व्यवस्था
व्यवस्था
अर्थात एकमेवाद्वीतीय उदाहरणे सोडता ......
बाकी असेच पाहिले आहे अगदीच काहीसे लोक आपल्या अंगभूत कौशल्याच्या जोरावर प्रसिद्धी पावताना परंतु त्याहून कितीतरी जास्त कुशल लोक त्याहूनही मोठ्या सख्येने असताना ही प्रसिद्ध होत नसतात .. म्हणजे इथे काही तरी सूत्र असले पाहिजे ...
माझे अवलोकन, अर्थात हे बहुतेक प्रसिद्धी पावलेल्यांच्या बाबतीत खरे दिसते आहे... ह्यांच्या मागे एक गट रीतसर कार्यरत असतो. जो पद्धतशीरपणे हे सर्व घडवून आणतो. मग प्रश्नअसा उरतो की ती व्यक्ती खरंच त्या ताकदीची होती का ? तर प्रकाशात आलेली ती व्यक्ती नक्कीच विशेष असते आणि त्याहूनअधीक ती असली तर ती इतिहासही घडवते परंतु अनेक बहुतैक मात्र तेवढ्या काळात प्रकाशात येतात नी विरतात वगैरे .. मग तो गट इतरांनाही तशी समान संधी देताना दिसत नाही .. म्हणजे भेदभाव हा होतोच ..
आता कुणी ह्याला कांगावा म्हणतील..
परंतु ही वस्तुस्थिती आहे..
कौतुक म्हणून नाही की सद्भावना म्हणून नाही की सहृदयता म्हणून नाही की गुणग्राहकता म्हणून नाही..
कोणाला उचलायचे कोणाला डावलायचे ह्याचे डावपेच यांचे ठरलेले असतातसे वाटते ....
योग्य काय नी अयोग्य काय याचाही विचार करू देण्याची मुभा समाजाला नाही ते सुद्धा हेच ठरवून प्रकाशित करतील नी समाज
तेच गिरवत पुढे जाईल अशी व्यवस्था ...
हं.... मग एखादा स्वयंप्रकाशित उठतो नी चालू लागतो त्याच्या मागे काही प्रकाशाच्या वाटेला चालू लागतात तर गवगवा होऊ लागतो .. भ्रष्टतेचा .. कोणी जीव जगवू पाहतो तर कोणाची व्यवस्था बुडत असते .... निर्घृण हातच्या क्रूर छद्मी व्यवस्था....
©अँब्रोस चेट्टियार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा