पुनर्भेट मानवसेवा
पुनर्भेट
तारुण्याला
पडते स्वप्न
युवक होती
कार्यमग्न
एकामागुनी
एक एक तो
विचार स्फुरतो,
मूर्तची होतो .
आवाहन
एकत्र यायचे
कथा सांगुनी
काव्य गायचे
अन्य छंद ही
आणी कोणी
उपभोगाया
परमानंद
आठवणींचे
रम्य रोपटे
कोनाड्यातुन
पुढेच येते
नवपालवी
पर्णपुष्पही
गुंजारवकर
भ्रमरही येती
रम्य गोड नी
मधुर मनोरम
पुष्प रसाचा
करिता साठा
थव्याथव्यांनी
शोधपथक ये
माक्षिकमधु त्या
शोधित वाटा
छंद कलांचा
रम्यरम्य तो
रसिकजनांसी
बळे ओढतो
कलागुणांची
उत्तमपारख
संस्कृतीशी
नाळ जोडतो
आवाहन परि
नीट श्रवावे
अभ्युत्थाना
सुसज्ज व्हावे
स्वयंप्रकाशी
मार्गसमर्पित
श्वास साधना
नित्य करावे
युवकांमधले
उत्तम शोधा
मानव सेवा
त्यात बिंबवा
पश्चातापा
कारण नाही
बीज उत्तमा
आधी रुजवा
बीज उत्तमा
आधी रुजवा
*अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा