विचित्र चित्र
विचित्र चित्र
एकीकडे लेखक, कवी, चित्रकार, शिल्पकार,
वा कोणीही कलाकार,
दुसरीकडे आई.
सगळ्यांचे सारखेच असते
न्हाऊ माखू घालून, सजवून, नटवून
बाळाला अगदी तयार केले तरी
कुठे नाकच पूस
कुठे बटच नीट कर
कुठे कॉलर कुठे मोजे
कुठे बाह्या नीट कर
नुसता वैताग आणतात
कलाकृतीला.....
गरीब बिच्चाऱ्या
न बोलता येणाऱ्या कलाकृतिंचे काय ?
आणि बालिश आयांच्या अत्याचाराचा
तर विचार न केलेलाच बरा
म्हणूनच तर भरकटतात कलाकृती
समाजातील सुजनांनी शांतीचा रंग भरूनही
दंगलीतच त्यांना गंमत येते
जिथे उत्तम पालनपोषण असतानाची निर्मिती
शंकेच्या कुंपणात फसते.. तिथे अपक्व पोषणाचे काय ?
या पालकांचे, कलाकारांचे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखून शिकणे म्हंजे काय असते यावर प्रबोधन होणे, नित्य होणे, सतत होणे, अवश्य होणे नितांत गरजेचे आहे ...
अन्यथा सर्व प्रकारच्या चित्रांतून एकच भडक अर्थ भडकवण्याचाा, रंगांची दुकाने थाटून बसलेल्यांच्या स्वार्थी विचारांचा वाहक बनून प्रवाहित करत राहतील येणाऱ्या पिढ्याही ....
©अँब्रोस चेट्टियार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा