तुम्हीही व्यक्त व्हा
तुम्हीही व्यक्त व्हा
नाही नाही अजिबात
गैरसमज करून घेऊ नका
मला प्रसिद्ध सुप्रसिद्ध वगैरे काही व्हायचं नाहीये
मला माझ्या जवळच्यांच्यात ओळख निर्माण करायची आहे
त्यांना कदाचित माझ्या अव्यक्त परिचयामुळे
माझ्याबद्दल काही ग्रह झालाय की काय हे पाहायचे आहे
असल्यास माझ्यातील काही गुणबिण असलेच तर दाखवायचे आहेत
आणि त्याहून महत्वाचं पुढच्या पीढीतील गुण जाणून घ्यायचे आहेत ववत्यांचे ही कौतुक करायचे आहे
सांगायचे आहे
की कलाकार हा कलेचा चाहता असतो
व कौतुकाचा भुकेला असतो
ही संस्कृती जपण्याची आपली परंपरा आहे
कलाकाराला वय नसते तो प्रकृतीचा बालक असतो
त्याला लिंगही नसते कालाच्या पलीकडे पाहण्याची वा कालाच्याही मर्माला भेदण्याची कला त्याच्याकडे असते
त्याला मी मुद्दाम शक्ती असे संबोधत नाही
कारण बरेच लोक ह्या शक्तीरूपात कलेला सादर करून
खऱ्या सच्च्या कलेची वा इतिहासाची नासधूसच करताना दिसतात
नावाने मोठे झालेले हे तथाकथित साहेब लोक
आपल्या क्षूद्रत्वाचेच दर्शन चोख घडवतात... हंम्म...
माझा श्रवण वाचनाचा चिंतनाचा प्रवास माझ्या दैनंदिन रगाड्यातून गेलेला असल्याने माझे बोलणे बहुधा गल्लीबोळातून ,मंडईतून, कचराकुंडीवरून, गटारीवरून, नळ, पाणी, वाहतुक, व्यसने ,व्यसनी माय माऊली भगिनी बालक वयस्कर अगतिक रुग्ण मग सरकार शिक्षण असा असतो हा प्रवास
तेव्हा तुम्हाला जास्त बोजड नाही पण मला आवश्यक वाटलेले हे सर्व तुम्हालाही तसे वाटेल का ?
तुमचे वेगळे ऩवीन प्रगल्भ असे विचार असू शकतात
मला शिकायला आवडेल तुमच्याकडून....
हो, हा सुद्धा गुण आहे माझ्याकडे शिकण्याचा बरंका ....
किती सांगायचे असते नाहीका ?
म्हणून मुलांनो तुम्ही व्यक्त होत राहा..
पालकांनो मुलांना व्यक्त होऊद्या
अनेक प्रश्न टळू शकतात ह्याने ...
हे व्यक्त होणे सुंदर असते बरका...
तुम्हीही व्यक्त व्हा .....
©अँब्रोस चेट्टियार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा