विवेकी मशाल की लुटीचा टेंभा
विवेकी मशाल की लुटीचा टेंभा
मातीचा रोष ओढवून घेणे म्हणजे काय असते हे ज्याला चांगलेच कळते त्याच्या डावपेचाचा हा भाग आहे...
भले तरी देऊ कासेची लंगोटी
मात्र
नाठाळाचे माथी हाणू काठी
असा बाणा ह्या मातीचा
हे मात्र पक्के जाणलेला चतुर तो काय करणार नाही ?
तापलेल्या वातावरणात आणखी वरून वाढीव इंधन सोडणे योग्य नव्हे,
सर्व स्वाहा होऊ शकते तेव्हा अग्नी थोडा सौम्य व्हावा
या करिता जळण बाहेर ओढायचे व पाण्याचा सपकारा द्यायचा म्हणजे अग्नी शांत व्हायला मदत होते.....
असो
जळणाने ठरवायचे आहे की विवेकी वाटाड्याची मशाल व्हायचे की लुटारुच्या लुटीचा टेंभा...
©अँब्रोस चेट्टियार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा