प्रार्थना
प्रार्थना
मनरंजन होवो
जनरंजन होवो
मनरंजन होवो
जनरंजन होवो
कलारंजनातून
सुखाचे
सर्जन होवो |
विविध कलांचा
वारसा
व्यक्ती वल्ली,
वाहुन नेते
अडसर संकट
खडतर झेलत
पाउल लीलया
पुढेच जाते
एकच ब्रीदsन
एकच ध्येय
सुखकारक क्षण
गुंफित जावे
समतेचा अन
बंधुत्वाचा
धडा गिरविती
शांतिसुखाचा
हासुनी हसवित
खेळ रंगतो
कारुण्यातुनी
मन जपण्याचा
हास्य फुलावे
बालकापरी
सुख लाभावे
सर्वां अंतरी
ज्येष्ठांचे मिळो
अनुभव आशिष
सर्वांची मिळो
साथ सर्वदा
मनरंजन होवो
जनरंजन होवो
मनरंजन होवो
जनरंजन होवो
कलारंजनातून
सुखाचे
सर्जन होवो |
.....*अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा