माय मराठी

 


माय मराठी


थोर मायेचे गा बोल 

राखे मानवाचे शील

अशा उत्तुंग भाषेला 

लाभे संत जण मेळा


भले थोर आले गेले

त्यांच्या निशाण्या सांडल्या

त्यांच्या बखरीत गुण 

गाती इथल्या चांगल्या


इतिहास साक्षी झाला 

गोड मराठ्यांचा मेळा

जगदूर कीर्ती झाली 

माझा राजा वाखाणला


माझी संताई मुक्ताई

विश्व जाणतो ज्ञानाला

नाही भेद सान थोर

ज्ञान बुद्धीचा भुकेला


परी का हे विपरीत 

घडे अज्ञानाचे कोडे 

बुद्धी निर्मिक निर्मीत

तरी भुताचे वावडे

 

कुणी दीन हून आला

कुणी कला दावायाला

दिली ओसरी परक्याला

ताटातला घास दिला


येई जाई त्याचे गुण

गाते मराठी आपली 

कोण सख्याचे सोयरे 

जाण नाही मनी केली


काय परतावा दिला

भल्या यजमाना टोला

भलाईचा काळ गेला

कोण पुसे याचकाला


कोणी आतून पोखरे 

कोण पाठीशी दे घाला

कोणी शब्द लाथाडोनी

देतो डागण्या पोटाला


उलटला अतिथी का 

चूक कोण काय बोला

माझी मराठी भाबडी 

कशी फसते खोट्याला

        © अंब्रोस चेट्टियार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्रपिता

राहुल गांधी