पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अक्सर तुमने

अक्सर तुमने इतना कुछ कह डाला इतना कुछ पढ डाला तुमने इतना कुछ कह डाला इतना कुछ पढ डाला लोग सुनते रहे सराहते रहे  लोगो ने जब अपनी कही  तो कहते हो कि बस चूप रहो ..... *©अँब्रोस चेट्टियार*

करण , कारण

 करण , कारण  *कुछ तो रही होगी बात तुझमे ऐ साहिल   यूंही ही कोई मंझधार मे कश्ती नहीं बदलता*    ..... *©अँब्रोस चेट्टियार*

Open ओपन

 खूप वर्षे हरवलेली स्मृती अचानक समोर यावी आणि जिने आपल्याला झपाटून टाकावे असे काहीसे माझे झाले ... चार दिवसापूर्वी ह्या पुस्तकाची निसटती पोस्ट पाहिली आणि माझे टेनिस प्रेम जागे झाले. जगातील एकमेव मैदानी खेळ ज्यात मला रस असून तो ही मी कधीच खेळलेलो नाही असाच खेळ ( मी आयुष्यात एकही खेळ खेळलेलो नाही कधीच ).. पण टेनिस चे सामने टीव्ही वर पाहण्यात रमून जात असे . तेवढे एकच मला सहज उपलब्ध होत असे..  तर ह्या पुस्तकाची पोस्ट पाहिली आणि मराठी आवृत्ती शोधली , सापडली मागवली आणि paperback पुस्तक  काल हाती पडले..        ....आंद्रे आगासी हा काही तसा माझा आवडता खेळाडू नव्हता.. टेनिस मधील एक तारा म्हणजे तारका स्टेफी ग्राफ ही माझी आवडती खेळाडू. तिचे सामने भान हरपून मी पाहत असे.. आणि हे पुस्तक हाती पडे पर्यंत ह्या दोघां मधील विशेष संबंधाचा विसर पडला होता.. पुस्तक हाती पडले नी चाळू लागलो नी आठवले की स्टेफी ने ह्याच्याशीच लग्न केले होते.. गूगल केले नी पुस्तक मागवल्याचे चीज झाल्या सारखे वाटले.. तर हे नमन पुन्हा कधीतरी .. .... ओपन हे पुस्तक हाती पडले नी सवयी प्रमाणे अक्षर नी अक...

आवाहन

आवाहन कोण्या रावणाचे छाटू गे शीर कोण्या दुर्जनाचे उपटू हात कोण्या महालाला जाळू गे माये कोण्या बाणाने करू भस्मसात,  एकसाथ, बलात्कारी जमात... हाती धरुनी राजदंड नी स्वर्णाभूषण धन कनात  किळसवाण्या ओंगळ नजरा  विकट भयंकर हास्य प्रपात सारे चेहरे एकसारखे,  बरबट घाणपुरित तैनात फुलण्याआधी कुसुम कुस्करून  लोटती अट्टाहासे दैन्यात हेरून एकेक नराधम तो  तात्काळ धाडू वाटे यमसदनास अनंत शक्ती लेखणीबळ का  न्याय* त्यागून हास्यास्पद आज आज पुरुष का नुरला कोणी  हतवीर्य तो हतप्रभ प्रभुचा कालीरूप जगदंबा धरता नरमुंडमाळ अगणित मग गणता..  सत्यानाशा प्रकृति* सृष्टिचा  धजावणारा देह दंडण्या अधमातुन मानव घडविण्या  स्वत्व रक्षण्या स्त्रीत्व रक्षण्या उच्च कोटिचा विचार मूर्त व्हा न्याय्य न्याय व्हा सर्वोपरि व्हा     *©अँब्रोस चेट्टियार*

थोर शिक्षक

  थोर शिक्षक धोतर लेवून, लेखणी, चष्मा घेऊन गोमुखासनात बसणारा अवलिया जगाला देतो अनमोल शांतीचे ऐश्वर्य़... भराभरा लिहित जातो आपल्या गिजमिज्या अक्षरांनी चळतीच्या चळती, तावच्या ताव... कशा कळतात मुद्रकाला कोण जाणे त्याच्या कागदाचे भाव ..... जगभर लोक वाचतात आतूर होऊन पुढे काय, पुढे काय... .. सांगतो आत्म्याला सुखावणारे,  असे काही तो बोलतो... किडमिड्या अक्षरातून भाव मात्र चोख, हृदयाला पोचतात.. जणू दिसते त्याला पुढचे सारे तो जपायला सांगतो एकमेकांना नी जपायला शिकवतो पाणी, सृष्टी, प्राणीमात्र... भूतदया, श्रद्धा, प्रेम, शांती, करूणा आणि अहिंसा ... तो शिकवतो सूत कातायला नी लज्जा राखायला तो सांगतो जमीन राखायला नी प्रेम फुलवायला तो शिकवतो हातात हात घालून नांदायला त्याचे हातच मोठे, आजाणूबाहूच तो रामकृष्णबुद्धा सारखा ख्रिस्तालाही जवळचा सर्वांचाच आपला असा ... त्यामुळेच जगाने त्याचा मानवतेचा एकमेव धर्म सर्वोपरी हे मानले.. सर्व धर्मांचे मूळ नी सार एक, अखिल मानवजातीचे सुख... किती सरळ, साधे आहे त्याचे तत्वज्ञान.. सरळ साधे वागणे, बोलणे नी जीवन.. म्हणून आज त्याचे महत्व...