दीपावली ||
दीपावली ||
रांगोळ्या काढा तुम्ही दारे सजवा
फराळाचे गोड करा सण साजरा ||
सुखाच्या क्षणाच्या आनंदलहरी
भरजरी माया होई प्रेम जरतारी ||
खेळती हासती थोर अन लहान
मायबापास मोठा खजिना महान ||
दारोदारी प्रफुल्लित सोज्वळ प्रकाश
दीप रोषणाई गोड पक्वान्न सुग्रास ||
सर्वां सुख लाभे आसमंत उजळे
फराळात मोद रमती कुटुंबकबिले ||
©अँब्रोस चेट्टियार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा