रीचाज

 रीचाज


दमून बसल्या मैतर दोघी जनी गं

कामाचं दिसं सरता सरंना भनी गं 


लेकरू भुकं रांधाया लागा

मालक आला वाढाया लागा

रयाच गेली केसाले नाही फनी गं

मायेची कुशी आठवुन रडते मनी गं


सनावाराले कितीही मरा 

लहानथोराची सेवा करा

तुला नी मला खायाची टोमनी गं 

मायेची कुशी आठवुन रडते मनी गं


अडीनडीले धावावं पुढं

सुखाने कसं निजंल धड

संसाराची गायाची गोड गोड गानी गं

मायेची कुशी आठवुन रडते मनी गं


स्वप्नांची सुखाची रांगोळी हाती

पुढच्या पिढीची सजली शेती

धिरानं जिकतिल मुलंही शिकली शानी गं 

शेवट करतील गोडं ही आशा मनी गं

दमून बसल्या मैतर दोघी जनी गं

कामाचं दिसं सरता सरंना भनी गं 


अशी रोजच्या गप्पांची दवा

जगण्या देई हुरूप नवा

मनमोकळ्या घटकाभर बोलुनी गं 

सज्ज उद्याच्या सेवेला नवतरनी गं

मनमोकळ्या घटकाभर बोलुनी गं 

सज्ज उद्याच्या सेवेला नवतरनी गं

... © अँब्रोस चेट्टियार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी