स्मृतीची चाळता पाने
स्मृतीची चाळता पाने
स्मृतीची चाळता पाने
सूज्ञास इतके कळते
एखादे वेळेस कोणी
पाण्यात खडा मारी
पाहण्या करिता तरंग
स्मृतीची चाळता पाने
आणि हे ही कळते
कधीतरी एखादे वेळी
गंमत म्हणूऩ कोणी
चिखलात दगडही मारी.
व चिखल उडताच वर
त्या ही गंमत म्हणून घेई.
पण, किंतु, परंतु, अरेरे!
स्मृतीची चाळता पाने
सूज्ञास हे कळेना
कोणीही, कधीही, कुठेही.
विष्ठेने तुडुंब भरोनी
बरबटल्या घाण कुपाशी
का बरे खडा मारील? का बरे?
स्मृतीची चाळता पाने
मज हेची उमजत नाही
समजण्या पलीकडे असे का
कर्म हलके स्व उमजाया...?
जळो कर्म तयाचे सोबत
उरताच नये ती नौबत
नको 'तसल्या स्मृतीची' सोबत
कुणालागी यापुढे
सृष्टीस जाग येवो,
ही भावना जनाची
हो पूर्ण आस मनाची
हे मागणे ही आता
सद्चरणी सद्चरित्रा...
©अँब्रोस चेट्टियार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा