माणुसकी आणि स्वार्थ
माणुसकी आणि स्वार्थ
कोण काय करतो कोण काय करतो
कोण काय करतो कोण काय करतो
डोळ्यांनी मनुजा रे रोज तू बघतो
एकिकडे जिणे वाचविणे चालले
दुजीकडे मान वाचविणे चालले
मर्त्यास प्यारा जीव आपुला खरा
मनुजाच्या पुत्रास ती मानवता
स्वार्थ ज्यास मोठा त्यास माणुसकी काय
माणुसकी मोठि त्या स्वप्राणाचे काय
बलिदानाची महती जाणेल कोण
प्राण त्यागाचे ज्याचा हातात द्रोण
देशासाठी कोणि पहा स्वार्थ त्यागतो
स्वार्थ पहा रस्त्याची धूळ चारतो
©अँब्रोस चेट्टियार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा