साने गुरुजी

 ज्येष्ठ गुरुजी

श्रेष्ठ गुरुजी 

साने गुरुजी 

स्मृती प्रित्यर्थ विचार मंथन...

    लोकांचा असा गैरसमज असतो की आम्ही अमुक महान व्यक्तीचे विचार मानतो पण आम्हाला गांधी मान्य नाही ... तर मित्रांनो समजून घ्यावे ह्यात लोकांची  चूक तर आहेच कारण ते सत्याचा शोध घेत नाहीत. खरं इतिहास तपासून न पाहता जो कोणी वरवर गोड बोलेल त्याचेच ऐकून त्याच्या मागे जातात..... पण हे गौडबंगाल असते ...त्यांच्यावर नकळत तसले संस्कार केले जातात.  त्यांच्या नकळत तसले विचार त्यांच्या मेंदूत घट्ट बसवले जातात. 

        परंतु खरे सत्य मोजक्या शब्दात असे आहे की गांधींना विरोध म्हणजे जीवनाला विरोध,  माणुसकीला विरोध,  सत्याला विरोध ...जगातील सर्व सच्च्या महान विचारवंतांना विरोध.. कारण सर्वांचे मार्ग वेगळे भासले, वाटले तरी त्या सर्वाचे ध्येय एकच असते नी आहे ..तेव्हा ..गांधींना तुमचा विरोध असेल तर आताच तपासून घ्या .. आणि तुम्हाला असे सापडेल की कोणीतरी त्यांच्या विचारांचा वाहक तुम्हाला बनवलेला आहे व त्यांचे  खरे शत्रू गांधी आणि नेहरू व त्यांची समानतेची अहिंसेची बंधुत्वाची विचारधारा आहे.. आणि  त्यांना तुम्हीही नको आहात पण ते तसे न दाखवता पद्धतशीर पणे असे काही विष तुमच्या मेंदूत भरतात व विद्वेष जागृत ठेवतात . सतत तुमचे बाहुले करून ते आपल्यात , आपसात ठिणगी पेटवत राहतात..

        आज साने गुरुजींच्या स्मृती दिनी सत्य शोधा ...खूप मोठे कार्य होईल ...  महान संत, महान विभुती  छत्रपती,  फुले ,शाहू आंबेडकर , विनोबा , गांधी ,  साने गुरुजी आणि असे कितीतरी सच्चे देशभक्त, माणुसकीचे पाईक,  जगाचे कल्याण चिंतक आणि त्यांच्या मार्गावर चालणारे तुम्हीही सच्चे देशभक्त आहात ..हे विसरू नका ..तुमची जवाबदारी मोठी आहे हे विसरू नका...

     खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे |

                                .....©अँब्रोस चेट्टियार 11जून2022

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी