जीवनपथदर्शक प्रकाश

जीवनपथदर्शक प्रकाश


तू प्रकाश आहेस  

याचा मला पुरावा दे 

तू समजला आहेस

तुझ्या नावाचा अर्थ हे मला समजू दे 

तुझ्या बद्दल होत तर नाही ना गैरसमज माझा 

हे मला कळू दे 

माझ्या मनातील प्रकाशाच्या प्रतिमेला 

धक्का लागत असला 

तर मला तुझे नाव बदलू दे 

मला समजलेला प्रकाश 

अंधारातही लख्ख मार्ग दाखवणारा 

जीवनपथदर्शक प्रकाश, महान बुद्ध आहे 

तुला त्याचे नाव देऊन चूक तर झाली नाही ना 

हे जरा पडताळून पाहू दे, म्हणूनच

तू प्रकाश आहेस  

याचा मला पुरावा दे 

तू समजला आहेस 

तुझ्या नावाचा अर्थ हे मला समजू दे 

    ©अँब्रोस चेट्टियार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी