गेलेले कार्य कशाचे खेळात रंगोनी पुन्हा विसरावे प्रभाते बळाने शयन त्यागोनी प्रातर्विधीस जाती  नित्यनेमाने हट्टाने परी सर्व भावे ते करती मग पब्जी खेळती अनिर्बंध छक्के पंजे सर्व गेमचे तोंडपाठ कालचा गृहपाठ त्यासि आठवेना घरातील कामे ती नेमेचि विसरती उगा त्रास चेकिंगचा म्हणे गुरूपालकांना असे खूप उपकार त्यांचे जगावर कधी दंभ त्याचा त्यांना नाही झाला उगा म्हणे कुणाला दुखावित नसती या इवल्या जगाचा नसती ते प्यादा जगा नी जगाला जगू द्या हे ह्यांचे ब्रीद पटेना पालका ब्रेन म्हणे त्यांचे विपरीत त्रिकाळ खादीचे स्पॉन्सर नाही म्हणोनी गृहत्याग आदेश येता स्वयं शरणागत   ©अँब्रोस चेट्टियार

नशिबाला धोंडा

नशिबाला धोंडा तिने त्याला भुलून वरले त्याने तिला भुलवून वरले तिच्या समोर लीला दाखवी तिच्या मनात भरून राही || बघता बघता दिस सरू लागले तिला काही बोचू लागले तो अगतिक जणू बापुडा तोलतो आहे संसारगाडा || तिला बोलावे वाटे दुखले खुपले केविलवाणा चेहेरा त्याचा  शब्द तिचे तिच्या उरी घुसमटले || आणखी दिवस सरता सरता खपली धरता धरता जखमा वाढत गेल्या || स्फोट तिच्या भावनांचा होणे स्वाभाविक झाले दोन जिवांचे ठीक होते तिसऱ्या वरही प्रसंग बेतले || आता उपाय पुन्हा सोयीचे करावे त्यांचे भासेलसे घरकुलाचा पिंजरा केला खेळात रमली माय पिले || पुन्हा होते उजवे डावे मन मारून जगावे लेकरांची ती  आबाळ देखवेना || आता मनाचे करावे घरकुल सावरावे पिले हसवावी पाचवीस पुजिली दीनता ज्यांच्या || देखावा हसरा निर्माण झाला पिले सुखावली कुंकू चमकू लागले गोतावळा तसा होताच थोर || त्याला गणगोत फार त्याचे करीत जबर पुन्हा लेकरांची झाली हेळसांड || आले आजाराचे फॅड कितिकदा ते तयाला त्यांचे करावया कोण कुत्रं फिरकेना || तिच्या घरची राबली, कष्टली ना दावता रुबाब आल्यागेल्यांचे ही केले किमत...

क्याट वॉक

  क्याट वॉक      म्हशींचं लचकत मुर्रडत शेपटा फिर्रवत टोळकं चाललं व्हतं. काही फुडं काही मागं. शेवटली तर्र हिरविन म्हस, जर्रा जास्तच लाडीक,  मुर्रडत लचकत अलगद पावलं टाकित,  क्याट वॉक कर्रीत चालल्याली. ती सोबतिणीला काय काय सांगत चालली व्हती. जर्रा लक्ष केलं तर ऐकून घाम फुटला नी सोबतिणीचाही जीव कासावीस झालेला. इथंच धरणी दुभंगावी नी पोटात घेईल तर बरं  अशा धावा करतीशी वाटली. आन मी चाट पल्लो न काय ...पार त्यांचा नाद सोल्ला .. पन तिचं म्हन्नं काय डोक्यातच फिरत व्हतं सार्रकं " लाजा न्हाईत मेलिंला कशा चाल्ल्यातं बग की उगड्या बोडक्या" ............ ©अँब्रोस चेट्टियार

गांधी

  गांधी आता पर्यंतच्या अभ्यासात फक्त गांधी बद्दलचे पूर्वग्रहदूषित अज्ञान , स्वतःचे स्वार्थ , दूरदृष्टीचा अभाव , माणुसकीचा विरोध करणारे लोक गांधीचा विरोध करताना आढळले. ©अँब्रोस चेट्टियार

गाँधी

  गाँधी असलेले नसलेले अनंत दोष दुर्गुणे दाखविली, ती बाजूला सारली तरी उरलेला गाँधी दैदिप्यमान आणि हिमालयाहून उंच उरतो. ©अँब्रोस चेट्टियार