आपले डॉक्टर

 


आपले डॉक्टर

सुखी संसाराची सुत्रे
पाठ होती डॉक्टरांना
त्यांना एके दिशी वाटे
द्यावे ज्ञान हे सर्वांना ||

प्रण त्यांनी केला थोर
अभ्यासून जनलोका
हवे नको ते पुरवावे
साह्य व्हावे एकमेका ||

कार्य मोठे वाढलेले
त्यांच्या पुढे जाणताच
कुटुंबाची वाहुन धूरा
समाजाचे जीवन केले ||

रुग्णसेवा थोर केली
सामाजिक कार्यातून
अंधश्रद्धा मूळ आहे
आले त्यांना जाणवून ||

क्षण एक ना उसंत
कधी डॉक्टरांनी घ्यावी
श्वासश्वास कार्यासाठी
दिला पुढे एक एक ||

प्रबोधन कार्य सुरू
युद्धस्तरावर झाले
व्याख्यानी लेखनी सारे
चौफेर ते लढे दिले ||

कार्य थोर उभे होते
जगतास कुठे जाण
विरोध्यांस मात्र धाप
कुणकुण भुणभुण ||

वैज्ञानिक दृष्टिकोन
जगतास तारणारा
त्याचा केला पुरस्कार
जागे केले सरकारा ||

असे कार्य अविरत
चालायास पाहिजे ते
वाहूनी जीवन दिले
असे लोक पाहिजे ते ||

स्वार्थलाभ त्यागणारे
नाम क्षेम सोडणारे
जनतेच्या समाजाच्या
साठी हवे झटणारे ||

हात हाती साथी साथ
येता होई कार्य मोठे
भेदाभेद विसरून
समाजास सांधणारे ||

तीळभर कार्य होई
अवचीत खूप मोठे
सर्वजन सहभागी
ज्ञान प्रेमाचे रोपटे ||

संघर्षात वेळ व्यर्थ
विरोधास समजावे
कार्य मात्र नीट व्हावे
समतेचे बंधूभावे ||

आहारा विहारातून
वाचनानी लेखनातुन
चालण्या नी बोलण्यातुन
अविरत शिकविणे ||

ऐसा गुरू संत नेता
लाभतो आम्हासी वर्णू
जीवनाचे सार्थक झाले
ऐसे धडे शिकविले ||

डॉक्टरांची शिकवण
अशी रोज एक एक
आम्हा सांगतात माई*
त्यातलीच आठवण ||

सामाजिक कार्यकर्ता
आजारी तो पडू नये
समाजाचे जीवन त्याचे
गुन्हा असा घडू नये ||

सुखी संसाराची सुत्रे
पाठ होती डॉक्टरांना
त्यांना एके दिशी वाटे
द्यावे ज्ञान हे सर्वांना ||

प्रण त्यांनी केला थोर
अभ्यासून जनलोका
हवे नको ते पुरवावे
साह्य व्हावे एकमेका ||

  ©अँब्रोस चेट्टियार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी