राष्ट्रपिता
RTI कशी काय चुकीची माहिती देईल..?
म्हणजे..
संविधानिक बाब म्हणजे कायदेशीररित्या राष्ट्रपिता असे कुठे नमूद नसेल ही .. गांधी स्वतःला महात्मा म्हणवून घेणे पसंत करत नसत..
परंतु त्यांना राष्ट्रपिता ही उपाधी स्वतः नेताजी यांनी दिली त्यांचे म्हणणे असे होते की ...
1857 आणि पूर्वी अनेक राज्ये आपापल्या राजेशाही टिकविण्याच्या हेतूने राज्याच्या स्वातंत्र्यासाठी परकीय सत्तेशी लढत होते.. छोटे छोटे शेकडो राज्ये होती.. परंतु Gandhi भारतात आल्यावर भारतीय जनतेचे स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने मिळवायचे असेल तर उभा भारत खंड एकत्र यायला हवा या करिता एक भावनेने लढायला हवे उभे राहायला हवे जे या पूर्वी कधीच झाले नव्हते .. झाशी ची राणी स्वतःच्या राज्यासाठी लढली अर्थात आपल्या जनतेसाठी बंगालचा नवाब तेथील जनतेसाठी साठी इतकेच काय बादशाह सुद्धा लढत होता दिल्ली साठी इंग्रजांच्या विरोधात... मग एक देश कसा उभा करणार .. या करिता भारत भ्रमण करून देश समजून घेऊन जनतेत तशी एकतेची भावना निर्माण करण्याची प्रेरणा घेऊन देश पिंजून काढून सर्वांना एकत्र उभे केले स्त्रियांनाही समान भवनेने एकत्र उभे केले .. जातपात प्रांत भेद रहित एकतेची भावना निर्माण करत अख्खा देश एक केला जो पूर्वी तुकड्यात होता . तो एक झाला तो एकतेच्या भावनेने निर्माण झालेला इंग्रजांविरुद्ध एक होऊन उभा झालेला भारत हा नवीन जन्माला आला होता . त्याचे श्रेय हे गांधीचे निश्चित आहे .त्या एका माणसात एवढी ताकद होती की एकमेकांची भाषा सुद्धा समजत नसताना सर्व लोक एकत्र उभे राहिले होते . अशा एकतेचा जन्म झाला तो गांधीमुळे हे जागतिक सत्य आहे . अशा प्रकारे विविध राज्यात विखुरलेला मर्यादित संकुचित विचारांनी एकमेकांवर आक्रमण करून एकमेकांना जिंकण्यची भावना असलेला हा खंडप्राय भूभाग एकतेचा भावनेने नाव जन्मला आला होता म्हणून त्यांना राष्ट्रपिता हे संबोधन योग्य ठरते . अनेकांना गांधीजींचे विचार उदात्त भावना कधीच समजलेच पटलेच नाही हेही खरे आहे .. त्यामुळे अशी शंका उपस्थित करून आणि असे प्रश्न खणून त्यावर चर्चा करून ते विषय लोकांच्या मनात भरवायचे संघी कौशल्याने असे काम लोक करत असतात अनेकजण त्याला बळी पडतात..
जिथे एक घर टिकवता येत नाही तिथे त्या एका म्हाताऱ्याच्या हाकेने अख्खी जनता शास्त्र टाकून शांततेच्या मानवतेच्या क्रांतिकारी मार्गाने आपले स्वातंत्र्य वैचारिक लढाई लढून खेचून आणते हे उदाहरण जगात विरळा आहे. ...
राष्ट्रपिता म्हणायलाच पाहिजे असे कुठे कायद्याने लिहिलेले नाही नसावेच.. पण त्याने फरक पडत नाही... अख्खा देश त्यांना बापू म्हणायचा.. इतकेच काय सोबत आलेले जगातील अनेक जण त्यांना बापू म्हणायचे.. हे ही खोटे नव्हे... असो...
ह्या उत्तराने तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे पण तुमचे समाधान होईलच असे नाही..असो..जरूर सांगा ..पण पूर्ण वाचा 😊 आणि जरूर अभिप्राय द्या धन्यवाद !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा