भारत जोडो |||
भारत जोडो |||
मनामनातून कणाकणातुन
स्वर उमटला अंतरातुन
मैत्र भावना घडो
भारत जोडो |||
पदस्पर्शाने पुलकित धरती
माती स्पर्शुन लोक हरखती
हिरवाई अन काळी आई
भेट मनुजा घडो
भारत जोडो |||
सृष्टीचा अन मानवतेचा
पिंड एक तो भूतदयेचा
क्रूर दुष्ट धडपडो
भारत जोडो |||
सर्वजनांचा निसर्ग राजा
पृथ्वीमाता सर्वजनांची
भेदाचे तट झडो
भारत जोडो |||
ज्ञान तुझे हे थोर लेकरा
जाणून घेशी जनसागरा
जननायक मन घडो
भारत जोडो |||
विपरित समयी तू अवतरला
मानवतेचा ध्वज मिरविला
दुष्टक्रूर मती झडो
भारत जोडो |||
©अँब्रोस चेट्टियार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा