नीतीमत्ता
नीतीमत्ता
बोलावे मोठे बोल
पिटावे ढोल
खोलावी पोल
मग अलगद
आपुलीच |
उभे राहावे पाठीशी
पुसावे डोळे
नी खेचावी सतरंजी
शोकसभेतच
सांत्वनाच्या |
घ्यावी हृद्य गळाभेट
ओसंडुन हस्तीदंती
पाठीशी सोडचिट्ठी
तयारीची
असो द्यावी |
कधी इथे तर कधी तिथे
लाचारीचे जिणे कृतघ्न
नराधमांचे राजकारण
पर्वा नसे त्यांस
समाजाची |
नवसमीकरणाची उत्तरे
तयार तयांची सत्वरे
जनतेस मात्र ज्ञाती-पक्ष
पथ्यापथ्य भेद काय
त्यांना नाही |
नीतीमत्ता असता खरी
कीर्तीप्राप्ती व्हावयास ते
मानवतेची मशाल घेऊन
ज्योत जागृती सातत्याने
जनता धरती उरी |
सामान्याची डोळी ओली
मित्र अमित्र पायी साखळी
त्यांची ऊठबस मात्र सोवळी
अमित्र पक्ष वा कृतघ्नासही
हसून देती भेट गळा |
असे वागणे दोटप्याचे
राजनीतीला क्रूरनीतीचे
काळिम कारण
नाव धराया
हर्षे रचती धडा |
आयुष्याची माती केलीस
ज्ञानाचीही शकले केलीस
गोळाबेरीज आयुष्याची
जमून आल्या दुधात विरजण
वा मिठाचा खडा |
एकच निघतो नरपुंगव तो
युगायुगातुनी गाते गाथा
आजही सृष्ट्ये सिद्धची केले
जनजलधिचा घेउनी तांडा
चालताहे एकटा |
©अँब्रोस चेट्टियार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा