सक्काळची सोबा
सक्काळची सोबा
असंल ईस बावीस वर्सामागली गोष्ट. सक्काळी सक्काळी चाळीशेजारच्या वरांड्याच्या शेवटी लायनीत, गटाराला साताठ बारक्याली बिनचड्डीची, बच्चे कंपनी कुनी फराक, कुनी शर्ट, कुनी उगा गुडघं कवंत घिउन आपली बसल्याली. तीन पाच चिमुरडी, गटारात पडूने म्हून जर्रा लांब बशिवल्याली. जरा डोंगर मोटा केला की फुडं सरून जागा बदलून बसायची. यकदोन सोल्ली तर बाकी समदी गप्पा हानत, मोकळी होत व्हती. इकत्यात तिथं तेंच्या चाळीतच वस्तीला असनारा कुत्रा काळ्या आला. त्यानं यक नवीन कुत्री, मैत्रीन जनू आनली व्हती. आपलं साम्राज्य दाकवाय आनल्यागत जोडीनं चक्कर टाकून दाकवित व्हता. तेवडं म्हत्वाचं काम झाल्यावर दोगंबी बारकाल्यांच्या डोंगराकडं वळली. दोगानी यक यक निवल्लं. त्यांचा धसका घिऊन यक बारकं, पावनं असंल ते हिकडं, ते घाबरून "यायोsss " म्हनून भॉकाड पसरत पळालं त्याला समदी हासली पन कारीकरम चालूच व्हता. काही नवीन येत व्हती, काही उरकून जात व्हती. पन लांब पल्याची, बाकीची, सराईत कारबाऱ्या वानी आपली गप्पा हानित व्हती, मनसोक्त हागत व्हती.
©अँब्रोस चेट्टियार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा