कोण कुणाचा

 


कोण कुणाचा

ते ते तिथले पीक पाणी
त्यांच्या मालाचे ते ते वाणी
गुणाचा नी वाणाचा
त्यांच्यावर फरक काय पडणार
शेवटी परीसर हाच
जास्त परिणामकारक ठरणार
त्यावरच त्याचा प्रतिसाद ठरणार....

लागे बांधे सख्य सोयरिक
जमीन हवा पाणी तसे निपजणार
त्याची बांधिलकी तिथल्यांशी
एरव्ही आपण आपल्या
उत्तम वागण्याने जग आपलेसे
करायचे असते. नाही का...
अन्यथा कोण कुणाचा या जगी
हे सर्व जग जाणून आहे...

पण
आपल्या वागणुकीने आपण
त्याला आपलेसे करू शकतो
आपल्याला हल्ली सर्व आपले
असे सांगावे लागते
उलट त्यांनी सांगावे
मी तुमचा....

त्याला हवेहवेसे वाटावे
असे आपल्यात काय आहे
असले नसले ते वाढवावे
की उगाचच हपापलेल्या
अधाशापरि तोंड वेंगाडून
सतत त्यापुढे याचक व्हावे...

बांधव येत होते आपल्याकडे
आताशा येत नाहीत. का बरे..
याचा विचार कोणी करावा..
ह्या प्रश्नाच्या उत्तरातच
सर्व प्रश्नाची उत्तरे आहेत..

हे विश्वचि माझे घर म्हटल्यावर
आपण नवीन काय सांगतो आहोत
आपले तसे वर्तन आहे का
तर नाही आज नुसते
अवमान कारक नर्तन सुरू आहे
चौफेर, चहूकडे.. हम्म !...
      ©अँब्रोस चेट्टियार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी