संधीसाधू दरोडेखोर
संधीसाधू दरोडेखोर
अशी संधी दरोडेखोरांना कधी मिळाली नव्हती.
आंधळ्या म्हातारीने गोडबोल्यांना भुलून खजिन्याची किल्लीच दिली होती.
गोड गोळ्यांच्या मुलाम्यातून विद्वेषाचे जहर
इतके बेमालूम लपवले होते की शोधून सापडू नये नी शंका येण्याचे कारणच नव्हते.
ते स्पष्टवक्ते की काय असल्याचे पटवत माझ्याशी बोलताना
हलकेच सोलून काढत माझ्या विरोधकांना मला सांत्वनेचे ग्रंथ ऐकवत
विरोधकांचा सामना झालाच तर त्यांनाही एखादा बोल अलगद लावूुन प्रेमाने चुचकारत
नी पुढच्या क्षणी उडवित तोफ माझ्यावरच
अचानक झालेला हल्ला स्तिमित करी मला
मी हडबडून जात असे पण सांधणे असे त्यांनी कधी केले नाही
तोडण्याचेच काम त्यांचे ...
...जोडतील तर नपुंसक ठरतील त्यांच्या स्वमते...
प्रत्येक काम , ज्यात शांती प्रस्थापित होते... समता नी बंधुभाव अंतिम ध्येय असते..
असली सर्व कामे ह्यांना निषिद्ध ...
पण ते स्वता करणार नाहीत
आपल्या कडून भेद पेटवतील फूट वाढवतील वैमनस्याच्या पीकाची कापणी करतील ..
समविचारी नतद्रष्ट अमानवी क्रूर लोकांना ह्या घटनांची प्रेरणा घेण्यास लावतील ..
नी पुन्हा सुरू राहील ह्यांचा खेळ सत्यानाशी..
मात्र....
सूज्ञास ह्याची चीड येते पण तो गप्प का बसतो ?
मान्य चोरांची संख्या खूप वाढली आहे पण आपली राखण आपण करू शकतोच ना ..शक्यतोवर ?????
.... ©अँब्रोस चेट्टियार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा