कबर

 

कबर

कबरी लाल जेव्हा कबर खोदतो

व्यक्तीचे चरित्र कसे उलगडत जाते,  नाही ? 
कोणालाच काहीही करावे लागत नाही...
आणि
त्याचे पितळ आपसुक कसे उघडे पडत जाते ...नाही ?
तो धावपळ करून टांगत राहतो आपली अब्रू वेशीवर
मोठे मैदान मारल्याच्या अविर्भावात...
पावला पावलागणिक आपले खोटारडे पण उलगडत जातो स्वतःच आता क्षणोक्षणी सामान्यांच्या वाटेवर..
तो विसरतो नकळत
आज पर्यंत आपल्याला मार्गदर्शन करणारे
आजच का आपल्याला व्यक्त होऊ देत आहेत
ह्याचा विचार करायला नकळत विसरतो भुलतो .....
आणि कुणाची तरी कबर खोदतोय
या आविर्भावात खोदत जातो तो आपलीच कबर ...
खोदत जातो तो आपलीच कबर ...
        ©अँब्रोस चेट्टियार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी