असे आयुष्य असते
ते जगावेही लागते
कित्येक जण असे जगत असतात..
आपण पहावे लागते ..तेव्हा ते दिसतात
ते असतात, ते जगतात..
असे आयुष्य असते ..
तुम्ही पाहिले म्हणून जाणले..
आपली माणसे आपली माती
आपल्या माणसांची माती
आपल्या मातीतली माणसे ..
सर्व सर्व असते डोळ्यादेखत असते
पण कळत नाही
वळत नाही
मुद्दाम समजून उमजून पहिल्या शिवाय
ते दिसत नसते
पण असे आयुष्य असते आणि ते जगणारी माणसेही असतात..
ते असेच विरघळून जातात आपल्या मातीत ..
एक दिवस ..
मातीतून जन्म घेऊन पुन्हा मातीत मिसळतात.. कोणालाही काहीही न सांगता सवरता. ...
.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा