मी सगळं सगळं सांगितलंय आईला ....

 

मी सगळं सगळं सांगितलंय आईला ....

आई मला पाटी
आई मला पेन्सिल
आई मला दप्तर
अंगणवाडी
बालवाडी
मला आवडते
माझे मित्र येतिल चल
वेळ झाली भरभर

आई मला पाटी
आई मला रंग
आई मला खडू
गाणी झाली
खाऊ झाला
गप्पा झाल्या
अजून कशी
आली नाहीस
मला येते रडू

लबाड कुठली
लपली होतीस ना
भिंती मागे तू
दिसला मला तुझा पदर
उडता भुरूभुरू
आज किनई
खूप आली मज्जा आम्हाला
आकडे रंग पाने फुले
सर्व अभ्यास झाला

हात धरून खबरदार
लिहून घेऊ नकोस
माझा मीच करणार आता
कवर पण पुस्तकाला
दप्तर भरून ठेवत जाईन
अभ्यास झाल्यावर
उचक पाचक केलीस तर
चालणार नाही मला
सोड हात मी बघ कसा
नीट चालतोय आता

तुला काही लागले तर सांगत जा मला
पैसे मोजायला सुद्धा शिकलोय मी आता
कालचे बुक्सचे टू टेन म्हणून तू राँग पैसे दिलेस
आज मी लक्षात ठेवून मोजून ते पाहिले...
सांगू टेन चे टू नोटस दयायला पाहिजे होतेस ..
कशी माझी ग आई तू .. आणि हसू नकोस अशी..
अभ्यास खूप आहे मला चल भरभर  घरी 
लेफ्ट राईट, वन टू, वन टू, वन टू ....
       ...  ©अँब्रोस चेट्टियार





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी