एक व्हा !
एक व्हा !
माय हाका देत आहे
साद कानी येवुद्या
एक व्हा रे एक व्हा
एकतेची ज्योत अपुल्या
अंतरातुन जागवा
माय हाका देत आहे
साद कानी येवुद्या
एकतेचे गीत गाई
सार्थ मानवजन्म होई
एकतेची एक तान
विविध जन एक मन
एक दृष्टी ब्रीद एक
पंथ अनेक ध्येय एक
उघडा डोळे कानहि उघडा
बुद्धी अपुली जागवा
जीवजीवा ओळखूनी
प्रेमज्योती जागवा
सत्य समता बंधुत्वाचा
मार्ग विश्वा दाखवा ...
माय हाका देत आहे
साद कानी येवुद्या
एक व्हा रे एक व्हा
एकतेची ज्योत अपुल्या
अंतरातुन जागवा
माय हाका देत आहे
साद कानी येवुद्या
..... *अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा