पहाटे मनात अचानक असे काही उमटते .. त्याचा कार्यकारण भाव काही केल्या उमगत नाही.. तसाच आजचाही प्रसंग...
मनात एक नाव उमटले..
पहाटेची लगबग त्यात ही रुंजी..
धन्या...
धनंजय कुलकर्णी हे ते नाव..
कॉलेजात अकरावीच्या वर्षात हे नाव खूप चर्चेत होते अर्थात मुलींमध्ये ...
आमच्याच वर्गात होता तो पण वर्गातील एक विद्यार्थी यापलीकडे आपल्या डोक्यात दुसरे काय असणार अकरावीची तरुण मुले आम्ही तर आम्ही
.... तर वाड०मय मंडळाचे सदस्य आम्ही आपल्या कामात तसे गर्क असू..
त्याच वेळी ही चर्चा कानावर पडे..
काय दिसतो ..
घारे डोळे कुरळे केस.. गोरापान वगैरे..
पाहीले तर विशेष असे वाटायचे नाही. पण वरील गुण होते मात्र उंची साधारण तर अधिक लक्षात राहण्याचे कारण माझ्या गावात, पातलीपाड्यात एक मोठी जागा भिंतींनी अडवलेली अशी होती.. तिथे दोन भाग होते एक पारसी बंगला आणि एक बानू नरी बाग ..पारसी बंगल्यात आयुक्तांचे निवास स्थान असे तर शेजारी तर त्या बागेत एक कंपनी होती ..जेथे काही paper printing paper folding वगैरे कामे चालत ती कंपनी तेथे कदाचित लीझ वर चालत असेल किंवा ते मालकही असतील. तर ती company hoti कुलकर्णी अशा नावाची . तर त्या कंपनीच्या आसपास एकदा धन्याला पाहिल्याचे स्मरते .. म्हणजे त्या कंपनीचा तो भावी मालक असावा.. आपल्या कॉलेजातील आपल्याच वयाचा मुलगा एक मोठा व्यवसाय चालवण्यात लक्ष घालतो हे मोठे अप्रूप होते.. ह्या सूत्रानुसार वर्गात सहसा मी असताना न दिसलेला धनंजय लक्षात राहिला.
.... एरव्ही आम्ही आमच्या कार्यक्रमात दंग असणाऱ्या कंपूच्या विशेष लक्षात राहील असे काही खूप प्रसंग या व्यक्ती संदर्भात नाही. पण एक दोन वेळा झालेल्या भेटीत खूप छान वागला.. एकदम नॉर्मल तरुण कसलाही मोठेपणाचा आव नाही वगैरे..खूप उमदा तरुण आपल्यासोबत कॉलेजात होता याचे विशेष वाटल्यावाचून राहत नाही... पुढे मात्र संपर्क असण्याचे काहीच तसे कारण नसल्याने.. हे नाव तेवढे स्मृतीत कोरलेले राहिले तेवढेच .. असेल तेथे प्रचंड यशस्वी असणार यात काही शंकाच नाही ... पहाटेचे तरंग..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा