उमज

 *उमज*

आता तरी उमगेल का 

जाणेच फोल कळेल का 

झाला उशीर आहे आता 

फिरणे  परत जमेल का  

 आता तरी उमगेल का ....


तुझिया गडात मी बंदी ग 

तुझी देख रेख माझ्यावरी 

श्वासांत मी कोंडतो तुला 

हो दृष्ट तू केव्हातरी 

आता तरी उमगेल का ...


आंदण दिले आहे तुला 

मी जीवनाचे श्रेय सखे 

आता फिरून येणे कुठे 

परतीचे वेध आता सखे    

परतीचे वेध आता सखे        

आता तरी उमगेल का ...

              *अँब्रोस चेट्टियार*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी