बाप नावाला बट्टे

 

बाप नावाला बट्टे     

असतात असेही जिवास घोर  
बनून थोर मिरवतात चोर
बाप नावाला बट्टे     
मला माहित आहे लेकरांनो
तुमच्या मनाला हा प्रश्न पडलाय ना..
सगळेच बाप नसतात बाप ..
खरय ते .
काही तर असतात
हिरण्यकश्यपासारखे ,
त्यांना मी मी च्या पुढे
काहीच कळत नसते.
मुलांचे सुखदु:ख ,
मुलांचे दुखणे,  खुपणे
त्यांना हवे,  नको ते पाहणे,
ह्याउप्पर असते स्वताचेच सर्व,
नी जबाबदाऱ्या शून्य .
विचारू नका,  कुठे आहेत,
अगदी जवळ आहेत .
असले नराधम,  पाहू शकतो
केव्हाही आपण . फक्त
आपले माणुसकीचे
डोळे उघडे ठेवले तर.

           काही काही घरात तर
आयाही नसतात बरंका सर्वच , यशोदे तुझ्यासारख्या .
कैकेयीच जास्त नी
हिरण्यकश्यप अगणित.
           तसे नसते तर का येतात
लहानग्या कोवळ्या
मुलाच्या डोळ्यात आसवे
नी का मुलांच्या हृदयात
जागत नाहीतभाव
मातृपितृप्रेमाचे ..
उत्सव वा दिवस साजरा झाला
की सर्व आलबेल नसते
           त्याच तर दिवसात बिच्चाऱ्या
मुलांच्या जिवाची घालमेल असते,
नी हृदय पिळवटून टाकणारे
असतात भाव त्यांच्या
निष्पाप चेहेऱ्यांवरचे.
            जगात एखादाच का
बापू बनत असतो
का एखादीच जगन्माता
बनत असते ते
अशादुष्टांच्या आकलना
पलिकडचे असते.
            तर काही काही घरांत
मुलेही असतात राक्षसी
करून ठेवतात जगणे
नकोसे घरच्यांचे
नी समाजाचेही.
             तेव्हा समजुतदारपणे
डोळसपणे साजरे करावेत.
सरसकट नालायकांसही
सम्मान मिळत गेला तर
सज्जनांचे जीवन हलाखीचे
हा़े़णे हे क्रमप्राप्तच आहे.
              म्हणून आणि म्हणूनच
शहाण्यास शब्दाचा मार
बुडत्यास काठीचा आधार
प्रसंगी भस्मासूराच्या
निर्दालनासाठी विश्वंभरास
घ्यावा लागतो
विश्वमोहिनीचा अवतार.
         © *अँब्रोस चेट्टियार*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी