ह्या असल्या निर्णयाला एकूण समाज म्हणून आपण सर्व दोषी आहोत .. पालक म्हणून तर आपल्या कित्येक पिढ्या नालायक ठरल्या आहेत ..आणि त्यात आता तर कळस गाठत चाललो आहोत.. अगदी काही पालक आपल्या व मुलांच्या प्रगती बाबत जागरूक असतात. आणि कसून प्रयत्न करताना दिसतात. बाकी सर्व स्वार्थाने बरबटलेले संकुचित आपल्या पुरते पाहणारे आणि भरपूर माया येन केन प्रकारेण जमवणारे. ...हल्ली good parenting चे ही त्यामुळे पेव फुटलेले आहे.. आणि म्हणून हल्ली जोक्स .. *संस्कार हमारे समय कूट कूट कर भरे जाते थे* वगैरे ही दिसते आहे..आणि जे खरे असले तरी त्या साठी लागणारे श्रम खंबीर प्रयत्न कोणालाच घ्यायचे नसतात.. अगदी गाफील झालो आहोत.. या वरून नुकताच ध्रुव राठी चा व्हिडिओ आठवला आणि तो मुद्दा पटण्यासारखा आहे ... *जेव्हा जेव्हा एखाद्या देशाची जनता गाफील झाली तेव्हा तेव्हा ते ते देश रसातळाला गेले आहेत..* होईल सर्व ठीक हा भाव सोडायला हवा .तसे होत नसते सर्व नष्ट होते ...काही आपसूक ठीक होत नसते. प्रचंड मेहनत घ्यावी लागते. झटावे लागते. नुसते वाभाडे काढूनही जमत नसते. प्रत्येकाचे प्रयत्न लागतात समाजाला सर्वंक...
पोस्ट्स
मार्च, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
विचित्र आहे जरी अविचारी विचार हा सहज सुटतो नजरेतून परि वाहतो निर्बाध निरंतर घेत जात आहे पुढे पुढेच पिढ्यानपिढ्याचे करुनी ग्रास हा ! सहृदय जनांची यात मोजणी नाही हे कृपया ध्यानात घ्यावे 🙏 वर्षानुवर्षे करत आलेले एक निरीक्षण मी आपल्यापुढे मांडत आहे. याला पुढे मागे कोणी आकडेवारीचा आधार देऊन याची पुष्टी ही करतील त्यांचे स्वागतच... तर अनेक जण घरात शोभिवंत वा वृक्षवल्ली , प्राणी, पक्षी, कुत्री, मांजरी इ पाळतात.. त्यातही विशेषत्वाने त्यांना तसे करण्यास कोणी तथाकथित हितचिंतकांनी सुचविलेले वगैरे असतेसे दिसते. कुत्री पाळणाऱ्यांचा रानटीपणा दिवसेंदिवस सामान्य जनतेला त्रासदायक होत आहे. आपल्या पाळीव कुत्र्याबद्दल प्रचंड कणव असलेले हेच लोक दुसऱ्याच्या लेकरांच्या बाबतीत कसे हिंस्त्र होतात नकळे... ह्यांची कुत्री त्यांना भुंकतात, प्रसंगी चावा घेतात, रक्तबंबाळ करतात आणि तरीही हे लोक आपल्या जनावरांचाच बचाव करताना दिसतात. असले वागणे असल्या पालकांचे आपल्या हिंस्त्र मुलांच्या ही बाबतीत असते. मग त्यांच्याकडे पाळीव प्राणी असो किंवा नसो असेल पालक समजा साठी घातकच ठरतात. परंतु बरेचदा असल्या लोकांकडे चांगल्...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*ठाण्यातील बुवाबाजी गजाआड* गरजू मुली ,महिलांना सावज करून पैशांचा पाऊस पाडण्याचे खोटे प्रलोभन दाखवत लैंगिक शोषण करणाऱ्या ७ जणांच्या टोळीचा पर्दाफाश ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिस पथकाने गजाआड केले. नराधमांनी महाराष्ट्रातील विविध भागातील १७ मुली आणि महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे तपासादरम्यान सिध्द झाले आहे. सर्व आरोपी हे राबोडी भागातच वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई पंजाबराव उगले अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे, शिवराज पाटील पोलिस उपायुक्त , नीलेश सोनवणे सहायक पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील, पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणी आदींच्या पथकाने कारवाई केली. *या सफल धडक कारवाई बद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शाखा ज्येष्ठ कार्यकर्ते माई वंदना शिंदे , कार्यकर्ते राजेंद्र चव्हाण , नितीन भवर, तसेच ठाण्यातील ज्येष्ठ कामगार नेते जगदीश भाई खैरालिया यांनी काल दिनांक 03 मार्च रोजी भेट घेऊन ठाणे पोलिस युनिट एकचे अभिनंदन आणि कौतुक केले प्रत्यक्ष स्थळावर कारवाई करण...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
🙏🙏🙏🙏🙏🙏 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शहर शाखा पाक्षिक बैठक वृत्तांत अंनिस ज्येष्ठ कार्यकर्त्या माई वंदना शिंदे यांना ऐनवेळी कर्जत येथील एका कार्यक्रमास हजेरी लावणे आवश्यक असल्याने त्यांना बैठकीस येण्यास उशीर होणार होता म्हणून सदस्यांनी बैठक सुरू करावी असा सल्ला त्यांनी दिला होता त्याबरहुकूम अंनिसची नियमित पाक्षिक बैठक रविवार 03 मार्च 2024 रोजी, अंनिस कार्यकर्त्या पुष्पाताई तापोळे यांचे निवासस्थानी वोल्टास कॉलनी वसंतविहार येथे पार पडली. या बैठकीस नवीन सभासद उदय छत्रे , पुष्पाताई , तापोळे सर, अथर्व , कल्पना आणि अँब्रोस चेट्टियार इ. उपस्थित होते. ओळख परेड होऊन बैठक चर्चेस सुरुवात झाली. विद्याविहार येथील सोमैया इंजिनीअरींग कॉलेजात प्रोफेसर म्हणून कारकिर्द आणि सेवानिवृत्त झालेले उदय छत्रे सरांनी त्यांचेकडे वडिलांच्या काळापासून आपले अंनिवा वार्तापत्र नियमित येत असे अशी माहिती दिली. तसेच घरातील वातावरण आणि कुटुंबातीलसदस्य हे बऱ्यापैकी अंधश्रद्धानिर्मूलन पोषक असल्याने विचारांची बैठक तशी होण्यास मदत झाली. तसेच सत्यशोधक मंडळाचे कार्याशी ओळख आहे. असे सांगि...