क्याट वॉक
क्याट वॉक
म्हशींचं लचकत मुर्रडत शेपटा फिर्रवत टोळकं चाललं व्हतं.
काही फुडं काही मागं. शेवटली तर्र हिरविन म्हस, जर्रा जास्तच लाडीक, मुर्रडत लचकत अलगद पावलं टाकित, क्याट वॉक कर्रीत चालल्याली. ती सोबतिणीला काय काय सांगत चालली व्हती. जर्रा लक्ष केलं तर ऐकून घाम फुटला नी सोबतिणीचाही जीव कासावीस झालेला. इथंच धरणी दुभंगावी नी पोटात घेईल तर बरं अशा धावा करतीशी वाटली. आन मी चाट पल्लो न काय ...पार त्यांचा नाद सोल्ला .. पन तिचं म्हन्नं काय डोक्यातच फिरत व्हतं सार्रकं " लाजा न्हाईत मेलिंला कशा चाल्ल्यातं बग की उगड्या बोडक्या" ............
©अँब्रोस चेट्टियार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा